Skip to main content

प्रतिक्रिया

दहीहंडी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 24/08/2014 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षीप्रमाणेच कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह जोर धरत होता. दहीहंडीसाठी शहराशहरात, गावागावात गोविंदापथकं तयारी करत होती. पण जेमतेम दोन हजार लोकवस्तीच्या सुजाणपूर मधलं चित्रं काही वेगळंच होतं. सरपंचांच्या आदेशानंतर दहीहंडीला एक आठवडा उरलेला असल्यापासूनच गावात हंड्या उभारल्या गेल्या होत्या. गावाच्या प्रत्येक पाड्याची एक हंडी अशा प्रकारे एकूण दहा दहीहंड्या गावात उभारल्या गेल्या. या हंड्या गोपाळकाल्याच्या पाच दिवस आधीपासूनच उभारल्या गेल्या. या हंड्यांची उंची इतकी होती की जिथे लहानात लहान मुलाचाही हात सहज पोचेल. म्हणजे जेमतेम दोन फूट.

काही लँडस्केप्स...............

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 08/06/2014 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अमेरिकेत असल्यामुळे तेथील काही लॅंडस्केप्स टाकत आहे...... कलादालनात टाकण्यास जमत नाही त्यामुळे येथे टाकले आहे.

गोपिनाथ मुंडे

लेखक विकास यांनी मंगळवार, 03/06/2014 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
Munde भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले. स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...

आजचा भारत आणि चित्रपट: 'वर्ल्ड वॉर झी'

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 23/05/2014 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील माझ्या मित्रानो (कौतिक करणारे माझे मित्र आणि मला शिव्याशाप देणारे सुद्धा माझेच मित्र ), मी इथे मिपावर काय टंकतो, त्यामागचं पगालापन इथे देत आहे, ते तुम्ही नेहमीप्रमाणेच खेळीमेळीने, कोणताही पूर्वग्रह न बाळगता, संयमाने समजून घ्यालच, असा मला तुमच्यावर विश्वास आहेच.

चेंबूर - कालिना उड्डाणमार्ग अखेर वाहतुकीसाठी उघडला!

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 18/04/2014 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
गेली १० वर्षे रखडलेला चेंबूर ते कालिना (सी एस टी मार्ग) उड्डाणमार्ग आज सकाळी वाहतुकीस खुला झाला. ठाणे ते कालिना कचेरी घरापासुन अगदी कचेरीत शिरेपर्यंत वाटेत २ सहकार्‍यांना घेण्यासाठीचे दोन थांबे धरुनही केवळ ३५ मिनिटे लागली. त्यातही रमाबाई नगर ते कालिना विद्यापिठाच्या अलिकडील टप्पा हे अंतर अवघ्या ९ मिनिटात संपले. पहिलाच दिवस असल्याने सर्वत्र वाहतुक पोलिस दक्ष होते. मजा आली. वेळ तर वाचलाच पण घाटकोपरला महामार्ग सोडल्यानंतर घ्यावे लागणारे गल्ली-बोळ, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भंगार साम्राज्याचा बराचसा भाग व त्या त्या भागातली वाहतुक कोंडी, मनस्ताप हे सगळे टळले.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 11/04/2014 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल! ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 07/04/2014 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.

हर्षा भोगले यांचे IIM-Ahmadabad मधील भाषण

लेखक साधा मुलगा यांनी सोमवार, 07/04/2014 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा you tube वर फिरत असताना प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचे IIM A मधील भाषण ऐकले. खरे तर पहिले मी या भाषणाचा एक तुकडा पाहिला. जो ‘talent Vs attitude’ अशा नावाने होता. तो पाहिल्यावर मला संपूर्ण भाषण बघण्याचा मोह आवरला नाही.हर्षा हे स्वतः या संस्थेचे विद्यार्थी होते. ते पट्टीचे वक्ते असल्याने त्यांनी अतिशय कौशल्याने हे भाषण फुलवले आहे. हे भाषण जुने म्हणजे ३० जुलै २००५ चे आहे. भाषणाचा विषय आहे, “achievers of excellence”.

लोचा ए उल्फत

लेखक आयुर्हित यांनी गुरुवार, 03/04/2014 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे पहाटे दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला आणि जाग आली. बेडवर उठून हाताचे दर्शन घेतले. जमिनीला वंदन करून पाय ठेवला. कोण आले एवढ्या सकाळी? दरवाजा उघडून पहातो तर दुधवाला नुकताच दुध टाकून गेलेला. दुधाची पिशवी सोबत आजचा पेपर घरात आत घेतला.