Skip to main content

प्रतिसाद

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर पुन्हा दहशतवादी हल्ला !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 04/12/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई (ब्रेबॉन)- ता. ३ डिसेंबर (पीटीआय,एएफपी,एबीसी,ळक्षज्ञ) - दहशतवादी हल्ल्यांना सरावलेल्या मुंबईत आज पुन्हा दक्षिण मुंबईतल्या ब्रेबॉन स्टेडियमवर "क्रिकेट-ए-तोबा" ह्या भारतीय संघाने श्रीलंकन क्रिकेट संघावर हल्ला चढवला आणि पुन्हा मुंबईस (आणि अवघ्या क्रिकेटजगास) वेठीस धरले. ह्या हल्ल्यामध्ये श्रीलंकन क्रिकेटचे एटीएस प्रमुख मुथय्या मुरलीधरन ह्यांच्यासह सहा गोलंदाजांची गोलंदाजी शहीद झाल्याचे वृत्त आहे. सकाळी १० च्या सुमारास नुकताच "क्रिकेट - ए - तोबा" मध्ये निवड झालेल्या एम विजय ह्याने काही फैरी झाडल्या तेव्हा कमिशनर कुमार संगकारा ह्यांना पुढे यू घातलेल्या वादळाची कल्पना आली नाही.

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

विकांत - मालवण (तारकर्ली).....

लेखक नाम्या झंगाट यांनी गुरुवार, 05/11/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो, येणा-या विकांतासाठी हापिसच्या गँग सोबत मालवण (तारकर्ली) येथे जाण्याचे प्रयोजन केले आहे. फिरस्त्यांना मालवण (तारकर्ली) बाबतचे (मार्ग, रहण्याची व जेवणाची सोय, कुठे-कुठे आणी कोणते ठिकाणी भेट दिली पाहिजे इत्यादि... )आपले अनूभव, सुचना, शिफारस "शेअर" करण्याची नम्र विनंती..... कळावे, लोभ असावा नाम्या झंगाट

चाळीशी

लेखक विकास यांनी गुरुवार, 29/10/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
"A mere forty years ago, beach volleyball was just beginning. No bureaucrat would have invented it, and that's what freedom is all about."
Newt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)
आज हे वरील वाक्य आठवायचे कारण जरा "स्पेश्शल" आहे. ज्या एका जाळ्यात गुंतत तुम्ही आम्ही आज केवळ मराठी संकेतस्थळांपुरतेच नाही तर दिवसातील अनेक गोष्टी करत असतो, त्याच्या शिवाय जगणे अशक्यच, ज्याने जगात वैचारीक मुक्तपणा (freedom)आणला... अशा एका तंत्रज्ञानाचा "औपचारीक" चाळीसावा वाढदिवस आहे.

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/10/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे. आज पराशेठ चा ताईचा सल्ला वाचला अन मला माझी ताई लिहीत असणार्‍या 'साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला' याची आठवण झाली. हा सल्ला जरी हलकाफूलका, खेळकर वातावरणात लिहीला गेला तरी त्यात माझ्या मते एक अतिशय चांगला सल्ला दिला गेला आहे. आजकाल सगळीकडे विज, पाणी यांच्या भविष्यातील टंचाईबद्दल बोलले जाते. तस पाहिले तर या दोन्ही गोष्टी आपण फारच हलक्या घेतो.

आली माझ्या घरी ही दिवाळी

लेखक प्रभो यांनी रविवार, 25/10/2009 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीला घरी गेलो होतो.त्याची काही छायाचित्रे मिपाकर कुटुंबियांसोबत शेअर करावी वाटली म्हणून इथे देत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेली रांगोळी. ही रांगोळी आईने काढली.

... देवाचं घर !

लेखक दशानन यांनी शनिवार, 24/10/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/10/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर! शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :) आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.
अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो.

पाऊस कधीचा पडतो

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 16/10/2009 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैव, अस्वस्थता या आणि अशा काही संज्ञांच्या व्याख्या जडगोळा तत्त्वज्ञानाची पुस्तके, वर्तमानपत्रांतील लक्षवेधी लेख किंवा थोरामोठ्यांची टाळीबाज व्याख्याने यांतून होतच नसतात. त्या होतात स्वानुभूतीतून. म्हणजे रविवारी ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता.

मार्केट १७००० च्यावर

लेखक दशानन यांनी बुधवार, 30/09/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज मार्केट १७००० च्यावर गेले.... अनेक ज्योतीषी / चॅनेलवाले बोंबलत होते की मार्केट ह्या महिन्यात नक्की पडणार पण.. असल्या लोकांच्या नाकावर टिच्चुन मार्केट ने भरारी मारली... मज्जा आली ! आता काही प्रश्न ! ह्या ज्योतिष्यांचे काय करावे ? ह्या टिव्ही वाल्यांचे काय करावे ? जरा काही झाले की मार्केट पडणार... तो मंगळ वाकडा झाला.. तो राहु कुठे तरी घुसला तर म्हणे वाट लावणार... तरी मार्केट वर आलेच ना ? भले आता खाली जाऊ दे.. पण खाली जाणे गरजचे असते कचरा साफ होतो त्याला करेक्शन असे म्हणतात... कारण भक्कम पाया असला की इमारत चांगली उभी राहते छोटी मोठी वादळे मग काही करु शकणार नाहीत वाकडे त्याचे....