इंग्रजी भाषेचा अन्य भाषांवर प्रभाव
भाषा शिकण्याचा अनुभव कथन करताना मराठी आणि जर्मन संभाषणात इंग्रजी शब्दांचा वापर यावर एक निरीक्षण नोंदवले होते आणि तो विषय थोडक्यात आवरला होता. मात्र त्यानंतर अधिक शोध घेतला असता परिस्थिती जरा वेगळी असल्याचे जाणवले.
१) जगातील भाषांची आकडेवारी
एखादी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या किमान १० करोड आहे अशा केवळ १३ भाषा जगात आहेत [१]. इंग्रजी १३४ करोड ते जपानी १२ करोड अशी एक ते तेरा क्रमवारी आहे. चिनी भाषा दुसऱ्या क्रमांकावर ११२ करोड आणि हिंदी ६० करोड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मिसळपाव