Skip to main content

अर्थकारण

राम .. राम .. राम ..

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 28/09/2012 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम... राम... राम... राम ... माळ घेऊन माझा जप चालू आहे कानावर बातमी पेट्रोल डिझेल महागले राम .. राम .. राम .. माळ घेऊन जप चालू कानावर बातमी कोळसा घोटाळा जलसिंचन घोटाळा राम . राम. जप चालू राम . सिलेंडरची टंचाई मरा.. मरा.. मरा... आजकाल माझा जप नीट का होत नाही, माझ्या रामालाच ठाऊक ! .

Samsung विरुद्ध Apple

लेखक गुरुनाथ्काळे यांनी बुधवार, 29/08/2012 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा करहो. बरेच वर्ष मी मिपा वर वाचनीय होतो. पण आज न राहावून.. निमित्त काढून लिहिता झालो.

ज्यां दूधकि नदियां बाहे...

लेखक आळश्यांचा राजा यांनी शनिवार, 11/08/2012 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
१९७६ साली, म्हणजे माझ्या जन्माच्या जवळपास प्रदर्शित झालेला "मंथन" मी आजवर पाहिला नव्हता. मला आता राहून राहून याचे आश्चर्य वाटतेय. म्हणजे गाजलेला प्रत्येक सिनेमा मी पाहिलेलाच आहे, किंवा पाहिलेला असायला हवा वगैरे काही मनात नाही; पण माझ्याच डोक्यात घोळत असलेल्या "प्रांतांच्या गोष्टीं" च्या अनेक बीजांपैकी एक जणू साकार होऊन चित्रपटरुपात आपल्या समोर येतंय असं वाटत राहिलं. म्हणून आश्चर्य. ही समीक्षा नाही. चित्रपट समजणे आणि तो समजाऊन सांगणे एवढी प्रगल्भता माझ्याकडे नाही. हे एक शेअरिंग आहे. चित्रपट गाजलेला तर आहेच.

फंडामेंटल विश्लेषण

लेखक सदानंद ठाकूर यांनी शनिवार, 04/08/2012 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
फंडामेंटल विश्लेषण फंडामेंटल विश्लेषण म्हणजे काय? फंडामेंटल (मुळतत्वावर आधारीत) विश्लेषण म्हणजेच पारंपारीक बाबींचा विचार करुन व कोणत्याही प्रकारच्या स्पेक्युलेटिव्ह (भविष्यातील संभाव्य घटणांचा) विचार न करता केलेले विश्लेषण असे म्हणता येईल कारण हे दलाल स्ट्रिटवर होणा-या उलथापलथीशी संबधीत नसते व ते खालील तिन बाबींचाच विचार करुन केले जाते. १) अर्थव्यवस्था २) औद्योगीक वातावरण (उद्योग) ३) कंपनी मुळतत्वावर आधारीत विश्लेषण करताना वरील तिन्ही घटकांचा एकत्रीत पणे विचार करावा लागतो व वरीलपैकी कोणतीही एक बाब वगळून ते करता येत नाही.

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 03/08/2012 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून. त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह! - २

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 03/08/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावरचा मूळ धागा बिपिन कार्यकर्ते यांचा आहे. शीर्षक तेच घेऊन भाग दोन असे स्वरूप केले आहे. त्यासाठी त्यांची परवानगी घेतलेली नाही. त्याबद्दल क्षमस्व. काल मंत्रालयात बैठक झाली. पतंगराव कदम आणि रामराजे नाईक-निंबाळकर त्यावेळी होते. माझ्या मंत्रालयीन स्रोतांकडून मी त्या बैठकीसाठीच्या टिपणातील एक कागद मिळवला आहे. तो नुकताच हाती आला. हे एक कोष्टक आहे. जलसंपत्ती खात्याने तयार केलेले. ते जसेच्या तसे खाली देतोय. या संस्थळाच्या प्रत्येक सदस्याने त्या कोष्टकाचा आपापला अन्वयार्थ लावावा, येथे मांडावा. धरणग्रस्तांचे मुद्दे खरे-खोटे ठरवावेत. यानिमित्ताने तुमच्या मनात येणारे प्रश्न येथे उपस्थित करा.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 25/07/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आजचा दिवस कसा जाणार आहे किंवा आत्ता इथे आहोत, दिवस संपताना कुठे असणार आहोत वगैरे काहीच आपल्याला माहित नसतं. याचं अगदी शब्दशः प्रत्यंतर मला आलं, परवा, २२ जुलैला. दिवस सुरू झाला पुण्यात आणि अगदी अनपेक्षितपणे संपला मेंढ गावात, जितूच्या घरी. *** गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'.

मंदी आली का हो !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 15/07/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवाची गोष्ट. आमचा एक मित्र आहे. नुकतेच त्याचे कॉलेज संपले. नोकरीच्या शोधात आहे. म्हणून त्याचा बायो डेटा एका परीचिताकडे पाठवला. हा परीचित एका बँकींग क्षेत्रासाठी आय टी सर्व्हिस देणार्‍या कंपनीत काम करतो. म्हणाला 'अहो चूकीच्या वेळेला आलात." मागील आठवड्यातच आमच्याकडे काही शे लोकांना नारळ दिला. आम्हालाही नोटीस मिळालीये. निरोप समारंभ ३ महिन्यांनी होणार आहे. म्हणून तो बायोडेटा घेऊन गेलो दुसर्‍या मित्राकडे. त्याचे कम्पनी जागतिक, त्यामुळे बेंचही जागतिक.