अशी करावी काटकसर! ;-)
हे आहेत आमच्या पूर्वीच्या घरमालकीण बाईंचे सुपर-काटकसरीचे किस्से! अतिशयोक्ती अजिबात नाही. तसेच त्यांची हेटाळणी/ बदनामी करण्याचाही उद्देश नाही. पण एकेक नमुनेदार माणसे असतात, त्या तशाच होत्या [आता हयात नाहीत] आणि तरीही अतिशय कर्तृत्ववान बाई! पण हे किस्से वाचून तुमची नक्की करमणूक होईल!!! :)
तो काळ होता जक्कल-सुतार टोळीने पुण्यात जे हत्याकांड चालवले होते तेव्हाचा. आमचा वाडा ऐन टिळक रोडवर. त्याला ना फाटक ना कसली सुरक्षा. त्यातल्या त्यात खबरदारी म्हणून तीन मजली इमारतीच्या प्रत्येक जिन्याच्या सुरुवातीला व शेवटी असे जाळीचे दरवाजे बसवून घेतले होते.
मिसळपाव
फोटो १
फोटो २
एक संस्थानिक.....
अर्धांगिनीसहः
