Skip to main content

कला

जोगवा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 08/02/2011 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
बिका किंवा मकी ह्या दोघांपैकी कुणा एकाच्या कृपेने मध्ये 'जोगवा' हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असल्याने लगेचच तो बघायला घेतला. काही कारणाने चित्रपट अर्ध्याच्या पुढे बघू शकलो नाही आणि राहिला तो राहूनच गेला. मात्र त्या अर्ध्या चित्रपटाने देखील प्रचंड हुरहुर लावून ठेवलेली होती.

लुई आर्मस्ट्राँग

लेखक प्रास यांनी गुरुवार, 03/02/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
संगीताला कोणत्याही राष्ट्रीय सीमा नसतात आणि ते कोणत्याही एका वंशाची जहागीर नाही.

'स्कॅटिंग'

लेखक प्रास यांनी गुरुवार, 27/01/2011 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या एकूण होपलेस परीस्थिताचा विचार केला तर फारच डीप्रेसिंग वाटू लागतं आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग माझ्या मते काही चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं हा आहे. अशी गोष्ट उत्तम संगीताशिवाय कोणती असू शकते? तेव्हा एका सुंदर संगीत प्रकारावर आपण आता प्रकाश पाडणार आहोत. जाझ संगीत हे अभिजात संगीत आहे. त्याचा उद्गम अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या आफ्रिकन मूळाच्या संगीतातून झालेला असला तरीही त्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याला परंपरा आहे. मानवी मनातील अनेक भाव या संगीतातून फार छान प्रकारे दर्शवले जातात. याच जाझ संगीताचा एक प्रकार आहे, स्कॅटिंग (Scatting).

'द किंग'

लेखक प्रास यांनी मंगळवार, 25/01/2011 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
१९५० चा काळ, अमेरिकेत ज्याकाळात वर्णद्वेष ब~यापैकी वास्तव होते तेव्हा मिश्रवस्ती असलेल्या 'मेम्फिस' शहरामध्ये एक गौरवर्णीय मुलगा खूपदा कृष्णवर्णीयांच्या मौजेच्या ठिकाणी दिसायचा. त्यांच्या म्युझिक क्लब्स मध्ये जायचा, गाण्यांच्या कार्यक्रमात जायचा, इतकंच नाही तर गौरवर्णीयांच्या क्लब्समध्येही 'ज्यूकबॉक्स'मध्ये '~हिदम एन ब्लूज', 'गोस्पेल' आणि 'स्पिरिच्युअल' प्रकारची गाणी ऐकायचा. एरवीही रेडिओला चिकटण त्याला नवीन नव्हत.

मॅट पेंटिंग

लेखक स्पा यांनी बुधवार, 19/01/2011 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाला "animation " शिकताना 'matt painting ' नावच प्रकार शिकवलेला होता. baryach इंग्लिश si - fi चित्रपटात असे प्रकार... चलत चित्रणा द्वारे जिवंत केले जातात मागे येऊन गेलेला "३००" हा चित्रपट संपूर्ण पण matt painting चा वापर करून बनवलेला होता मी पण एक प्रयत्न केलेला होता एक झलक पेश करतोय अनेक इमेजेस एकत्र केल्या जातात..

मिपा - क्रिकेट विश्वचषक २०११ - आवाहन ...

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/01/2011 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, तयार आहात ना जल्लोशाला ? तयार आहात ना ढोल-ताशे, टाळ्यांचा कडकडाट, आरोळ्या आणि जयजयकाराला ? तयार आहात ना एखाद्या चुकलेल्या फटक्यावर, सुटलेल्या झेलावर आणि न दिलेल्या विकेटीवर खडाजंगी चर्चा करायला ? तयार आहात ना विजयानंतर डोक्यावर घेऊन नाचायला आणि लाजिरवाण्या पराभवानंतर हक्काने संघाला ४ खडे सुनवायला ? काय म्हणता ? कशाची तयारी करायची ? अहो 'क्रिकेट हा धर्म' असलेल्या आपल्या देशात अजुन महिन्याभरात क्रिकेटचा कुंभमेळा भरतो आहे.

माणुस घडवलेली इव्हेंट

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 15/01/2011 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी अशा असतात की तुम्ही कितीही ठरवलं तरी त्यावर लिहीताच येत नाही.. डोक्यात येतं, ''साला, यावर लिहिलं पाहिजें" पण विचारांची आणि पेनाची एकत्र भेट टळत राहते ती कायमचीच.. '' माझी आजी, मी बघितलेलं हॉस्पिटलायजेशन" हे त्यातलेच काही विषय .. पोटातलं ओठावर आणताच येत नाही ,थोडक्यात काय ,तर कीकच बसत नाही .. असाच एक विषय म्हणजे ''नाटय महोत्सव''.. आम्ही केलेला एक इव्हेंट.. म्हटलं तर मोठा बदल वगैरे घडवणारा आणि म्हटल तर कोणालाही काहीही फरक पडत नाही असा फक्त आमचा आमच्यापुरता कार्यक्रम.. ते काहीही असो , या घटनेने मला मात्र खुप काही दिलं,शिकवल .

मुंब्रा देवी

लेखक स्पा यांनी शनिवार, 15/01/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच दिवसांपासून 'मुंब्रा देवीला'जायचं मनात होतं, पण वेळच मिळत नव्हता, शेवटी काल तो योग आला मी आणि माझा मित्र सौरभ असे दोघे सकाळी प्रचंड थंडीत ५.३० ला निघालो, काहीही करून सूर्योदयाच्या आधी आम्हाला वर पोहोचायचंच होतं (फक्त आणि फक्त सूर्योदय बघण्यासाठी मुंब्रा देवीला जायलाच हव) प्रचंड धुके असल्याने आमचा पचका होणार अशी चिन्ह होती पायऱ्या चढताना बऱ्यापैकी अंधार होता ७ वाजत आलेले होते, आणि आम्ही धापा टाकत कधी एकदा देऊळ गाठतोय या प्रयत्नात होतो शेवटी एकदाचे देवळात पोहोचलो, आणि नारायण अवतरले,