Skip to main content

अर्थव्यवहार

पैशाचे झाड- भाग शेवटचा

लेखक अतरंगी यांनी मंगळवार, 31/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 भाग ५ https://www.misalpav.com/node/51053 दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळीच अमोलचा मेसेज आलेला पाहून अभिने कुतूहलाने तो मेसेज ऊघडला.

पैशाचे झाड- भाग ५

लेखक अतरंगी यांनी सोमवार, 30/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 अमोलच्या डोक्यात चाललेल्या विचारांनी त्याला चांगलंच पछाडलं होतं. त्याला जितका विचार करु तितके जास्त प्रश्न पडत होते. गुंता वाढतच चालला होता.

पैशाचे झाड- भाग ४

लेखक अतरंगी यांनी गुरुवार, 26/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 विनितची तब्येत हळूहळू सुधरायला लागली होती. तोडकं मोडकं का होईना समोरच्याला कळेल असे तो बोलायला लागला होता, शरीराची पण थोडीफार हालचाल करायला लागला होता. विनितला आलेल्या अ‍ॅटॅक नंतर नेहमीच्या मैफिलींमधे जरा खंड पडलाच होता. बर्‍याच महिन्यांनी अचानक एके दिवशी नित्याने प्लॅन बनवला. त्याच्याच घरी पार्टी ठेवली होती.

पैशाचे झाड भाग :-३

लेखक अतरंगी यांनी बुधवार, 25/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 " अभ्या कुठे आहेस?" " गावातच आहे, का रे?" "विनितला पॅरेलेसिसचा अ‍ॅटॅक आलाय, रुबीला नेलंय. " " निघतो लगेच. पंधरा मिनिटात पोचतो.' एकेचाळीसाव्या वर्षी अ‍ॅटॅक यायला विनितची अनुवंशिक जाडी, त्याचे कामाचे स्वरुप, खाण्या पिण्याच्या सवयी, सगळेच कारणीभुत होते. कमी हालचाल, त्यात त्याला व्यायमाची फार आवड नव्हती. सगळेच जमेल तसे धावत पळत रुबीला पोचले. सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता.

पैशाचे झाड भाग :-२

लेखक अतरंगी यांनी मंगळवार, 24/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
पैशाचे झाड भाग : १. https://www.misalpav.com/node/51032 हो नाही करत शेवटी ऐन वेळी कोणाचेही कॅन्सल न होता, कोणतेही विघ्न न येता, ठरल्याप्रमाणे सगळा गृप कोकण ट्रिपला निघाला. बर्‍याच दिवसांनी सगळे जण एकत्र ट्रिपला निघाल्यामुळे थट्टा मस्करीला पार ऊत आला होता. क्षणाक्षणाला हसण्याचे फवारे फुटत होते. नवे- जुने संदर्भ घेऊन एकेकावर धपाधप जोक्स पडत होते. प्रत्येक वेळेस मुले गाडीतच पेग भरायला लागली की आनंदच्या मनात धाकधूक होत होती. अजून नव्या गाडीची नवलाई संपली नव्हती. पाच जणात दोन खंबे कधी संपले पत्ता पण नाही लागला.

पैशाचे झाड- भाग १

लेखक अतरंगी यांनी सोमवार, 23/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो" "बोल" " कुठे आहेस?" " घरी" "किती वेळ लागेल?" "का?" "अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?" "कोण थांबले आहेत? आणि कुठे?" विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय? "अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?" "नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? " "नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.." "स्टॉक आहे की घेऊन येऊ?" "अरे तीन खंबे आहेत, सगळे आज लोळत नाहीतर झिम्मा खेळतच घरी जाणार आहेत.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

लेखक पराग१२२६३ यांनी मंगळवार, 18/10/2022 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

लेखक पराग१२२६३ यांनी मंगळवार, 18/10/2022 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

चक्रव्युह....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 02/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा सापळे इथे माणसाचे माणसाला पकडावया वैखरीतून पेरती मोहाचे दाणे सावज घेरावया अठरा औक्षहिणी सेना यांची,चक्रव्युह मांडला घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले कपटींनी कपट करून भ्रमणध्वनीतुन चोरले भेदिले शुन्यमंडळा, रिता केला भाता अभिमन्युचा राहीला न वाली कोणी राहीला न भ्राता..... २-९-२०२२
काव्यरस

Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

लेखक hrkorde यांनी रविवार, 19/09/2021 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले होते. 14500 मे कॉल व पुट सेल केले 14500 जून कॉल व पुट बाय केले. नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात. चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो . 15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते . ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात १.