मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सल्ला

निवडणूका, फिल्डींग लावणे, लोकप्रिय (लेखक) बनणे इत्यादी

सहज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) आपण कधीकाळी निवडून येऊ! असे कल्पनेत देखील विचार न केलेली मंडळी, आता मात्र जरा विचारमग्न होऊ लागली आहेत. कारण विचारताय? अहो ह्या गणपतीत, एक नवीन हॉटेल नाही का सूरू झालेय. आपल्या पंसदीचे खाणे पुरवणारे क्षुधाशांतीगृह, च्यामारी कूठेच नव्हते. आता रात्री २ वाजता जर का भूक लागली. काहीतरी चमचमीत खावेसे वाटले तर म्हणे "आत्ता बंद आहे, उघडल्यावर या". चक्क शटर डाऊन करून हो! साध पाणी पण नाही दिल. एकदम पुणेरी** पध्दतीने असे कटवले. तेव्हाच ठरवले, साला २४ तास चोचले पूरवले जातील असे हॉटेल काढतो की नाय बघा.

तरच मग कविता कर...

विसुनाना ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जपून वापर जरा शब्द करू नकोस उधळमाधळ उडून जातील कस्पटासमान घोंगावेल टीकेचे वादळ मनातल्या प्रतिमांना ओत साच्यात जरा जपून झिजत चाललेत कंगोरे तीच तीच कविता करून निसर्गाची हाक तशी अधूनमधून कानी येते सतत बोलावणे आले तर औषध घेणे भाग पडते तसे तुझे होऊ नये म्हणून सांगतो दम धर फारच दाटून आले असेल तरच मग कविता कर अत्त्यावश्यक सूचना - १. फारच दाटून आल्याने हे विनोदी शीघ्रकाव्य केले आहे. तेंव्हा ह.घ्या. २. कविता विनोदी आहे हे सांगितले आहेच. तेंव्हा जमेल तेवढे हसावे ही विनंती. ३. माझ्या यापुढील कवितांना याच कवितेतील ओळी फेकून मारू नयेत.:):)