Skip to main content

विचार

सबनीस जिंकले, रसिक हरले!!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 22/11/2015 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद विवाद हे काही नवे सूत्र नाही. दरवर्षीच होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत वाद निर्माण होत असतात. यातील काही वाद व आक्षेप हे न्यायलयापर्यंतही पोचतात. कधी वाद घालणारी मंडळी ही अधिक आक्रमक असतात आणि आम्ही संमेलनच होऊ देणार नाही अशी टोकाची भूमिकाही घेतात. मग पंचाईत होते. विशेषतः एरवी विष्णुनामाचा, हरीनामाचा गजर करणारे वारकरी रस्त्यावर उतरतात तेंव्हा मग साहित्य संमेलनाच्या आयोजकांनाच अशी भूमिका घ्यावी लागते की जे नियोजित संमेलाध्यक्ष आहेत त्यांनीच संमेलन स्थळाकडे फिरकू नये. तशी वेळ काही वर्षांपूर्वी विख्यात लेखक कादंबरीकार आनंद यादव यांच्यावर ओढवली होती.

धडा

लेखक इडली डोसा यांनी रविवार, 22/11/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट . आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं.अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळविची तयारी सुरु झाली.

वंदन भक्ती आणि पुणेरी षड्यंत्र

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 21/11/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
करावें देवासी नमन I संत साधू आणि सज्जन I नमस्कारीत जावे I नमस्कारें सख्य घडे I नमस्कारें मोडली जडती I समाधानें I समर्थ म्हणतात वंदन भक्ती सर्वात सौपी आणि सरळ आहे. वंदन करण्यासाठी एक दमडी सुधा लागत नाही. काही साधन सामग्री ही लागत नाही. कुणालाहि हात जोडून आदराने नमस्कार केल्याने आपण त्याला प्रिय होतो. बिघडलेले कार्यहि मार्गी लागते. आपण रोज पाहतोच, आपण जेंव्हा कुणाला नमस्कार करतो, त्याचा चेहरा आनंदाने उजळतो. प्रतिउत्तर म्हणून तोहि आपल्याला नमस्कार करतो. दोघेही प्रसन्न होतात.

चहावाल्याचे पंख.....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 19/11/2015 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
चहावाल्याचे पंख..... काय करतो? ......... चहा विकतो. किती वर्षे झाली?........ चाळीसेक. वय?...... साठीपार. कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय. कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी. चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला अज्जिबात न पेलवणारा हा परिचय आहे श्री. हरि एम. मोहनन आणि त्यांची पत्नी मोहना यांचा! केरळातल्या एर्नाकुलम् येथे गेली चाळीसेक वर्षे चहाचे दुकान चालविणाऱ्या या दाम्पत्याचे भटकंतीचे वेड कुणालाही आश्चर्य चकित करते. हातात पैसे असूनही कधीही आपल्या गावाशहराची वेस न ओलांडणारे लोक आहेतच!

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 19/11/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

दोन वेडे - २

लेखक DEADPOOL यांनी बुधवार, 18/11/2015 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
हॉल! लॉझ बनवायची जागा! अनेक कामगार येथे काम करत. जगातली सगळी सुरक्षा अमेरिका येथे पुरवत होती. १००० सैनिक येथे तैनात होते.

पुण्यवंतांची स्मारके आणि वाद घालणारे आपण करंटे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 18/11/2015 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
डिक्स्लेमरः सदर लेख कोणत्याही जात, धर्म, पंथ, राजकिय पक्ष, विचारसरणी विषयी किंवा त्या विरूद्ध भाष्य करीत नाही. लेखातील विचार केवळ लेखकाचे वैयक्तीक आहेत. लेखकाची सामाजिक वागणूक आणि विचार या लेखात आलेल्या विचारसरणीस अनुसरून असतीलच असे नाही. साहित्याचं नोबेल मिळवणारे प्रसिद्ध इंग्रजी लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या मुंबईतील जन्मस्थळावरुन वाद सुरु झाला आहे. (संदर्भः "किपलिंगच्या शोधात.." ओंकार करंबेळकर, मंथन पुरवणी, दै. लोकमत) बाबासाहेबांचे लंडनमधील निवासस्थान घेण्याचा मार्ग मोकळा - दै. सकाळ महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक - दै.

किर्रक्केट

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 18/11/2015 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
'किर्रक्केट' क्रिकेट म्हंटलं की कान टवकारतात, मग कुठलीही भाषा असो, अगदी बंगाली, गुजराती... कोणीही क्रिकेटचा विषय काढला की एकच भाषा होते! जागे बद्दलही असेच, लोकल/बस/रीक्षा पासून ऑफ्फिस!   आपल्या भारतीयांच्या अंगात त्या ब्रिटिशांच्या ह्या खेळाचं रक्त अगदी दुथडी भरून वाहतं, लहानपणी आजोबा सदृश मंडळी कानाला तो खरखरणारा मरतुकडा रेडियो अखंड चालू ठेवायची, नंतर कृष्णधवल दूरचित्रवाणी संच ते आत्ता पर्यंतचे एलसीडी/एलईडी वगैरे अखंड चालू, 'अरे डोळ्यांच्या काचा होतील', 'उद्या परिक्षा आहे', 'वाट्टोळं करून घ्या तुम्ही स्वतःचं'.. 'त्यांना काय पैसे मिळतात खेळण्याचे'...

दोन वेडे !

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 16/11/2015 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र झाली होती. विसपुते मेन्शन सुद्धा निद्रादेवीच्या आधीन झाला होता. मात्र एका रूम मधील लाइट अजूनही चालू होती. "मार्क झोपा आता" अल्डेर म्हणाला. "अल्डेर १३ वर्षे झाली आता, नाही झोप येत." "येत नसेल तरीही झोप, कारण विसपुते मेन्शन जागा राहणं जगाला परवडणार नाही." "विसपूते मेन्शन जागा राहणं जगाला चालेल पण मार्क विसपूते नाही." "मार्क विसपुतेने जग जिंकलं पण स्वत:ला नाही, अल्डेर." मार्कचा आवाज कंप पावत होता. "मला एका व्यक्तीने सांगितलं होतं, जग जिंकणं सोपं असतं, पण "स्वतःला जिंकणं अवघड असतं." कोण ? सिकंदर ?" "नाही, सर आर.एम.

न फिटणारं कर्ज... एक रुपयाचं

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 16/11/2015 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्कूटर होती माझ्याकडे, हवा कमी झालेली, हवा भरली मग घाटाजवळच्या पंचरवाल्याकड़े, सुट्टे नव्हते, म्हणाला नंतर दे...त्यात काय एवढं, २-३महिन्यानी त्याच रोड वरुन गेलो, आता स्पेंडर होती हातात न कानात हेडफोन, सुट्टे असून पैसे न देता, घाइत होतो, अर्थात दुर्लक्ष करत, मग अनेकदा गेलो त्याच रोड वरून, त्या गोष्टीला आता दीड दशक होईल, अजुन ही जातो आता सैंट्रो असते, कर्ज वाढत चाल्लैय! तो रुपया अजुन दिलेला नाहिये, २-३ वर्षा पूर्वी मुद्दामून त्या रोड वर जरा स्लो झालो, खंत अजुनही होती मनात, पण दूकान नव्हतं ते, निराश झालो! वेळ असून वेळ गेलेली, आयुष्यभर सतावणार ती हवा!