Skip to main content

कॅटवूमन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 08/12/2010 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्पायडरमॅन, सुपरमॅन अगदी गेला बाजार शक्तिमान देखील आपल्याला भुरळ पाडून गेले. जादुई, साहसी जगातल्या ह्यांच्या पराक्रमाने, साहसाने आपण थक्क होत आलो आहोत. पण ह्या नायकांच्या साहस जगात नायिका तशा दुर्मिळच आणि त्यामुळेच कॅटवूमन अनेकांना भुरळ घालते ह्यात नवल नाही. कॉमिक्स मधून भेटिला येणारी कमनीय, देखणी मांजराप्रमाणेच धूर्त असलेली कॅटवूमन थेट पडद्यावर अवतरली ती २००४ साली वॉर्नर ब्रदर्सच्या 'कॅटवूमन' चित्रपटातून. कॅटवूमनच्या जन्माची कहाणी सांगणारा हा एक सुंदर चित्रपट.

माईंड मॅप

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 03/12/2010 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेली ४ वर्षे मी "फ्री माईंड" नावाचे साधन (सॉफ्ट्वेअर टूल) माझ्या कार्यक्षेत्रात वापरते आहे. हे साधन माईंड मॅप या प्रकारात मोडते. याचा उपयोग मेंदूतील विचार अतिशय सुसंगत आणि सुस्पष्ट तसेच आकर्षक रीतीने कागदावर उतरविण्यात होतो. विचार आपले आपल्याला खरोखर खूप स्पष्ट होतात. विचारांची दिशा आणि विचारसमूह ओळखू येऊ लागतात. एखाद्या ठीकाणी विचारसाखळी तुटली असेल (गॅप) तर लगेच लक्षात येते.

वर्तूळ - एक अनुभव

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/11/2010 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपण एखाद्या चित्रपटाने आनंदी होतो किंवा अस्वस्थ होतो. तसं झालं तर आपण म्हणतो “अरे हा चित्रपट मस्त होता हं” अर्थात चित्रपट चांगला असायची ही एकच परीक्षा आहे असं म्हणता येत नाही. उदाहरण द्यायचे म्हणजे इराणी चित्रपट. विशेषत: लहान मुलांवरचे. त्यात काही खास अशी गोष्ट नसते, तरीही पण आपण तो चित्रपट बघितल्यावर काहीतरी वेगळा अनुभव घेतला आहे असे आपल्याला सारखे वाटत रहाते.

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

छायाचित्रे अशीही

लेखक मस्तानी यांनी गुरुवार, 18/11/2010 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
"डास, किडे, बुरशी अशा गोष्टींचे अतिसुंदर फोटो" असं म्हणून काही लिहायला सुरुवात केली तर पुढे वाचावं की नाही अशी शंकाच येईल नाही तुम्हाला. पण शंका न घेता खालील दुवा बघा. निसर्ग आपला चमत्कार कोणत्या स्वरुपात दाखवेल सांगता येत नाही. नायकोन कंपनीने आयोजित केलेल्या या छायाचित्र स्पर्धेतील विजेते आणि उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते सर्वच फोटो एका वेगळ्या सूक्ष्म दुनियेचे दर्शन घडवणारे आहेत. मिपा वर खूप चांगले छायाचित्रकार आणि दर्दी असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत म्हणून हा दुवा आपणा सर्वांना द्यावासा वाटला.

दिवाळी अंकांतील फराळ

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 06/11/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या दिवाळीसाठी आम्ही कंबर कसून कामाला लागलो होतो. त्या लेखनकष्टाचं फळ पदरात पडलं आहे. एकूण डझनभर दिवाळी अंकांमधून आमच्या घरगुती फराळाची चव रसिक वाचकांना चाखायला मिळणार आहे. सदरहू अंक आपणाला नक्कीच रुचकर वाटतील आणि त्यात समाविष्ट झालेल्या आमच्या कुरकुरीत साहित्याचा आपण चौकसतेने आस्वाद घेऊन आम्हांला जरुर पोचपावती द्यावी ही विनंती. आमच्या हातचा हा मामुली फराळ कसा काय झालाय? तिखट मीठ व्यवस्थित घोळले गेलेय ना? आंबट लागतोय की गोड? तुरट झालाय की कडू वाटला?