Skip to main content

जीवनमान

अ॑तर

लेखक शितल यांनी शनिवार, 21/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कविता अणि अमेय चा मुलगा मानस आज उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला रवानगा होणार होता. कविता आणि मानस पुण्याहुन मुबईला कॆब करून एअरपोर्टवर आले, अमेय त्याची वाट पहातच उभा होता. मानसने त्याच्या बाबाना पाहिल्यावर त्याना नमस्कार केला, आज ब-याच वर्षानी कविता आणि अमेय समोरा समोर होते आणि कोणाला काय बोलावे हे समजत नव्हते.

जर उपवर मुला॑नी असे केले तर

लेखक शितल यांनी गुरुवार, 19/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात आम्ही ७/८ मैत्रीणी नी एका मैत्रीणीच्या घरी रात्रीची मैफिल ठरविली होती, मस्त गप्पा टप्पा- खाणे पिणे, पत्याचे खेळ असा मस्त कार्यक्रम आखला होता. ठरल्या प्रमाणे सगळ्या जणी जमलो, आमच्या ग्रुप मध्ये गृहीणी, नोकरी करणार्‍या आणि काही जणी मुले झाल्यावर मुले लहान असल्या मुळे करिअरला तात्पुरता राम राम ठोकलेल्या अशा सगळ्या जणी आहोत.

माझी साक्षात्कारी मधुमेहाची भीती

लेखक व्यंकट यांनी सोमवार, 16/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
खूप खूप वर्षांपूर्वी डॉक्टर व्हावं असं मला वाटत असलं तरी ते मला जमण्यातल नव्हतं हे माझ्या पक्कं लक्षात आलं आहे. डॉ. अस्थाना म्हणतो तसा पाषाणह्रदयीपणा माझ्याकडे आहे. अत्यंत आवडती जीन्स फाटल्यावर मी तिच्याकडे काही न घडल्याप्रमाणे शांतपणे बघू शकतो. तेंडूलकर आउट झाल्यावर टि.व्ही. बंद केला तरी ऑनलाईन मॅचचा स्कोअर पाहू शकतो. ह्यावरून लक्षात आलं असेलच की, अनलाईक मुन्नाभाई, मी अगदी आरामात हात न थरथरता रोग्यांवर शल्यचिकित्सा केली असती. त्यामुळे प्रश्न हिमतीचा किंवा हुशारीचा नाही. प्रश्न आहे पथ्याचा... एखाद्या व्यक्तीला तू अमुक अमुक पदार्थ खाऊ नकोस असा सल्ला देणं ह्यासारखी पौष्टीक अरसिकता ती काय ?

नाती

लेखक एककिनारा यांनी गुरुवार, 12/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कधितरी मनात उगच विचार येउन जातो,ख्ररच कोनी असत का कुनाच की नाती फक्त मानायला असतात?

भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास

लेखक भोचक यांनी बुधवार, 11/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता.

जा, उडुनी जा पाखरा

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 08/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
झाडावरचा इवलासा तांबूस तपकिरी पक्षी नजरेस पडताच मी दबक्या पावलांनी अलगद त्या दिशेने सरकलो व झुडुपांमध्ये बसकण मारत लपत छपत किरण साधला. कळ दाबणार इतक्यात त्या चिमण्या जीवाला चाहुल लागली. माणूस हा प्राणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हे ज्ञान त्याला उपजतच असावे.

सी वर्ल्ड, सॅन डिएगो सहल

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच सॅन डिएगो या अमेरिकेच्या नैऋत्य टोकावरील सुंदर शहरास भेट दिली. तेथील समुद्रकिनारे फिरलो व सी वर्ल्ड ला भेट दिली.

आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 06/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भडकमकर मास्तरांनी 'साठेचं काय करायच?' ह्या नाटकाच्या परिक्षणात मांडलेला 'राजीव नाईक' ह्यांचा हा विचार मनात रेंगाळत, खर तर वादळासारखा घोंघावत राहिला...
आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?
खरच, का छळत, होरपळत असावा हा विचार एवढा?