विरंगुळा
स्प्लीट टोनिंग ( विषय :- व्यवसाय )
मंडळी कॄष्ण-धवल छायाचित्रण करण्यात मजा येते तसेच याच कॄष्ण-धवल चित्रांना हलक्या रंगाची छटा दिल्यास त्यात अजुन वेगळेपणा देखील आणता येतो... हेच स्प्लीट टोनिंग करण्यामागचा उद्देश असतो.मूळ चित्र आणि चित्रातल्या सावल्या यांना विविध कलरटोन मधे आणल्यास छायाचित्राला एक प्रकारचा वेगळेपणा येतो.
मी मात्र संपूर्ण चित्रालाच एकाच टोन मधे ठेवले आहे, फक्त कलरटोन वेगवेगळे वापरले आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत एकदा वापरुन पहाच...
मनरक्षिता (३)
मनरक्षिता (१)
मनरक्षिता (२)
सकाळी उठल्यावर चैतीला सपान आठवलं. अंघोळ वगैरे आवरून आज्जीने दिलेला डबा घेतला अन भीत भीतच ती शाळेत गेली.
मास्तर अजून शाळेत आला नव्हता !
तासाभरानं महादू शिपाई सांगत आला. ‘पोरानु, मास्तरला फाटेच्या पारी लकवा मारलाय. एक हात अन एका बाजूच्या अंगावरनं सगळं वारं गेलंय. उठायसुदिक यीना झालंया..!!
‘हुर्रे’ करून सगळी पोरं उधळली.
चैती सपान आठवत घरी आली. पण कुणालाच सपनाबद्दल काय बोलली नाही. आज्जीला सुद्धा !
चार दिवसांनी शाळेत नव्या बाई हजर झाल्या. हसऱ्या, गोड बोलणाऱ्या.
माझी कृष्ण-धवल छायाचित्रकारी.....(कलादालनात टाकता येत नाही म्हणून येथे टाकत आहे )
काही महिन्यापूर्वी एकदम कृष्णधवल छायाचितत्रांनी मनाचा ताबा घेतला आणि त्यातून तयार झाली ही छायाचित्रे......
एका मित्राच्या अत्यंत जुन्या म्हणजे बघा पेशवेकालीन वाड्यात गेलो असताना ही जुनी जाळी आणि त्यावर चढलेला हा वेल नजरेस पडला. जाळीचे टेक्स्चर व मनीप्लँटचा वेल....
मनी प्लँट...
देवळातील शिल्पे मला नेहमीच कृष्णधवलमधे भावतात.
देवळातील शिल्पे मला नेहमीच कृष्णधवलमधे भावतात.मनरक्षिता (२)
मनरक्षिता (१)
चैतीला आठवत होतं तसं ती अन आई दोघीच रहात होत्या. तिचा बाप मोठा उमदा माणूस होता असं आई सांगे. गावाशी दावा मांडून जोगतिणीच्या पोरीबरोबर लग्न करणारा हिम्मतवान गडी ! ताराबरोबर लग्न केल्यावर तिला गावाचा त्रास व्हायला नको म्हणून राहता गाव सोडून दहा गावापलीकडच्या उंबरगावात राहायला आलेला. चैती तीन वर्षाची असताना एका दहा वर्षाच्या पोराला पुरातनं वाचवायला म्हणून गेला अन परत आलाच नाही. पोर वाचलं पण हा नदीतनं धारेला लागला.
तो गेल्यावर तारानं दुसरा घरोबा केला नाही. चरितार्थाला काम शोधण्याचा खूप प्रयत्न केला.
एक स्वप्न प्रवास (१२)
मागील दुवा http://misalpav.com/node/18224
प्रिय अॅन
बरेच दिवस. खरेतर बरेच महिने झाले तुला काही लिहीले नाही. पण तुला चॅटवर दिलेले प्रॉमिस मात्र मी अजून विसरलेलो नाहीय्ये. तुला स्वप्नात येवून भेटायचे दिलेले प्रॉमिस पूर्ण करणे हा माझे जन्मदत्त कर्म आहे. ते मी पूर्ण करणारच. ही वाक्ये ऐकून तुला लोकमान्य टिळकांची आठवण झाली असेल. कदाचित नसेल ही. तू लोकमान्य टिळकाना ओळखत नसशील. मलेशियात शाळेत ती शेंगा खाल्याची गोष्ट शिकवतात की नाही ते माहीत नाही अन्यथा टिळकांची आठवण झाली असती. असो.
मागच्या प्रोजेक्ट ने माझी झोप पार उडवून टाकली होती.
गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.
गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.
आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते.
मनरक्षिता ( १)
तिचे पिंगट तपकिरी डोळे भयाने विस्फारले होते. घामेजलेल्या कपाळावर तांबूस भुऱ्या केसांच्या बटा चिपकून बसल्या होत्या. घशातून बाहेर पडू पाहणारा हुंदका ओठावर दाबून धरलेल्या तिच्याच हाताच्या पंजाने शर्थीने रोखून धरला होता. समोरच्या दृश्याचा अर्थ लावण्यात तिच्या आठ वर्षाच्या चिमुकल्या मेदुला अपयश येत होते. पण चालले आहे ते काहीतरी भयंकर आहे अन आपण आवाज न करता गप्प बसण्यातच शहाणपणा आहे, इतके तिला नक्कीच उमजत होते.
दानम्माच्या देवळाच्या अंधाऱ्या ओवरीत ती एका कोपऱ्यात दबकून बसली होती. अन ते चार धटिंगण देवळामागच्या त्या निर्मनुष्य मंडपात, संध्याकाळच्या संधिप्रकाशात तिच्या आईच्या अंगाशी झोंबत होते.
आम्हां घरी धन... (२)
आम्हा घरी धन...
----------------
पहिल्या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे.
चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.
लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.
चावडीवरच्या गप्पा – आडवा(टे)नी राजीनामा नाट्य
“नमस्कार हो चिंतोपंत! कळली का बातमी?” बारामतीकर, बर्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.
“कसली बातमी? लोहपुरुषातले लोह वितळत चालल्याचीच का?”, नारुतात्या हसू चेहेर्यावर आणत.
“नारुतात्या आणि बारामतीकर, तुम्हाला फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या कळताहेत हो!
मिसळपाव

