Skip to main content

चित्रपट

सिनेमा आणि पार्श्वसंगीतातली गाणी....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 01/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कधी-कधी एखाद्या सिनेमात पार्श्वसंगीत म्हणून एखाद्या गाण्याचे तुकडे घुसडल्या जातात. उदा, "सुहाग" ह्या सिनेमात एका शॉट मध्ये, परवीन बाबीच्या एंट्रीला, "बॉनी-एम" चे "मा-बेकर" ऐकू येते. आज ओशन्स-१२ परत बघतांना, "लेझर डान्स"च्या वेळी वाजणारे संगीत आठवले,थोडा-फार शोढ घेतला तर, मुळ गाणे पण मिळाले. हे सिनेमातील पार्श्र्वसंगीत ====>https://www.youtube.com/watch?v=mr834Cs9ncs आणि हे मुळचे गाणे =====> https://www.youtube.com/watch?v=kATa1ypyZCQ तुम्हाला पण असाच काही खजिना मिळाल

अगा जे घडलेची नाही...अर्थात न उडालेले वैदीक विमान !

लेखक स्वप्नांची राणी यांनी शनिवार, 31/01/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्‍या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अ‍ॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही! आपल्या मिकी माऊसचे सायन्सचे प्रयोग यापेक्षा कितीतरी जास्त पटणेबल वाटतात.

टॉरेंटगाथा

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 29/01/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या प्रकाराला ’पोस्टमॉडर्नोत्तर काव्य’ म्हणतात म्हणे. म्हटलं आपणही पाडून बघावी एक पोएम. तर ताजी ताजी पाडलेली ही रेसिपी चाटुनि आता बघणे.
काव्यरस

जा री जा री ओ कारी बदरीया.......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/01/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी कसं होतं ना? एखादा संगीतकार , एखाद्या चित्रपटात एका वर चढ एक सुंदर गीते देवून जातो. मग प्रेक्षकाची - श्रोत्याची अवस्था "देता किती घेशील दोन कराने" (इथे "ऐकता किती ऐकशील दोन कानाने" असे वाचायलाही हरकत नाही ;) ) अशी होवून जाते. पण या सगळ्या आनंदात बरेच वेळा असेही होते की अत्युत्तम असे काही ऐकताना त्याच चित्रपटातील एखादे साधेच पण नितांत सुंदर असलेले गाणेही नकळत दुर्लक्षीत होऊन जाते. आता हेच बघा ना. श्री. एस.एम.श्रीरामलु नायडू या यंडु गुंडू वाटणार्‍या नावाच्या माणसाने १९५५ साली युसुफसाब उर्फ दिलीप कुमार आणि मीनाकुमारी यांना घेवून 'आझाद' नावाचा एक तद्दन मसालापट काढला.

मेरा सुंदर सपना बीत गया.....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 22/01/2015 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वप्रकाशित ... ती एक न उलगडलेलं कोडं होती. एक अधुरी राहून गेलेली कविता होती. तीन दशक..., जवळजवळ तीन दशके तीने आपल्या नजाकतभर्‍या , मादक स्वरांच्या जोरावर रसिकांच्या मनावर अनभिषीक्त साम्राज्य गाजवलं. तिच्यावर हिंदी सिनेसृष्टीबरोबरच तिच्या नशिबाने, तसेच जवळच्यांनीही खुप अन्याय केलेला आहे. 'सुजाता' मध्ये एक गाणं आहे.

बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 21/01/2015 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
नववी - दहावीचा काळ , खासकरून दहावीचा काळ थोडा विचित्रच होता, किंबहुना तो तसा असतोच. विचित्र एवढ्यासाठी की बरोबरच्या कुठल्याही मित्राला अगदी सुटीच्या दिवशी जरी विचारले,"चल बे, पिक्चर टाकु आज" , तर एकच उत्तर मिळायचे ... "नाही बे, दहावीचे वर्ष आहे. अभ्यास कसला डेंजर आहे. आई-बाबा हाणतील धरुन पिक्चरला जातो म्हण्लं तर." मला हे थोडंसं विचित्रच वाटायचं कारण माझ्या आई-वडीलांनी मला कधीच अभ्यासाला बस म्हणून तंबी दिल्याची आठवत नाही. परीक्षेला गुण कमी पडले म्हणून शिव्या किंवा मार बसल्याचे आठवत नाही. (एक बारावी सोडली तर कधीच ७०% च्या खाली आम्ही उतरल्याचेही आठवत नाही ही गोष्ट अलाहिदा).

नवे संस्थळः पाहावे मनाचे! तुमचे स्वागत आहे

लेखक पाहावे मनाचे यांनी शुक्रवार, 16/01/2015 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत अनेक प्रकारच्या लेखनाला वाहिलेली काही संस्थळे अस्तित्वात आहेत. त्यावर उत्तमोत्तम ललित लेखन, माहितीपूर्ण लेखन, चर्चा, पाककृती, कथा, कविता इत्यादी अनेक गोष्टींची रेलचेल असते. मात्र एखाद्या विशिष्ट चौकटीत किंवा विषयाला धरून लिहिले जाणारे लेखन, ब्लॉग्जच्या स्वरूपात विखुरलेले आहे. याच दरम्यान, गेल्या महिन्यात आम्ही काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन आमच्या आवडत्या विषयाला वाहिलेले संस्थळ काढायचे ठरवले - आणि लगोलग बनवले देखील.

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 15/01/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

लोकमान्य - एक युगपुरुष

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 05/01/2015 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

कोटीच्या कोटी उड्डाणे !!!!

लेखक चिनार यांनी रविवार, 04/01/2015 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मनोरंजन" या शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसागणिक बदलते.कोणाला काय आवडेल किंवा कोणाचे कशाने मनोरंजन होईल ह्याला काही नियम नाही.मराठी किंवा हिंदी सिनेमांच्या बाबतीत तर ही गोष्ट तंतोतंत लागू पडते.  म्हणूनच तर "प्यासा" च्या देशात "दबंग" सुद्धा हिट होतो. चला एकवेळ मान्य करू की दबंग मध्ये सलमान खान तरी होता . पण मराठी प्रेक्षकांनी ऐकेकाळी  अलका कुबल चे सिनेमे सुद्धा डोक्यावर घेतले होते. हिचे सिनेमे बघून तर गांधीजींची सुद्धा सहनशक्ती संपून त्यांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला असता.