गोष्टी सिनेमाच्या - भाग १
गोष्टी सिनेमाच्या - भाग १
लहानपणी शांता शेळके ह्यांची चित्रपट विषयक काही पुस्तके मला कुणी वाचायला दिली होती. त्यांत माझ्या आठवणी प्रमाणे काही इंग्रजी चित्रपटांचा सारांश दिला होता. हे अनेक चित्रपट जुने होते आणि ग्रामीण भागांत (आणि शहरांत सुद्धा अनेक ठिकाणी) कुठे केबल आणि इंटरनेट नसल्याने त्या काळी मला बघता आले नाहीत. पण तरुणपणी ते सर्व चित्रपट मी आवर्जून पाहिले. शांता शेळके ह्यांनी मला इंग्रजी चित्रपट न पाहता सुद्धा चित्रपटांची आवड लावली असे म्हणू शकते. त्या काळी हॉलिवूड चित्रपटांची एक डिक्शनरी यायची त्यांत शेकडो चित्रपटांची माहिती येत असे, म्हणजे ३-४ वाक्यांत चित्रपटाची कथा आणि एक रेटिंग.
मिसळपाव
पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.
मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.
इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.