Skip to main content

जीवनमान

We The People of India....१

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 18/01/2012 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, येथे मिपावरती भारतीय राज्यघटनेवर काही माहितीपर लेखांची एक मालिका लिहायची असे बरेच दिवस आमच्या मनात जे होते त्याची आज आम्ही हा छोटेखानी प्रास्ताविक-लेख लिहून मुहुर्तमेढ करत आहोत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली १९४७ साली जी समिती स्थापन झाली होती त्या समितीने जवळजवळ अडीच ते तीन महिने अथक परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटना तयार केली, जी आपण स्विकारली आणि अंगीकारली. ही भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ एक कायद्याचे जाडजूड निर्जीव पुस्तक नव्हे, तर गीता, बायबल, कुराण यांच्या तोडीची आणि

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप

लेखक यकु यांनी सोमवार, 16/01/2012 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४ सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला. झपाट्याने पुढे गेलो. मागच्या आश्रमाच्या पायर्‍यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ‍ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली.

जे काही आहे ते सगळंच 'तत्त्वमसि' आहे!

लेखक मेघवेडा यांनी सोमवार, 16/01/2012 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज कित्येक दिवसांनी आलोय तुझ्याजवळ निवांतपणे. तुझं हे सौंदर्य नेहमीच मला भुरळ घालतं, आजही घालतंय! हे मोहक रूप डोळ्यांत साठवून घ्यायला उभा जन्मही अपुरा पडावा. तुझ्याजवळ कधीही येऊन बसलो की खूप शांत, प्रसन्न वाटतं. हलकेच तुझ्या कुशीत गाढ झोप लागते नि रोजच्या दगदगीने थकलेल्या मनाला खूप आराम मिळतो. डोळ्यांना सुखावणारी ही दाट वनश्री, सोनसळी नव्हाळी ल्यालेली ही साळीची शेतं, भयाण गडगडाटांनी आसमंत भरून टाकणारे ते कृष्णमेघ, जीवाच्या आकांताने कोसळणार्‍या त्या जलधारा, त्या तिकडे मखमली गालिच्यावर लकाकणारी सोनेरी उन्हं, ही अवखळपणे डोंगरदर्‍यांना गुदगुल्या करत बागडणारी नदी - अरे आणखी किती वेड लावशील?!

का उमजत नाही ?

लेखक गणेशा यांनी सोमवार, 16/01/2012 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20432 आणि डिस्क्लेमर : कृपया धाग्याला फक्त उत्तर द्यायचे म्हणुन हे लिहिलेले नाही.. आणि ते शुद्धलेखनाबद्दल ही जाताजाता माफी असावी .. ------------------- माणसाच आयुष्य अस असत, की बरेचश्या गोष्टी करायचय राहुन जातात.. आपलेच बघा ना , कॉलेजला असताना आपल्याला नाटक ही आवडत होते , फुटबॉल ही खेळायला आवडत होते.. मोठ्यांचा आदर ठेवुन होतो म्हणुन ( आणि स्व कमाई करत नसल्याने ही) त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणे हे व्रत माणत होतो... पुढे जाऊन शिकल्या सवरल्यामुळे नोकरी धरलेली .. बायको.. मुले..

क्रुझची सफर -- टेक्सास ते मेक्सिको - १

लेखक टुकुल यांनी सोमवार, 16/01/2012 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न होवुन एक वर्ष भरभर गेले आणि लग्नाचा पहिला वाढदिवस जवळच आला होता, बायकोला आधी एकदा म्हणालो होतो कि आपण कधीतरी क्रुझ वर फिरायला जावु. आता अस बोललोच होतो आणी काहीतरी वेगळे म्हणुन विचार केला कि लग्नाचा पहिला वाढदिवस क्रुझ वर साजरा करुयात. एका मित्राच्या अनुभव आणी सल्ल्यानुसार, दोन एक महीने आधिच चौकशी सुरु केली. ठरवलेल्या दिवशी ऑफिसमधुन सुट्टी भेटायची पण खात्री नव्हती. विचार केला जे होईल ते बघता येईल, आधी बुकींग करुन टाकुत. लग्नाच्या तारखेला बोटीवर असु एवढी एकच अट ठेवुन सुरु केली शोधाशोध आणी कार्नीवलची गॅलव्हेस्टन -- प्रोग्रेसो -- कोझुमल -- गॅलव्हेस्टन अशी पाच दिवसांची सफर बुक केली.

नर्मदा परिक्रमा - पुस्तकांची एकत्रित माहिती

लेखक निनाद यांनी सोमवार, 16/01/2012 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
नर्मदा परिक्रमा विषयावरचे यशवंताचे रसाळ लेखन वाचले. मग थोडी शोधा शोध केली तर ही माहिती हाती लागली. आशा आहे कुणाला तरी उपयोग होईल. नर्मदा परिक्रमा- इतिहास सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर सुरू होते. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. स्कंदपुराणात नर्मदेचं वर्णन आले आहे असे म्हणतात. पायी केल्यास ही यात्रा 3 वर्षे 3 महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. ही यात्रा अतिशय खडतर आहे.