Skip to main content

जीवनमान

दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !

लेखक विदेश यांनी बुधवार, 11/05/2011 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : शूर आम्ही सरदार आम्हाला ) दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती ! लाज-बीज अन् शरमहि नाही , प्याले घेतले हाती |धृ| मस्तीच्या दर्पात उधळली, उच्च कुलाची रीत दोस्तीशी ईमान राखलं , घडलं जरि ईपरीत लाख झेंगटं झेलुन घेईल , अशी झिंग ती राती |१| धिंगाणा वा गोंधळ करणं , हेच आम्हाला ठावं सोसायटीमध्ये कसं जगावं , हे न आम्हाला ठावं आईबाबांची सारी अब्रू - टांगू वेशीवरती |२| ( सूज्ञांस संदर्भ वे. सां. न. ! )
काव्यरस

घोटाळ्यातच करिअर....

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 10/05/2011 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
आता आम्ही दररोज पेपर वाचतो आणि चाट पडतो. कारण फ्रँटपेजवरच्या बातम्याच तशा अचाट असतात, कोट्यावधींच्या हिशोब मांडणाऱ्‍या अन् मागणाऱ्‍याही. आम्ही चक्रावून जातो जेव्हा आमचंही नाव 'माथा बडवत्या पोज'मधील फोटोसहीत छापून येतं. आमच्या अचाट कर्तृत्वाची अनेक पाने साक्षीदार असली तर त्यातील महत्वाची पाने गायब करण्याचं कसब आमच्या अंगी बाणवल्यामुळे आमच्या कारभाराची 'गैर' गणती होऊच शकणार नाही हे आम्ही छातीठोकपणे (जाहीर सभेतही) सांगू शकतो. तसे म्हणाल तर आम्ही मँट्रीक फेल नामक डिग्रीचे.

दोन लार्ज -एक सिमॉल ..

लेखक रामदास यांनी सोमवार, 09/05/2011 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या बारचा आश्रयदाता आहे त्या बारला फिफ्टी प्लस बार म्हणायला हरकत नाही. इथे फारशी गर्दी नसते.माझ्या वयाची माणसं फक्त दारु पिण्यासाठीच येतात. गप्पा नाहीत- बिझीनेस डील्स नाहीत.दारु पिणे आणि रिघणे. वेटर दोन पेगचा कोटा एकदाच काय तो टेबलवर आणून ठेवतो आणि टिव्ही बघत बसतो. संभाषणही फारसं काही नसतं .आठवड्यातून एकदाच एक प्रश्न विचारतो. उत्तर मिळालं की दुसर्‍या दिवशी शंका विचारतो. पावणेअकराला चखण्याची डिश न विचारता उचलून ठेवतो. अकराला दहा मिनीटे असताना बिल गोळा करतो . अकरा वाजता रीक्षा बोलावतो.

लिहिण्यास कारण की -

लेखक विदेश यांनी सोमवार, 09/05/2011 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
तहानभूक विसरून , नित्याची कामं बाजूला ठेवून , किंवा हातातली कामं करत करत दूरदर्शन संचापुढे ठिय्या मांडून बसणारे किंवा येता जाता न चुकता दूरदर्शन संचाकडे नजर टाकणाऱ्याचे अभिनंदन करण्याची आवश्यकता नाही ! कारण सदैव ही माणसे चिंतातुर चेहऱ्याने वावरत असतात.त्याच त्याच बातम्या २४ तास ऐकून जगाचे काय आणि कसे होणार याची काळजी त्यांना पडलेली असते! मालिकेतील पात्राच्या दु:खात दूरदर्शन पुढची माणसे समरस होतात, पण त्यांना घरातील पात्रांच्या सुखदु:खात काडीइतका रस घ्यावा वाटत नाही! हातात असलेली कामं निपटून दूरदर्शन संचातील ' पाक-क्रीडा ' पहावयास काय हरकत आहे?

वेगळ्या वाटेवरचा त्रिशूल कुलकर्णी

लेखक नीलकांत यांनी रविवार, 08/05/2011 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज माझ्या मित्राविषयी सर्वांना सांगावसं वाटलं म्हणून हा लेख. त्रिशूल कुलकर्णी विषयी नुकतीच पुणे सकाळने दखल घेऊन छान बातमी दिली आहे. http://72.78.249.107/Sakal/6May2011/Normal/PuneCity/Pune1Today/page11.h… हा त्रिशूल मला अनिल अवचटांच्या मुक्तांगण मध्ये पहिल्यांदा भेटला. खरं तर तेव्हा मनिष, योगेश ( अजानुकर्ण), अजीत आणि काही मुंबईचे लोक असे आम्ही भेटलो होतो. त्रिशूल पुढेही भेटत राहीला. त्याने एम टेकचा प्रकल्प किर्लोस्कर मध्ये केला.

नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती

लेखक विदेश यांनी रविवार, 08/05/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : इंद्रायणीकाठी - देवाची आळंदी ) नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती चालली खरेदी.. थांबेना ती |धृ | सवलतींचा ताजा - लागतो ढीग नाचती विक्रेते.. मागे पुढे |१| नव्या साडीसाठी - माझ्यापुढे साठे - खर्चाचा हिशेब भांडणात वाढ.. पत्नीसंगे |२| नव्या साडीसाठी - मागची उधारी - राहिली अजून जॉर्जेट .. शिफॉन .. , सुटका नाही |३| नव्या साडीसाठी -
काव्यरस

तिची नशा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 08/05/2011 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
थंड झुळका अंगावर येत असाव्यात, शहराच्या गजबटापासून दूर एखाद्या शांत तळ्याकाठी तो दिलनशी बार असावा, अगदी आतल्या अंधाऱ्‍या परमिट रुम ऐवजी बाहेरच हिरवळीवर अड्डा जमवण्याची मुक्त मुभा असावी, संध्याकाळची वेळ, पुनवेचा चंद्रप्रकाश, डीश भरुन ओसंडणारा आवडता चटपटीत चकणा अन् निमुळत्या ग्लाससोबत आवडीच्या ब्रँडची 'ती' उभी असावी! मित्रांनो आलं ना ध्यानात? अशा आल्हादक वातावरणात चंद्रकोरीसारखी शनैःशनैः काळजावर चढणारी तिची मऊ मुलायम नशा शब्दांत पकडता कशी येईल?