Skip to main content

विरंगुळा

दुबई सफरनामा भाग - 7 शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 23/10/2013 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
दुबई सफरनामा भाग - 7 शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क 1 Figure 1 Late President of the United Arab Emirates (UAE), HH Sheikh Zayed bin Sultan Al Nahyan’s Mosque अबुधाबीच्या आमच्या ट्रिपचे महत्वाचे हे आकर्षण होते. ही जगातील सर्वोत्तम प्रचंड म्हणून गाजलेली मशीद. या मशीदीत महिलांना व अन्य धर्मियांना प्रवेश हे ही या मशीदीचे आणखी वैशिष्ठ्य म्हणता येईल.

एक महाचित्रपट

लेखक तिमा यांनी सोमवार, 21/10/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
काल टीव्हीवर फुकट मिळाल्यामुळे एक चित्रपट बघिटलो. त्याचं नांव सांगण्यापेक्षा गोष्टच सांगावी. एक मिठाईवाला असतो. फारच दीर्घायुषी. त्याचा नातू एकदम हिरो असतो. त्याला मिठाई विकताना कोणी मुलींनी 'भैया' म्हटलं तर आवडत नसतं. मिठाईवाला सचिनचा पंखा! तर होतं काय की मधली पिढी पडद्यावरुन एकदम डिलिट होते आणि आजोबा,आजी आणि नातूच रहातो. आजोबांचा शंबराव्वा वाढदिवस. त्याच दिवशी सचिनची मॅच. आजोबा टीव्हीवर डोळे लावून बसलेले आणि नातू टोळभैरव मित्रांबरोबर गोव्याला कसे जायचे याच्या चिंतेत. सचिन नव्व्याण्णव वर! आजोबा गॅसवर! मित्र ,गोवा ट्रीपच्या परमिशनच्या चिंतेत. सचिन च्या चिंतेत आजोबा परमिशन देऊन टाकतात. आन...

(खंड्याचे मनोगत)

लेखक तिमा यांनी शनिवार, 19/10/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थानः खंड्या जन्मल्यापासून,आकाशात भाईबंधांबरोबर थव्याने स्वच्छंद उडायचे आणि फळे खायची हा माझा दिनक्रम होता. फार छान दिवस चालले होते. एके दिवशी आम्ही सग़ळे एका झाडावर येऊन बसलो. खाली काहीतरी चकाकत होते. आमचा ग़टनेता, 'खाली बघू नका" असे ओरडून सांगत होता. तरी आम्ही एकदोघांनी खाली डोकावून पाहिलेच. खाली एक फासेपारधी आरसा हातात घेऊन सूर्याचे प्रतिबिंब आमच्या डोळ्यावर पाडण्याचा प्रयत्न करत होता. अचानक, माझ्या डोळ्यांवर ती तिरीप पडली आणि जी भोवळ आली! तिरमिरत खाली पडलो. पडताना एका फांदीचा फटका माझ्या डाव्या डोळ्याला लागला, एवढे आठवते आहे. त्यानंतर जो शुद्धीवर आलो तो एका पिंजर्‍यात!

कोजागिरी स्पेशल

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 18/10/2013 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमचे येथे कोजागिरी निमित्त्य मसाला दूध प्राशनाचा कार्यक्रम आयोजित केला असून प्रतेकानं आपापल्या घरुन २-२ लिटर दूध (आमच्या प्रोव्हिजन स्टोअरमधूनच. आज म्हणून म्हैस : चौरेचाळीस रुपये लिटर ) तशेच पाव किलो साखर प्रतेकी आणि दूध मसाला (२५ रुपये तोळा) (स्पेशल आलाय आमच्या कडे तोच घ्या) संध्या़ काळी चार वाजेपर्यंत आणून द्यावे. कार्यक्रम बिल्डींगच्या टेरेस वर ठीक ९.३० वाजता (रात्री) सुरु होऊन ११.४५ (रात्रीच) ला संपेल. दूध तापवताना वेगळे काही घडत नसल्याने दूध कसे तापत आहे हे पाहण्यासाठी गर्दी करु नये. बसायची व्यवस्था आपली आपण करायची आहे.

दुबई सफरनामा - भाग 5 व 6

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 15/10/2013 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
दुबई सफरनामा - भाग 5 हरवले ते गवसले का? 1 ‘अटलांटिस’ची आठवण हॉटेल अटलांटिस पाम प्राचीन ग्रीक पुराणात अटलांटिस नावाचे एक संपन्न समाजव्यवस्था असलेले बेट समुद्रात बुडाल्याचा उल्लेख पाश्चात्य लोकांचा एक विरंगुळ्याचा विषय आहे. ते बेट जसेच्या तसे समुद्रातून परत अवतीर्ण झाल्याचा भास निर्माण करायचा प्रचंड खटाटोप शेखदुबईकरांनी केला नाही तरच नवल! आमच्य़ा सफरीतील ते बेट आता हॉटेलच्या रुपात पहायला निघालो. राजू गाईडने अटलांटिसची माहिती नेहमीच्या झोकात सांगितली.

चावडीवरच्या गप्पा – पंतांची 'बेबंदशाही'

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 14/10/2013 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “देर आये पर दुरुस्त आये!”, भुजबळकाका चावडीवर प्रवेश करत. “कशाची दुरुस्ती आणि कोण आलेय दुरुस्तीला?”, नारुतात्या खवचटपणे. “अहो नारुतात्या, भोचकपणा सोडा!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात. “नारुतात्या खास तुमच्यासाठी, शिवसेनेची दुरुस्ती आणि दुरुस्तीला आलेत शिवसैनिक”, इति भुजबळकाका. “कसली दुरुस्ती?

एका धर्मांतराची कथा

लेखक arunjoshi123 यांनी सोमवार, 14/10/2013 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न होऊन दोन दिवसही लोटले नव्हते तोवर बायको म्हणाली, "मुझे और एक शादी करनी है।" "English please, " मी म्हणालो. बायकोच्या बोलण्याचा न पटण्याजोगा अर्थ निघायला लागला कि मी तिला इंग्रजीत बोलायला सांगतो. मुद्दा असा होता कि दिल्लीतलं आमचं लग्न तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं. म्हणजे नातं मान्य होतं, विधी मान्य नव्हते. तर अजून एकदा तिकडच्या पद्धतीने लग्न करावं लागणार होतं. आपल्याकडे आंतरजातीय विवाहाला विरोध करायला लोकांना फार मजा येते.

दुबई सफरनामा - भाग 3 व 4

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 13/10/2013 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
दुबई सफरनामा - भाग 3 गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या - धौ बोटीवरील धमाल 1 अल् सलुजावरील नौकानयन मंद मंद डुलत जाणाऱ्या बोटीतून एका हातात ड्रिंक व दुसऱ्यात स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही गप्पाटप्टातून एकमेकांची ओळख करून घेत होतो. आमची दुबईची सफर खऱ्या अर्थाने सुरू झाली ती इथे. साईदत्तच्या प्रमोद शेवडेंनी काहींच्यासाठी नंतर खास नॉन वेजचे पदार्थ पेश करून आपल्या व्यावसायिक सराईतपणाची चुणूक दाखवली.

दुबईचा सफरनामा भाग १ व २

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 13/10/2013 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, विजयादशमीच्या सर्व मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा... नुकतीच दुबई व आबुधाबीची सपत्निक सफर घडली. त्याच्या संबंधी काही प्रवासवर्णनात्मक ललितलेखन झाले ते 1 ते २ सादर करतो. आवडले तर पुढील धाग्यातून भाग ७ पर्यंत सादर करेन. दुबई सफरनामा भाग – 1 साईदत्त टुरिझमचे देखणे आयोजन – दुबईची सैर साईदत्त टुरिझम कडून 'दुबई व अबूधाबी सहलीसाठी फक्त ६जागा शिल्लक!' असा मेसेज आला. त्याच्याकडे मी दुर्लक्ष केले. पण नेमका तो मेसेज अलकाच्या मोबाईलवर देखील आला. सायंकाळी मी घरी आलो तोवर नेहा, चिन्मय, वरदा समावेत अलकाचे दुबईस काय काय खरेदी करायचे बेतही तयार होते!

ज्योतिषांकडे जावे का? का जावे? … आमचेही काही प्रयोग

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 09/10/2013 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
सांप्रतकाळी भारतवर्षात काय, किंवा विलायतेस काय, बरेच उच्चविद्याविभूषित जंटलमन आणि सुविद्य लेड्या ज्योतिषांची टर उडविताना दिसतात; कां की त्यांचे मते ज्योतिष हे एक थोतांड असून लबाड ज्योतिषी मडळींनी केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी ते रचिलेले आहे, आणि ज्याअर्थी विश्वचूडामणि असलेल्या ‘आम्रविका’ खंडातील प्राख्यात ‘सायनस’या महासिकाची ज्योतिषविद्येस मान्यता नाही, त्याअर्थी हे थोतांड असल्याचे निर्विवादपणे सिद्धच होते, सबब समस्त लुच्च्ये ज्योतिषी हे खेटरे मारण्याच्या लायक होत.