Skip to main content

संदर्भ

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ४)

लेखक दुर्गविहारी यांनी सोमवार, 19/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
यापुर्वीचे भाग आपण ईथे वाचु शकता अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३) भेटीसाठी शामियाना उभारिला:-

भेटीसाठीजी जागा शिवाजी महाराजांनी निवडली ती सुध्दा अतिशय मोक्याची होती.टेहळणी बुरुजाच्या खाली सपाट

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३)

लेखक दुर्गविहारी यांनी मंगळवार, 13/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागाच्या लिंक अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २) अफझलखानाचे नियोजनः- अफजलखानाने मे महिन्यात पुण्याजवळ शिवाजी राजांना त्वरित लढाईसाठी बाहेर काढण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. जून महिना सुरू झाला आणि शिवाजी महाराज राजगड येथे राहिले.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 02/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
अफझलखानाचा वध ! शिवचरित्रातील एक सोनेरी पान. ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे महाराजांच्या युध्दशास्त्राला, रणधुरंधरांना दिलेलं एक अजोड देणं! शिवचरित्र हे कितीही वाचल-ऐकलं तरी त्याची गोडी कधी संपतच नाही.

हरतालिका

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 21/08/2020 या दिवशी प्रकाशित केले.
हिमाचल प्रदेशातील हिमवान राजाची पार्वती  ही कन्या. तेव्हा तिचे ऐश्वर्य काय वर्णन करायचे ? सर्वगुणसंपन्न अशी ही कन्या राजाची अत्यंत लाडकी होती. कन्या वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची, चार वर्षांची झाली. अशा त-हेने ती वाढत असता राजाला आता तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. आपल्या बाळ मैत्रिणींसह खेळताना-हिंडताना-नटताना-मुरडताना तिला पाहून त्याला धन्य वाटायचे आणि हे रत्न दुसऱ्याला द्यायचे याबद्दल दुःखही व्हायचे! अशा परिस्थितीत असतानाच नारदाची स्वारी झाली. राजसिंहासना जवळच हे कन्यारत्न होते. नारदांनी लगेच भविष्य सांगितले, “ही तुझी कन्या एका तपस्व्याचा पती म्हणून स्वीकार करील !

मराठ्यांच्या इतिहासातील लढायांच्या संदर्भातील काही ऐतिहासिक व्यक्तिचित्रे...

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 05/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासातील लढायांच्या संदर्भात वर्णन करताना काही व्यक्तिमत्वे कारणपरत्वे समोर येतात. त्यांचा गोषवारा सादर केला तर धागा वाचकांना पुढील मागील संदर्भ समजायला सोपे पडेल असे वाटून खालील व्यक्तींचा विश्वकोशातील परिचय सादर करत आहे. लढाईचे धागे जसे पुढे पुढे जात राहतील, तेव्हा आणखी काही व्यक्तींची त्यात भर पडेल असे असे वाटते. बाजीराव, दुसरा (७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा. रावबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. धार येथे जन्मला. लहानपणी हा हूड व विक्षिप्त होता.

(विरह - एक वेगळा दृष्टीकोन X शब्दकथा) -

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 12/12/2019 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा रात्रीचे तीन वाजले होते, त्याच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती. बायकोची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला....., अजून का बरे फोन नाही आला? नक्कीच फ्लाईट डिले असणार.... कारण आपली बायको आपल्यावर किती जास्त प्रेम करते हे त्याला माहीत होते. किती काळजी करतो आपण? काही नाही येईल नक्की फोन.....

रॉबिन विलियम्स

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 12/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ ची ती सकाळ काहीशी भकासच होती, हॉलिवूडच्या माझ्या अत्यंत आवडत्या नटांपैकी एक असणाऱ्या रॉबिन विलियम्सला घेऊन गेलेली ती सकाळ होती. हॉलिवूड चे चित्रपट पहायचं वेड लागलं त्या काळात पहिल्या काही चित्रपटांत त्याचा 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम' होता. आर्म्ड फोर्सेस रेडिओ मध्ये RJ म्हणून काम करणारा तो Goooooooood morning Vietnam! म्हणत सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याची पद्धत जाम आवडून गेली होती. लगे रहो मुन्नाभाई मध्ये विद्या बालन ने ती हुबेहूब कॉपी केलीये.

वाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार

लेखक जालिम लोशन यांनी सोमवार, 22/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
उत्सव बालपणीचा मीरा फाटक माझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच! म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप! पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत.

पागोळी वाचवा अभियान

लेखक सुनिल प्रसादे यांनी मंगळवार, 16/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
"जमीन पुनर्भरण केंद्र" - विडिओ - https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448 स्थळ - गजानन महाराज नगर, मु. गिम्हवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी - 415 712. दिनांक - 28 जून 2019 छपराचे क्षेत्र - 1500 चौ. फू. खड्डयाचा आकार - 4 फूट लांब × 3 फूट रुंद × 3.5 फूट खोल जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण - पाच लाख पंचवीस हजार लिटर. पाहूया कसे ते - संपूर्ण वर्षाऋतुमध्ये कोकणात पडणारा एकूण पाऊस - 350 सें. मी. त्या हिशोबाने 1500 चौ. फू.