Skip to main content

अर्थव्यवहार

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४

लेखक अबोली२१५ यांनी शनिवार, 10/12/2016 17:02 या दिवशी प्रकाशित केले.

या फोन नंतर मी माझ्या नवऱ्याशी बोलली काय वाटतंय तुला. तर तो बोलला कि Mr. परेश फक्त आणि फक्त पैसे आणा एवढच बोलत होता. त्याने मला समजेल असं काहीही सांगितलं नाही आहे. त्याला पैशाची घाई लागलीय. मला पटायला लागलं होत. या वर तुझ्या मित्र राजकारणात आहे त्याला Mr. परेशी माहिती काढायला सांग असं सुचवलं. मी त्याला सांगितलं कि तो लोढा ग्रुप मध्ये civil engineer आहे , आणि तो आपल्या गल्लीतच्या जवळच राहतो. यावर नवऱ्याने शांत राहणे पसंत केलं ;)

Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २

लेखक अबोली२१५ यांनी शुक्रवार, 09/12/2016 17:17 या दिवशी प्रकाशित केले.

त्यानंतर त्याने मला सांगितलं कि तुला यात काही अमाऊंट गुंतवावी लागेल कारण या अमाऊंट मधून तुझं इ -शॉपीचा ID विकत घ्यावा लागेल ती अमाऊंट ३. ५० लाख , ५. ५० लाख, ७. ५० लाख, १०. ५० लाख आणि या पुढे तू कितीही टाकू शकतेस. यावर मी ३. ५० लाख गुंतवू शकते कारण मी कोणाकडे मागायला जाऊ शकत नव्हती माझे आई बाबा भारत बाहेर होते आणि मी सासू सासऱ्याकडे मागु कसे? जे काही होत ते मला माझ्या जबाबदारीवर उभं कराच होत. मी त्याला माझा पैशाचा प्रॉब्लेम आहे पण मी बिझनेस साठी टाइम मॅनेज करू शकते असं सांगितलं.

...मग असे द्या पैसे!

लेखक निनाद यांनी मंगळवार, 15/11/2016 03:21 या दिवशी प्रकाशित केले.

कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या.
तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे! दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/युनिफाईड_पेमेंट_इंटरफेस

(पडुन आहे नोट अजुनी)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 14/11/2016 14:10 या दिवशी प्रकाशित केले.

पडुन आहे नोट अजुनी, राजसा थकलास का रे?
एवढ्यातच रांग सोडुन, तू असा बसलास का रे?

अजुनही सरल्या न गड्ड्या, त्या हजारापाचशेंच्या
अजुन बँका सरल्या कुठे रे, हाय तू हरलास का रे?

सांग, नोटा शोधणाऱ्या पंटरांना काय सांगू?
उगवले एजंट सारे, आणि तू निजलास का रे?

बघ तुला दिसतील नंतर मॉरिशसच्या चोरवाटा
गोरगरिबांच्या अकाउंटांस वापरलास का रे?

उसळती खोक्यांत साऱ्या पाचशेच्या बंद नोटा
आयटीच्या रेडला तू आज घाबरलास का रे?

- स्वामी संकेतानंद

नोटा व्हाईट...दारु वाईट.....

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 12/11/2016 19:40 या दिवशी प्रकाशित केले.

दि. ८ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ८.४५
मन्याचा व्हाटसपवर मेसेज
५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या.
मी: गप्पे कडू. फोटोशॉप आहे ते.
.
अर्ध्या तासात ५० मेसेज. वेगवेगळ्या चॅनेलचे.
च्यायला एवढे फोटोशॉप कोण करणार नाही.
खिशात पाहिले. ५०० च्या ४ आणि हजारची एक आहे फक्त.
रात्री तर काही करता येणार नाही नोटाबाबत आपल्याला.
जाउ द्या, जे सगळ्यांचे होईल ते आपले पण.
जास्त विचार करण्यात अर्थ नाही.
.
रात्री कन्फर्म मिळाली बातमी.
वाचून निवांत झोपलो विचार न करता.
.
दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.००
पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी.

अपुले प्रधानमंत्री मोदी

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 11/11/2016 23:56 या दिवशी प्रकाशित केले.

('जगण्याचे भान हे' गाण्याच्या चालीवर रचलेले काव्य)

देशाचे प्रेम उसळले..

पाचशेचे नोटच गळले..

हजारला कीड लागली..

भ्रष्टांची गल्लत फसली..

मोदींचा निर्णय एकला....

भुरट्यांना केले कंगाल..

बॅंकांची भलती उलाढाल..

उधळून तो काळा पैसा शेठ मावळले....

अकलेचे झाड हे मोदी अपुले..

देशाचे हाड हे मोदी अपुले..

हम्म.. वट ती शेठांची झालीया फुसकी..

झालीया सार्या नेत्यांची मासकी..

जातच नाही गळ्यातून व्हिसकी..

काळी ती नोट निघाली नासकी..

नि:वस्त्र झाले..

भ्रष्ट पळाले..

इन्स्टिस्ट्युशनालायझेशन (institutionalization)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 22/07/2016 04:43 या दिवशी प्रकाशित केले.

भारतरत्न सचिन.... या धाग्यावर संदीप डांगे याच्या https://www.misalpav.com/comment/860347#comment-860347 या प्रतिसादावर चाललेल्या पॉप्युलॅरिटी, स्टार व्हॅल्यु आणि ब्रँड व्हॅल्यु यांच्या चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यावा म्हणुन इन्स्टिस्ट्युशनालायझेशनवर (institutionalization) काही लिहिले. ते जरा लांबत गेले. त्या धाग्यावर फार अवांतर होऊ नये यासाठी ते दोन पैश्याचे नाणे इथे स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले आहे.

==========================================================