Skip to main content

विरंगुळा

स्मरण चांदणे२

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 06/08/2021 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण चांदणे२       दिवस कलत असताना,आता लवकरच सुर्यास्त होणार याची जाणीव होऊ लागते,तो होऊ नये अशी काहींची  ईच्छा असते. ते तर शक्य नसते.ते सकाळच्या आठवणीत रमतात.दिवस संपण्याच्या वास्तवाचे विस्मरण होते काही क्षण! बालपणाचे गोडवे अनेकांनी गायले आहेत. लहानपणी काही कळत नसते,म्हणून आपण सुखात असतो,निर्धास्तअसतो.आईवडिलांच्या ,मोठ्यांच्या छायेत सुरक्षित असतो.जीवनाच्या वास्तवापासून दूर,अज्ञानातला आनंद उपभोगत!     वय जसजसे  वाढत जाते तस तशा जबाबदा-या वाढत जातात.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ८

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 31/07/2021 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
डोर... २ स्त्रियांची कहाणी. दोन वेगळ्या स्त्रिया, वेगळ्या ठिकाणी राहणार्‍या... एकमेकांना भेटतात कारण त्यामागे एक डोर म्हणजे बंध...

स्मरण चांदणे१

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 30/07/2021 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण चांदणे १       दक्षिणेस पसरलेल्या छोट्या माळाच्या आड दडलेले गाव,म्हणून आडगाव.पाचवी पर्यंतचे शिक्षण गावी झाले. नंतरचे बीडला.त्या काळात,केव्हा सुट्टी मिळेल अन केव्हा गावी जाईन असे व्हायचे.शिक्षण संपून पुढे वकील,सरकारी वकील होतो तेव्हा ही ओढ कायमच होती.आई वडील गावी होते.तिथे आमचे घर होते.एकोणीसशे एकोण्णवदला वडील गेले. तिथले घर बंद झाले.बत्तीस वर्षे झाली.पण अजूनही गाव,तिथली देवळे ,उत्सव,जत्रा,माणसे अन ते दिवस,आठवतात. तिथल्या देवळांशी जोडलेले सण,उत्सव ,जत्रा आठवतात.

|| गे आये ऑलिम्पिकामाते ||

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 23/07/2021 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
|| गे आये ऑलिम्पिकामाते || बा गजानना, मारोतीराया - भीमसेना.... ग्रीकांच्या क्रेटॉस देवा... अथेन्सच्या राणा झीअसा.... जापान्यांच्या सोजोबो देवा.... आज तुमां सांगणो करतंव महाराजा ! दर चार वर्षाप्रमानं आमी तुमची जी काय वेडीवाकडी सेवा केलेली हा... ती मान्य करूं घ्या... त्यात काय चूक-अपराध झालो असंल... तं लेकरांक क्षमा करा...आणि अलास्कापासून जपानपर्यंत आणि हिंदुस्तानापासून सेनेगलपर्यंत सर्वांची रखवाली करा.. सांभाल करा वो महाराजा | आजपासून टोक्योमध्ये जो ऑलिम्पिक खेलांचा घाट घातला असा... तो जगभरातली पोराटोरा, म्हातारे कोतारे, बायाबापड्या साजारो करतत.

सिलींडर ५

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 23/07/2021 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर ५ आडगाव फाटा आणि बैलगाडी ब-याच अंतरावर . गाडीवाल्याला ओरडून ओरडून ओरडून आवाज दिले.पण तो बहुतेक झोपलेला.सिलीडर तिथपर्यंत कसे न्यायचे? खरेतर मामानी सिलिंडर गाडीपर्यंत न्यायला मदत केली असती.ते तयार ही होते.आपणच लग्न जमले असे सांगून पायावर कुर्‍हाड मारून घेतली.आता पश्चाताप करून काय उपयोग? बराच विचार केल्यावर युक्ती सुचली.सिलिंडर आडवे केले,व लहान मुले गाडी गाडी खेळतात तसे ढकलत नेऊ लागलो.

सिलींडर ४

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 22/07/2021 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर ४ लग्नघरातून सुटका झाल्यावर,टेम्पोजवळ व-हाडाची वाट पाहात थांबलो.ड्रायव्हर क्लिनर बिड्या ओढत उभे होते.साडेचार वाजतआले होते.हळूहळू एक एक करत किरकोळ व-हाडी,किरकोळ सामानासह टेम्पोकडे येऊ लागले.काही वेळाने,बॅंडचा आवाज येऊ लागला.कपाळी मुंडावळी,हाती मोत्याच्या नारळाची दुरडी घेतलेला,डोक्यावरचे टोपी मुळे जास्तच बावळट दिसणारा नवरदेव,मागे कणकेचे दिवेअसलेले ताम्हण हाती घेतलेली करवली,वरमाय व इतर महत्वाची माणसे वाजत गाजत वरातीने आली.नशीब ,त्या काळी लग्न कायदेशीर ठरण्यासाठी वराती समोर नाचायचा विधी अनिवार्य नव्हता.नाहीतर रात्रीचे बारा इथेच वाजले असते.सामान आणि पॅशींजर टेम्पोत चढवणे,बसवणे मोठे अवघड काम

डोक्याला शॉट [सप्तमी]

लेखक गड्डा झब्बू यांनी बुधवार, 21/07/2021 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

सिलींडर ३

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 21/07/2021 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर ३ ( विशेष सूचना: या कथेतील मी ,सिलिंडर व टेम्पो वगळता,इतर पात्रे व प्रसंग पूर्णपणे काल्पनिकआहेत) सरळ चाललेला टेम्पो ,अचानकतालखेड गावाकडे वळला.'अरे हे काय'?इकडे कशाला,सरळ जायचंय नं?'मी विचारले.' "तालखेडला सामान खाली करायचंय आणि एक भाडं आहे वकील साहेब,जास्त वेळ नाही,दहा पंधरा मिनिटं लागतील.''दात विचकत त्याने टेम्पो पुढे दामटला.मी दात खात बसलो. टेम्पो गावात शिरला. आधी एका दुकानावर सामान  उतरवले.आता फक्त सिलिंडर राहिले.

उठो द्रौपदी, वस्त्र संभालो, अब गोबिंद ना आयेंगे|

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी मंगळवार, 20/07/2021 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
एका कथा स्पर्धेत मी भाग घेतला होता. आयोजकांनी पहिल्या काही ओळी दिलेल्या होत्या त्या तशाच्या तशा सुरवातीला वापरून पुढे कथा रंगवायची अशी स्पर्धा होती. शब्दांचीही मर्यादा होती. कथेचं शीर्षक आपणच ठरवायचं होतं. अटलजींच्या एका सुरेख कवितेचं नाव मी शीर्षक म्हणून वापरलं आहे. सुरवातीच्या बोल्ड इटॅलिक्समधल्या ओळी आयोजकांनी दिलेल्या होत्या. दुसरं बक्षीस मिळालं त्या अर्थी कथा बरी जमली असावी. ही तुमच्यासाठी . . . .

सिलींडर २

लेखक नीलकंठ देशमुख यांनी मंगळवार, 20/07/2021 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर २ सुरुवातीचा प्रवास साधारण रितीने,ब-यापैकी झाला. म्हणजे टेम्पो आपला,आपल्या गतीने  चालला होता.टेम्पोचा वेग लक्षात घेता 'चालला'होता म्हणणेच योग्य.अंदाजे अर्ध्या तासानंतर,रस्त्यावर उभ्या असलेल्या एका पटकाधा-याने हात दाखविला.टेम्पो थांबला.म्हणजे ड्रायव्हरने थांबवला.पटकाधा-याला जवळच्या  गावाला जायचे होते.तो एकटा नव्हता.सोबत दोन शेळ्या होत्या. ड्रायव्हरने उदार अंतःकरणाने त्या सगळ्यांना टेम्पोच्या मागील भागात सामावून घेतले.आणि आपल्या खिशात काही नोटाही.टेम्पो पुढे निघाला.वाटेत मधून मधून लोक हात दाखवत .ड्रायव्हर  टेम्पो थाबंवे.ड्रायव्हर आणखी कांही पॅशींजरना सामानासहीत टेम्पोमधे,