मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ

विवेकपटाईत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नवरा: तुमच्या रोजच्या कटकटींमुळे मी त्रासून गेलो आहे. आत्महत्येचा विचार मनात येतो आहे. बायको: "खुशाल कर, कुणी रोखले आहे तुला? पण लक्षात ठेव, लग्नात मला जन्म भर पोसण्याचे वचन दिले होते तुझी दोन लेकरं आहेत. त्यांचा उद्धारही तुलाच करायचा आहे. नवरा: माझा कोट्यवधीचा विमा आहे, काही कमी पडणार नाही तुला. बायको: तेवढ्या पैश्यांनी काही ही होणार नाही. ज्या मुलीच्या बापाने आत्महत्या केली आहे, तिला लग्नाच्या बाजारात खपविण्यासाठी भरपूर हुंडा द्यावा लागेल. मुलीचे लग्न करून ही जवाबदारी संपता नाही. त्यासाठी आठ-दहा कोटी लागतील. बायको: तुझ्या मुलालाही पुढचे शिक्षण अमेरिकेत घ्यायचे आहे. त्यासाठीही आठ-दहा कोटी लागतील. माझी ही नुकतीच पन्नाशी उलटली आहे. अजून तीस-चाळीस वर्षे मी जिवंत राहणार. माझ्या रोजच्या खर्चाची व्यवस्था तुला करावी लागेल. मी एक पतिव्रता स्त्री आहे. बाहेर ख्याली नाही. माझ्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा लग्न करावे लागेल. एका विधवेला पुन्हा विवाह करण्यासाठी भरपूर हुंडा मोजावा लागतो. माझ्यासाठीही वीस-पंचवीस कोटींची व्यवस्था करावी लागेल. एवढे जमले तर खुशाल कर.. आत्महत्या... माझी ना नाही. पोरांनीही आईच्या म्हणण्याला दुजोरा दिला. नवरा: म्हणजे, मी आत्महत्या करणार, याचे तुम्हाला काहीच वाटत नाही. आता मी आत्महत्या करणार म्हणजे करणार. मरण्यापूर्वी तुमची चोख व्यवस्था करून जाईल. चिंता करू नका. काही दिवसांनी आकाशात एक विमान कोसळले. त्यात विमान चालकासहित अनेक मृत्युमुखी पडले. काही महिन्यांनी एकाच मांडवात दोन लग्न झाली. दोघींचे नवरे विमान चालक होते. लग्नपत्रिका सुपारीच्या आकाराची होती. सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ मला अजूनही उलगडले नाही. सुपारी लग्न पत्रिका

वाचन 884 प्रतिक्रिया 0