Skip to main content

जीवनमान

शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 03/05/2011 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
सबसिडी कुठाय? गेल्या अनेक वर्षापासून मी ऐकत आलोय की शेतीला भरमसाठ सबसिडी दिली जाते. शाळा-कॉलेजात शिकत असताना पहिल्यांदा ‘शेतीची सबसिडी’ हा शब्द ऐकण्या-वाचण्यात आला. अगदी तेव्हापासून मी शेतीत सबसिडी कुठे आहे म्हणून शोधण्यासाठी जिवाचा आटापिटा करत बसलोय; पण मला काहीकेल्या ही शेतीतली सबसिडी गवसतच नाहीये. बहुतेक तळहातावरच्या केसासारखीच ही ‘शेतीची सबसिडी’ सुद्धा अदृश्य स्वरूपात अस्तित्वात असते की काय, किंवा मीच तर अंधार्‍या खोलीत नसलेले काळे मांजर शोधत बसलो नाही ना? असा एक प्रश्न आजकाल माझा मलाच पडायला लागला आहे.

शिट्टी अन सोडा

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 02/05/2011 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा धगधगू लागला की पोटातली भगभग थंड करण्याकामी चौक गाठावा लागायचा. तिथे मन्सूरभाईचा दाढीमय चेहरा आपल्या हातगाडीभोवती जमलेल्या गर्दीतून कधीतरी झळकायचा. तो सतत आपल्या कामात गर्क असलेला दिसायचा. भर उन्हात काहिली कमी करावी म्हणून पावलं आपोआप मन्सूरभाईच्या गाडीकडे वळायची. त्याची हातगाडी म्हणजे रंगीबेरंगी थंड पेयांचं आगरच होतं. बर्फाचा तुकडा किसून छोट्या ग्लासात काडीसह दाबायचा व अखंड बाहेर काढून त्यावर तिरंगी वेगवेगळ्या बाटल्या उपड्या करुन रंगकाम केले की झाला दिलचाहा बर्फाचा गोळा तयार! तो काडीने आडवा धरुन त्यातील थंड गोड पाणी सुर्रऽऽ करुन पिणे म्हणजे रणरणत्या दुनियेत शितलतेचा अमृतवर्षाव ठरायचा.

टक्कल

लेखक utkarsh shah यांनी सोमवार, 02/05/2011 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं काय झालं.... (असा सुरुवात केल्याने सगळे लक्ष देऊन ऐकतात अस अनुभव आणि बहुधा पु. ल. देशपांडेनी पण सांगितलाय... असो.) परवा दिवशी PMT स्टॉपवर उभा होतो. सगळ्या PMT कचरा भरल्यासारखे वाहत होत्या... कोणतीच बस आमच्या स्टॉपवर थांबत नव्हती. रिक्षावाले इतके पैसे मागत होते की त्यात अजुन थोडे पैसे टाकले असते तर एक नेनो आली असती.तर तिथे आमचे एक काका भेटले.काका म्हणजे शेजारी राहत होते.

जंक फूड चं घातक जाळं

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 30/04/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी मी माझ्या मैत्रिणी बरोबर जवळच्या मॉल मधे खरीदी करायला गेले होते. सोबत तिचा ३ वर्षाचा मुलगा- रोहन पण होता. मॉल च्या दारातच एक मोठा विदुषक होता जो सर्व मुलांना फुगे देत त्यांच्या 'फास्ट फूड' रेस्टॉरन्ट मधे यायचा आग्रह करत होता. ते बघताच रोहन 'मम्मा फ्राईज' 'मम्मा बर्गर' 'मम्मा आईस्क्रीम' अश्या बऱ्याच विनवण्या व मग हट्ट करू लागला. तिथून त्याला कसं बसं समजावून पुढे निघालो तर तो 'कुकीझ' म्हणून ओरडला. आई तशीच पुढे निघून जातीये हे लक्षात येताच, त्याने तिथेच फतकल मारून चांगलाच गोंधळ घातला. शेवटी वैतागून माझी मैत्रीण त्याला फूड कोर्ट मधे घेऊन गेली आणि त्याचे हट्ट पुरव्ल्यावरच तो शांत झाला.

बाय बाय क्लिक क्लॅक डिंग!!!!

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 30/04/2011 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
क्लिक क्लॅक डिंग!!!! एकेकाळचा अनेक ऑफीसातून येणारा सगळ्यात नेहमीचा आवाज. टाईपरायटरचा आवाज. टाईपरायटर तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल. मीही लहानपणापासून पाहत आलो आहे. हा टाईपरायटर घरात कधी आला हे नक्की आठवत नाही मात्र तो घरी होता. तेव्हा आमचं दहिसर हे मुंबईचं एक उपनगर असलं तरी त्याला एक गावपण होतं. गावातून एक 'वाहती' नदी होती. (माझ्या कळत्या वयापर्यंत तिचं पाणी दुषित व्हायला लागत असलं तरी निदान वाहतं होतं.) गावठणाबाहेर असलेलं विठ्ठलाचं कौलारू मंदीर ही गावातली महत्त्वाची जागा होती.

मिपाकर स्वच्छंदी पाखरू यांचे अभिनंदन...

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी मंगळवार, 26/04/2011 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
आपले मिपाकर आणि आमचे मित्र स्वच्छंदी पाखरु यांना नुकतेच २० एप्रिल २०११ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले.... त्याबद्दल समस्त मिपाकरांकडून शुभेच्छा!... ...जाम गोड आहे पोरगी...! सध्या ते स्वतः स्वगृही... मायदेशी असलेने फोटु टाकु शकत नाहीत. वेळ मिळाला कि टाकतील!.. तरी त्याना शुभेच्छा आणि नविन बाळाला आशिर्वाद...!