Skip to main content

जीवनमान

एक टुमदार गाव - माझे माधवनगर - भाग - २.

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 15/03/2010 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
एक टुमदार गाव माझे माधवनगर - सन १९६० ते १९७० दसकातील आठवणी भाग - २.
मागेवळून पाहता कधी आठवतात मजेशीर गोष्टी ... बुधवार पेठेत स्वर्गात न्यायाला विमान येणार म्हणून पत्रके वाटून मोठी तयारी केलेले श्रद्धाळू जाखोटिया... त्यांचा भसाड्या नाकाचा राजा... रेल्वे स्टेशनच्या पलिकडील सुंदर विठ्ठल मंदिरात हभप वासुदेवराव जोशींची टाळ मृदुंगाच्या तालावर होणारी हरिपाठाच्या अभंगांवरील कीर्तने... त्यानंतर नातू शेठजींचे ‘इष्टी’ कथन... त्यात बालगंधर्वांचे भजन गायन... ६७ सालातील भुकंपानंतरची रात्र... चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी रात्री 2 ते 4 गस्त घालण्याची कामगिरी...

कालाय तस्मै नमः ||

लेखक जयवी यांनी रविवार, 14/03/2010 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
जसा जसा काळ पुढे सरकतोय, तसं तसं जग बदलतंय.....फार बदलतंय. मूलभूत गरजा सुद्धा बदलल्या आहेत. आधी अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गोष्टी असल्या तरी आयुष्य निभत होतं. ह्या शिवाय जे काही हवं असायचं, त्या होत्या सुख सुविधा !! आता मात्र सगळंच बदललंय. अन्न, वस्त्र, निवाऱ्याखेरीज अजूनही खूप गोष्टी हव्या असतात जगायला आणि त्यांना सुख सुविधा म्हणून चालणार नाही.....त्या ही गरजाच झाल्या आहेत. इंटरनेट ही अशीच माणसानं स्वत:साठी निर्माण केलेली गरज. आधी कॉम्प्युटर्स नव्हते तेव्हा ही आयुष्य चालत होतंच की. पण आता जरा नेट बंद झालं की जीव अगदी कासावीस होतो. नेट बंद झालं की एकदम out of touch वाटतं.

एक टुमदार गाव - माझे माधवनगर

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 13/03/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक टुमदार गाव - माझे माधवनगर भाग १- (सन १९६० ते १९७०च्या आसपासच्या आठवणी) माधवनगर गाव तस फार लहान. पण आखीव आणि टुमदार. सांगली व बुधगाव संस्थानांच्या मधे पुणे-बंगलोर मीटर गेजलाईनवर मिरजेच्या आधीचे स्टेशन. तर दुसऱ्या बाजूला किर्लोस्करवाडी जवळचे. पुण्याहून सांगलीला उतरणाऱ्यांना सोईचे म्हणून रेल्वेस्टेशनवर गर्दी. तरतरीत घोड्याचे व गोंडेदार टांगे, एसटी बस वाहतुकीची साधने तर बाकीचे सायकल स्वार. बुधगावच्या वाटेवर स्व. गंगाधर नातू शेठजींची माधवनगर कॉटन मिल तर सांगलीच्या रस्यावर स्व.

कारभारी गोपाळे!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 12/03/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या आसपासचे अंगावर काटा मारणारे थंडीचे दिवस. सायकल दामटत शाळेत निघालो होतो. उललेल्या ओठांवर बोचर्‍या वार्‍याने चुरचुरत होतं. डोळ्यांना झोंबरं वारं लागून पाणी येत होतं. पहाटेच्या अंधारात सायकल स्टँडला लावून कुलूप घातले. किल्ली खिशात टाकली. तालमीच्या लाकडी दरवाज्याजवळ दबकत दबकत गेलो. जोर घुमवणार्‍या पोरांचे आवाज कानावर आले.. "हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!" "हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!" हळूच दरवाजा लोटून आत डोकावलो. डावीकडे जमिनीलगत समोरासमोर दोन भलेमोठे आरसे लावलेले होते आणि त्याच्यासमोर दोन्ही बाजूला पोरे एकमेकांकडे तोंडे करुन जोर घुमवत होती!

बतावणी!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 12/03/2010 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
(स्थळ - क्षीरसागर, विष्णूंचा महाल. एका कोचावर गरुड लॅपटॉपवर 'मिपा मिपा' खेळतोय! टीपॉयवर काही आध्यात्मिक ग्रंथ पसरुन ठेवलेत.) (आतल्या खोलीतून) लक्ष्मी : अहो! अहोऽऽ!! लगबगीनं बाहेर येत : आँ..कुठे कडमडले हे आता? (गरुडाकडे पहात) : ए चोच्या, कुठैत रे हे? अं...आँ....कोण कुठे? अरे अं आँ काय? हे कुठे गेलेत आत्ता सकाळी सकाळी विचारतेय मी? हां हां ते होय, ते मगाशीच बाहेर पडले! जाताना काही सांगितलं नाही पण 'मानससरोवर' असं काहीतरी पुटपुटत होते! मानससरोवर?? इतक्या लांब आणि तुला न घेता कसे गेले? मला काय माहीत?

वीजेची गायब-जादू!

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 10/03/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना जादूच्या समस्त प्रयोगांनी मला जबरदस्त मोहिनी घातली होती. माणसाचे कबूतर होते, कबुतराची फुले होतात, फुलांचे रंगीबेरंगी रूमाल होतात.... आणि ह्या सगळ्या भरात मूळ कोणती वस्तू गायब झाली हेच तुम्ही विसरून जाता. जादूगार खूष, तुम्हीही खूष! पैसा वसूल!! पण गायब झालेली वस्तू मिळते का हो परत? अहो, ती जादू असते.... त्यात सर्व काही शक्य असते. जादूच्या ह्या नियमाला शिरोधार्थ मानणारी मी.... त्यामुळे एखादी वस्तू जादूने गायब झाली असे कोणी सांगितले तर त्यावर माझा लगेच विश्वास बसत असे. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही.

थेंबे थेंबे...

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 09/03/2010 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
"कॅन हॅव सम वॉटर प्लीज?" मी हवाईसुंदरीला पाचव्यांदा पाणी मागत होतो. दर वेळेस कुणीतरी एक सुंदरी एका छोट्या पेल्यात थोडे पाणी आणून देत होती आणि माझी तहान काही केल्या इतक्या कमी पाण्याने शमत नव्हती. घरी असतांना सुटीच्या दिवशी दुपारी झकास जेवण झाल्यावर एक तांब्या सरळ तोंडाला लावून न थांबता घटाघटा पाणी पिणार्‍या मला ते चार थेंब पाणी तहानेची अधिक जास्त प्रकर्षाने जाणीव करून देत होतं. त्या सुंदर, फटाकड्या सुंदरींना वारंवार पाणी मागणं मलाही प्रशस्त वाटत नव्हतं. माझा पहिलाच आंतरराष्ट्रीय विमानप्रवास होता तो.

लोकशिक्षण ही गुरुकिल्ली

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 08/03/2010 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशिक्षण ही गुरुकिकिल्ली
सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. अमेरिकेसारख्या देशातही ही समस्या आहे. समरव्हील या शहरात त्या दृष्टीने अभ्यास करण्यात आल. भारतातही या प्रश्नी खुप काही करणे शकय आहे फक्त त्यासाठी लोकशिक्षण सर्वात महत्वाचे आहे. ....... पुढे वाचा हा दैनिक सकाळ दि. ८ मार्च २०१० च्या पुणे आवृत्तीत लेख वाचल्यावर लिखाण ओळखीचे वाटायला लागले. पण हे विठ्ठल देशपांडे कोण बाबा?

स्वच्छतेच्या बैलाला...

लेखक नीधप यांनी सोमवार, 08/03/2010 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ च्या हितगुजच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेला हा लेख. दिवाळी अंकाचा म्हणून इथे टाकला नव्हता. तो आज कुणीतरी वेगळ्या शीर्षकाने इथे टाकला. प्रकरण मिटले पण लेखातली समस्या मिटलेली नाही. तेव्हा महिलादिनाच्या निमित्ताने परत तोच लेख इथे टाकतेय. ------------------------------------------------------- "इथे लेडीज टॉयलेटची सोय कुठेय?" प्रॉडक्शन मॅनेजर जयंतला मी विचारलं. एका आडगावात शूट होतं. संपूर्ण दिवस आम्ही त्या एकाच जागी शूट करणार होतो. अश्या वेळी पर्याय नसल्यामुळे हे विचारण्याचा निर्लज्जपणा मी अंगी बाणवून घेतला होता.