(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे)
आपण कधीकाळी निवडून येऊ! असे कल्पनेत देखील विचार न केलेली मंडळी, आता मात्र जरा विचारमग्न होऊ लागली आहेत. कारण विचारताय? अहो ह्या गणपतीत, एक नवीन हॉटेल नाही का सूरू झालेय. आपल्या पंसदीचे खाणे पुरवणारे क्षुधाशांतीगृह, च्यामारी कूठेच नव्हते. आता रात्री २ वाजता जर का भूक लागली. काहीतरी चमचमीत खावेसे वाटले तर म्हणे "आत्ता बंद आहे, उघडल्यावर या". चक्क शटर डाऊन करून हो! साध पाणी पण नाही दिल. एकदम पुणेरी** पध्दतीने असे कटवले. तेव्हाच ठरवले, साला २४ तास चोचले पूरवले जातील असे हॉटेल काढतो की नाय बघा.