काल काही कामानिमित्त वाशीला गेलो होतो. परत येताना साहजिकच पाम बिच रोड पकडला. संध्याकाळचे सहा वाजुन गेले होते. अंधार पडायला सुरूवात झाली होती. मध्येच पावसाने गाठले म्हणुन एका ठिकाणी थांबलो. पाम बिच रोडवर एका ठिकाणी डाव्या बाजुला एक छोटेसे तळे आहे. बहुदा खाडीचाच भाग आहे तो, तिथे थांबलो. अंधार आणि पाऊस यांच्या शिवणापाणीत रोडवरच्या लाईट्स एवढ्या छान वाटत होत्या की पुछो मत !
आणि पार्श्वभुमीवरचे मेघभारले आकाश ! मोह आवरला नाही.