Skip to main content

शिफारस

मिसळपाव सदस्य

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 12/08/2011 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकीवरही अनेक मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या सदस्य पानावर लावण्यासाठी आता मिपा चिन्ह मराठी विकीवर तयार करण्यात आले आहे. {{सदस्य चौकट मिसळपाव सदस्य|टोपणनाव=अमुक}} हा साचा अमुक ऐवजी स्वत:चे मिसळपाव संकेतस्थळावरील टोपणनाव भरून विकिपीडियावरील तुमच्या सदस्य पानावर चढवावा म्हणजे मिपाचिन्ह चौकट तुमच्या सदस्य पानावर दिसू लागेल.

एक अद्भुतरम्य जागा

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 24/07/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरिसच्या गजबटापासून दूर, अतिशय शांत, निर्मनुष्य आणि अद्भुतरम्य जागा म्हणजे Parc de Saint Cloud. सुमारे ११३६ एकर जागेत पसरलेल्या या उद्यानात हजारो मोठमोठी झाडे, हिरवळी, गच्च झाडीने झाकलेल्या पायवाटा, टेकड्या, पुतळे, कारंजी वगैरे आहेत. सतराव्या शतकातील या जागेचे एक चित्र: या चित्रात डावीकडे दिसणार्‍या भव्य प्रासादात सोळाव्या शतकापासून राजघराण्यातील लोकांचे वास्तव्य असायचे, मात्र १८७० सालच्य

श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 24/07/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी
आटपाट संकेतस्थळ होतं. आंतरजालावरती त्याचं नाव होतं. तेथे येणारा प्रत्येक सदस्य त्याचप्रमाणे सहज म्हणून येणारा पाहूणा तेथे देहभान विसरत होता. तेथील सुविधांना भुलत होता. देशोदेशातील व्यक्तींना तेथे मुक्त प्रवेश होता. म्हणूनच तेथे अनेक व्यक्तीस्वभावांचे प्रदर्शन भरले होते. असल्याच अनेक व्यक्तींपैकी राजा रवी हा एक तेथील सदस्य होता. तो मोठा पराक्रमी, मानी होता. त्याचा स्वभाव दिलदार होता. पण तो तत्वाला जागणारा होता. आपल्या तत्वाच्या बाहेर काही करण्यास त्याचा नकार असे.

चेतनची शोकांतिका

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 20/07/2011 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या व्यक्तिचे विचार, त्याचे महात्म्य जगाला कळतच नाही. सॊक्रेटीसला त्याच्याच समाजातील विद्वान ओळखू शकले नाहीत, ज्ञानेश्वर आदी भावंडांचे मोठेपण तर त्यांच्या जन्मगावातील लोकांनाच कळले नाही.

गुगल वर मराठी यावी म्हणून मागणी

लेखक निनाद यांनी बुधवार, 20/07/2011 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषांतराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन मागणी बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे. आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे.

लोकपाल बिल - भ्रष्टाचार-विरोधी सर्वसामान्यांचा लढा ! फक्त एक फोन करा

लेखक वाहीदा यांनी गुरुवार, 09/06/2011 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
माननिय मिपाकर, नमस्कार ! भारत सरकारने अण्णांवर एक अट टाकली आहे जर २५ करोड नागरिकांना हे लोकपाल बिल हवे असेल तर त्यांनी या लोकपाल बिलाला आपली सहमती दर्शवायला हवी ! त्यासाठी काही फ़्रि नंबर लोकपाल बिलासाठी दिले गेले आहे उदा. +९१-२२-६१५५०७८९ / +91-22-61550789 हा नंबर मुंबई साठी आहे इतर शहरांची सध्या माहीती नाही तुम्हाला फ़क्त येथे एक विनामुल्य फ़ोन करायचा आहे.

होमी भाभा यांचा कलासंग्रह – चुकवू नये असे काही

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 31/05/2011 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
शास्त्रज्ञ म्हणून होमी भाभा अनेकांना माहीत असतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी आणि रसिक बाजू माहीत होण्यासाठी थोडी वाट वाकडी करावी लागते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत जागोजागी विखुरलेली चित्रं आणि शिल्पं संस्थेला भेट देणाऱ्या कुणाही डोळस माणसाच्या नजरेत भरतात. होमी भाभा यांनी केलेल्या कलासंग्रहातली ती आहेत हे कळण्यासाठी मात्र थोडं चौकस असावं लागतं.

(फळं) खा, पिऊ नका!

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 21/05/2011 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
'माझा रोजचा फिक्स ब्रेकफास्ट असतो- एका अंड्याचे ऑम्लेट, दोन टोस्ट आणि एक ग्लास ऑरेंज ज्यूस.' 'दुपारी आम्ही ऑफिसची सर्व मंडळी चालायला जातो, टी टाईमला , तेव्हा सगळे चहा पितात पण मी मात्र ज्यूस सेंटर चे फ्रेश ज्यूस पिते. ' ' रोज संध्याकाळी मी माझ्या रिटायर्ड मित्रांसोबत जॉगर्स पार्क ला जातो, तिथून परत येताना मी फ्रूट आणि भाज्यांचे मिक्स हर्बल ज्यूस पितो, वरून साखर न घालता बरं का!' आहेत न ह्या सगळ्यांच्या एकदम हेल्दी हॅबिट्स? मला विचाराल तर, नाही. ह्या पैकी कुणाचीच सवय खरंच आरोग्यदायक नाहीये. हं, हेल्दी मानसिकता नक्की आहे.