Skip to main content

विचार

गुलाम अली साहब

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 05/12/2015 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली.

विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 04/12/2015 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - काळाचा आवाका ऋग्वेद १०.१२९ । ऋषिः परमेष्ठी प्रजापतिः । छन्दः त्रिष्टुप् । देवता भाववृत्तम् । नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् । किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥ न मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत्प्रके॒तः । आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥ सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही. धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं. काही झाकलेलं नव्हतं, की लपलेलं नव्हतं.

सृजनत्व द्या

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 04/12/2015 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी व्यवसायात किंवा नोकरीत आवश्यक असे कौशल्य आहे. तुम्ही मिडीया मध्ये नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी याची आवश्यकता जरा जास्त असेल. जिथे इंजिनीयरिंग प्रॉडक्शन चालते तिथे याची आवश्यकता कमी असेल परंतु सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी शिवाय नोकरी किंवा व्यवसाय वाढणे, किंवा त्यात प्रगती होणे अशक्य मानावे लागेल. या संदर्भातली आजच्या जगातली काही उदाहरणे पाहु. १९७३ सालापर्यंत १ जानेवारीला नविन कॅलेंडर भितीवर लावले जायचे. हे कॅलेंडर सहसा गिफ्ट स्वरुपात असायचे. त्यावर नयन रम्य चित्रे असायची.

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 03/12/2015 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 03/12/2015 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
(वैज्ञानिक संकल्पनांवर सरळसोप्या भाषेत भाष्य करण्यासाठी ही लेखमाला सुरू केलेली आहे) कधीतरी एखाद्या शांत, स्वच्छ रात्री; शहराच्या प्रकाश प्रदूषणापासून दूर कुठेतरी आकाशात पाहिलं की अक्षरशः अगणित तारे दिसतात. मंदपणे लुकलुकणारे, स्थिर. आणि त्या क्षणात आत्तापर्यंत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक मनुष्यप्राण्याशी आपण जोडले जातो. याच किंवा अशाच आकाशावर त्यांनीही आपले डोळे रोखलेले होते.

शाकाहार का मांसाहार

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/12/2015 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आपण काय खावं हे कोणीतरी तिसरी व्यक्‍ती ठरवणार असेल तर जगणं मुश्कील आहे. अमूक एका समूहाच्या लोकांनी आमच्या वस्तीत स्वत:चं घर बांधूनच नव्हे तर भाड्याच्या खोलीतही राहू नये असं कोणी ठरवणार असेल तर भयावह आहे. अमूक खाणार्‍यांनी आमच्या वस्तीत येऊ नये असा फतवा निघणार असेल तर ते त्याहूनही भयंकर आहे. आपल्या कळपाला मान्य नसल्यामुळे अमूक एकाकडून अमूक एक गोष्ट घडली म्हणून मार देणे वा जीवंत मारून टाकणे हे रानटी मानवी टोळ्यांचे काम होते. आजच्या सभ्य माणसांच्या समूहांचे नाही. आपण नेमके आज मानवी समाजात राहतो का आपापल्या जाती- धर्माच्या कळपात राहतो.

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . .

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 01/12/2015 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

श्री कृष्ण भक्ती

लेखक सत्य धर्म यांनी रविवार, 29/11/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
हरे कृष्ण भक्तीमार्ग हि आज खूपच गरजेचा आहे परंतु भक्ती कशी करावी आणि कोणाची करावी हे कळत नसल्यामुळे या मार्गावर लोकांची खूपच फसगत होते. संतानी ज्याच्या वर्णनाने ग्रंथसंपदा निर्माण केली त्या शिकवणीला सोडून आपण व्यक्तीपूजक बनत चाललो आहोत. आपल्या सर्वांच्या मनात असणारा भक्तीभाव हा कोनाठाई असावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण संतांनी सांगितल्याप्रमाणे आपली भक्ती श्री कृष्णा प्रती असावी, केलेले प्रत्येक कर्म , आपल्याला मिळालेले चांगले वाईट फळ या सर्व गोष्टी फक्त श्री कृष्णा प्रती समर्प्रित असाव्यात. संतश्रेष्ट ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी श्री विठ्ठलाची भक्ती केली.

सद्गुरू २

लेखक विश्वव्यापी यांनी शनिवार, 28/11/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा ब्राह्मदेवाचे मानस पुत्र नारद मुनी , दुखी: व कष्टी होवून गप्प बसले होते . ब्रह्मदेवांनी त्यांना विचारले 'पुत्रा तू इतका कष्टी का दिसतोस ?' नारद म्हणाले ' पिताश्री मी सद्गुरूंच्या शोधात आहे ,पण मी जाणत नाही कि सद्गुरु कसे असतात त्या मुले मी दुखी: व कष्टी झालो आहे . मी सर्व वेदांत , १८ पुराणांत , ६४ कलांत पारंगत असा आहे तरी हि मी सद्गुरु कसे असतात हे जाणत नाही !ब्रह्मदेव म्हणाले ' बस इतकेच न ? फार सोपे आहे ते . तू असे कर पृथ्वीतलावर जा . तिथे सहस्त्रगुण राजाच्या महालात एक कोळी आपे जाले विनात आहे .तो तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला देयील . नारद मुनी आनंदानी त्या कोळ्या पाशी जाऊन पोचले .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . .

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 27/11/2015 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.