"रोबोट" चे स्कॅनींग, माझ्या नजरेतून...!!
गेल्या शुक्रवारी १ ऑक्टोबरला रजनीकांतचा "रोबोट" चित्रपट प्रदर्शीत झाला.
सुरुवातीपासूनच उत्सुकता होतीच.
रविवारी बघितला. मोठ्या पडद्यावर.
बघायला जाण्या आधी, भारतीय चित्रपट आणि तोही सायन्स फिक्शन अॅक्शन थ्रिलर म्ह्टल्यावर मन थोडे नाही म्हटले तरी साशंक होतेच, ते यासाठी की एवढा खर्च करून त्यात कल्पनादृष्टी नीट वापरली असेल की नाही?
कारण, हरमन बावेजाचा लव्ह स्टोरी खुप स्पेशल इफेक्टची रेलचेल असूनही पडला होता.
मिसळपाव