लेखकनिखिल देशपांडेयांनी शुक्रवार, 27/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल मिपाचा दर्जा खुप खालवलाय म्हणे.. सारखे कैच्या कैच फुटकळ धागे येत असतात!!!!
मग अशा फुटकळ धाग्यात आम्हीही एक भर घालावीच म्हणतो. संपादक मंडळाला आमचा धागा उडवायचा पुर्ण अधिकार आहे याचे भान आम्हाला आहेच. पण मिपाच्या लेखनप्रकारात आम्हाला सद्भावना, शुभेच्छा आणि अभिनंदन असे लेखनप्रकार दिसले आणि आम्ही हा लेख लिहायची हिम्मत केली. (आता तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला कळलंय की संपादक मंडळाला असे अभिनंदनाचे धागे आवडत नाहीत. कोण म्हणे रे तो आम्हाला कसे कळले??? अरे संपादक मंडळात राहुन अशा बातम्या कळत नाहीत रे भौ. त्यासाठी खास उपक्रमावर जाऊन रिकामटेकड्या लोकांचा खरडवह्या चाळ्यावा लागतात Wink.
लेखकस्पंदनायांनी मंगळवार, 24/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
(मागच्या वेळी केलेल नमन आता या वेळी सुद्धा आहे, पण गणपा भाउ, जागुताई अन केशवजीं बरोबर फोटो अन व्हिडिओ साठी आदरणीय बहुगुणी अन आपले सर्वांचे लाडके धमाल मुलगा यांचे जाहिर रित्या आभार!!
तुम्ही मदत केली नसती तर, कुठली अपर्णा, अन, कुठला हा लेख!!)
अरे हो राहिल प्रिय डॉन रावांनी मला अक्षर रंग अन इतर सुविधा देण्याच आश्वासन दिल्या मुळे इथुन पुढे मीही थाटात रंग बदल बदल के लिहिणार आहे!! ठ्यांक्यु ह डॉन साहेब!!
लेखकडॉ.श्रीराम दिवटेयांनी मंगळवार, 24/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या व्यक्तिचं रक्षण करायचं म्हटलं की रक्षणकर्त्याला चांगलं चुंगलं अन्न भक्षण करुन बॉडी कमवावी लागते. परंतु आजच्या सुप्परफास्ट युगात बहुतेक तरुण बंधूराजांचं फास्टीँगच होत असतं. तरीही येनकन प्रकारे जगातील सगळेच बांधव जर बॉडी बिल्डर झाले तर सर्वांचा भगिनीवर्ग सुरक्षित राहील अन् आरक्षितही!
एखाद्या बहिणीकडून औक्षण करवून घेतले की तिचे रक्षण करणे भावाचे कर्तव्यच असते. आजकाल बहुतेक कुटुंबे ही त्रिकोणी राहण्यातच समाधान मानतात. अशा कुटुंबातील एकल भावांना बहिणीँचा हट्ट, मस्करी, रुसवे फुगवे काय डीव्हीडी लावून दाखवायचे? येत्या काही दशकात हेही करावे लागेल की काय कोण जाणे?
लेखकहैयो हैयैयोयांनी गुरुवार, 12/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई मीटर जाम.
जे औटोरिक्षा / टैक्सि ने प्रवास करतात अशांसाठी विशेष:
आज १२ अगस्ट आहे, आणि आज मीटर जाम चा दिवस आहे. आज आपण लोक औटोरिक्षा / टैक्सि चा उपयोग नाही करणार. आज आपण आपल्या आफिसास बस ने / लोकली ने / चालत चालत येणार.
बस ने / लोकली ने / चालत चालत येणेजाणे सफलतापूर्व असो तसेच औटोरिक्षा / टैक्सि वाल्यांस बरी अद्दल घडो ही शुभकामना!
बघुया काय मिजाज राहतो येथील जनते चा आणि औटोरिक्षा / टैक्सिवाल्यां चा!!
हैयो! हैयैयो!!
लेखकमॅन्ड्रेकयांनी रविवार, 01/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा, खुप सारे प्रेम द्या पण थोडेसे रागवा , नको अंतर कधि, नको दुरावा, पावसाला ही लाजवेल असा हवा मैत्री चा जिव्हाळा. मैत्री दिवसाच्या शुभेच्छा.
लेखकडॉ.श्रीराम दिवटेयांनी रविवार, 01/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्टचा पहिला रविवार असो किंवा कॉलेजचा पहिला दिवस, पावसाळ्यात नव्या मैत्रीचे नवे दिवस सुरु होतात. कारण ते दिवस नवे असतात, ते वर्ष नवे असते अन् तो अभ्यासक्रमही नवाच असतो. कॉलेज कँपस नवनव्या मैतरांनी फुलून येते. तिथूनच मग मैत्रीचे नवे जग सुरू होते. नव्याने मनांची चाचपणी केली जाते. काही लगेचच जुळतात, काही वेळ घेतात तर काही मने नुसतीच छळतात, प्रसंगी जळतातसुद्धा!
एकंदर आठवणीत राहते ती कॉलेजचीच मैत्री. त्या वयात जाण आलेली असते. भल्याबुऱ्यांची समज कळत जाते. अपने-पराये देखील ओळखता येत असतात. हीच मैत्री जीवनभर सोबतीला येते.
लेखकहैयो हैयैयोयांनी शनिवार, 31/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आपले मिपा मित्र श्री. शशिकांत ओक सर ह्यांचा आज वाढदिवस आहे.. ..श्री. ओक सर, वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा! आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथ अधिवेशनाबाबत आपले लेख येताहेत, अजूनही लेख वाचावयास आवडतील!
धन्यवाद!
हैयो! हैयैयो!