विचार
कटितटपीतदुकूलविचित्र.....
"शब्द हे शस्त्र आहेत", हे वचन आपण सगळेच नेहमी ऐकतो. शब्द हे जपून वापरा, ते फार सामर्थ्यवान असतात. त्यांचा अर्थ तर काही वेळा माणसाच्या मनाचा (माझ्या मते जीभेचाही) चेंदामेंदा करतो.
मला अनेक शब्द कोड्यात टाकतात. त्यांचे अर्थ तर मला कळत नाहीतच पण त्यांचे उच्चारही कठीण वाटतात. काही शब्द उच्चारताना तर जीभ वळतच नाही."चटईला टाचणी टोचली" किंवा "काळे राळे,गोरे राळे,राळ्यात राळे मिसळले." सारखी अवघड शब्दरचना नाही हं! पण अनेक शब्दांचे उच्चार आणि अर्थ मला गोंधळात टाकतात. माझी एक लहानपणीची मैत्रीण होती. ती खूप सावकाश शब्द उच्चारायची.
प्रमाद
वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं.
दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात दिशाहीन, वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या.
ढग
कुणाच्या आयुष्याचा दोर कधी तुटेल आणि कुणावर नशीब कधी मेहरबान होईल या गोष्टी सदैव अंधाराच्या मुक्कामाप्रमाणे मानवाला अज्ञातच राहतील. परंतु असे आहे म्हणून जेवढे हाती उरते त्या आयुष्यालाच बेभरवशाचे करण्यात काय अर्थ आहे? सध्या अविश्वास आणि अस्वस्थतेने आपल्याला अशी घट्ट मिठी मारलीये की प्रत्येक श्वासावर आणि कृतीवर त्यांचा प्रभाव जाणवतो आहे. आनंद, समाधान, हास्य या नैसर्गिक भावनांचा प्रसवदर कमालीचा खालावला आहे. आपल्या मनातली स्वतंत्र विचारांची अमानुष भ्रूणहत्या कळसाला पोहोचली आहे. आपल्याला सगळं काही स्वतःचं आणि स्वतःकरिता हवं आहे केवळ विचार सोडून.
आमचीबी आंटी जन टेस
आमचीबी आंटी जन टेस
गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्हाळबी बंद पडेल व्हतं.
त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला.
या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.
जुन्या पिढीतली अभिनेत्री- विम्मी आणि तिची शोकांतिका
आज विमलेश अर्थात् विम्मी ह्या अभिनेत्रीचं नाव फारसं कोणाला आठवणार नाही. पण तिच्यावर चित्रित झालेली काही गाणी अजूनही प्रसिद्ध आहेत. सुनील दत्त आणि राजकुमारसोबतच्या "हमराज़" ह्या चित्रपटामधील तिच्यावर चित्रित झालेली ही गाणी आजही ऐकली- बघितली जातात आणि ह्या गाण्यांमध्ये एक हसरा चेहरा आपल्याला दिसतो.
म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - ४ अंतिम)
माझ्या गुंतवणुकीच्या प्रवासातले म्युच्युअल फंड हे महत्वाचे स्थानक आहे. सिप च्या माध्यमातून गेली बारा वर्षे गुंतवणूक करण्याचे फायदे मी अनुभवतो आहे. हेच अनुभव तुमच्या समोर मांडण्याची संधी ह्या निमित्ताने मिळाली. मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्ट नाही. या लेखमालेतील माहितीचा कोणाला फायदा झाला तर आनंदच आहे.
संदर्भांच्या शोधात
आज बरोब्बर दोन महिने झाले पांढर्यावर काळं करून. किंबहुना व्यक्त होण्यासाठी विषयच सापडत नव्हता. आजकालची परिस्थिती बघता "किंबहुना" या एका शब्दावर एक लेखमाला लिहिली जाऊ शकेल हा भाग अलाहिदा!
बहुतेक वेळा मी क्रिकेट आणि इतर खेळांबद्दल लिहितो कारण खेळांमधली सकारात्मक ऊर्जा मला भावते. पण सध्या चालू असलेल्या क्रिकेटचा देखील काही संदर्भ लागत नाही हो. आधी त्या अतिभव्य रिकाम्या स्टेडियम्समध्ये उगाच रतीब टाकल्यासारख्या टी-२० आणि वन डे खेळवल्या गेल्या. ते पण एकीकडे विजय हजारे ट्रॉफीसारखी महत्वाची डोमेस्टिक स्पर्धा चालू असताना आणि जुलै - ऑगस्टमध्ये पुन्हा इंग्लंडचा दौरा असताना.
म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - ३)
मागच्या भागात आपण इक्विटी फंडांचे काही प्रकार पहिले ... या भागात इक्विटी फंडाचे अजून काही प्रकार आणि डेट व इतर फंडाबद्दल बोलूया
______________________________________________________________________________________________________________________________
१. सेक्टर फंडस् : नावाप्रमाणेच हे फंड्स एकाच सेक्टर मधल्या कंपन्यांच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात . जसे pharma, banks , natural resources, manufacturing इत्यादी . जर एखादा सेक्टर भविष्यात जास्त प्रगती करेल असे वाटत असेल तर असे फंड फायद्याचे असतात. पण दीर्घ मुदतीत एकच सेक्टर सातत्याने प्रगती करेल हे अवघड वाटते.
हरिद्वारचा कुंभमेळा आणि भाजप
हरिद्वारमधे कुंभमेळ्यात झालेले पहिले शाही स्नान हे सध्या सुशिक्षितांच्या रागाचे निमित्य ठरत आहे. करोनाची दुसरी लाट दररोज शेकडो बळी घेत आहे,दिवसेंदिवस बळींचा आकडा वाढत आहे. असे असूनही कुंभमेळ्याला परवानगी मिळालीच कशी? अगदी वर्तमानपत्रात पूर्ण पान जाहिरात दिली गेली होती दोन दिवसांपूर्वी. येत्या २७ एप्रिलला चौथे शाही स्नान आहे आणि ते करण्याविषयी विचार सुरू आहे. ३० एप्रिलला मेळ्याची अधिकृत समाप्ती आहे. बहुतेक आखाडे शाही स्नानावर ठाम आहेत.
साधू म्हणताहेत की कधीतरी मरायचंच आहे तर शाही स्नान करुन,देवाचा आशिर्वाद घेऊन मरु.
मिसळपाव
