Skip to main content

प्रतिभा

"सिंगिंग इन द रेन"

लेखक प्रास यांनी बुधवार, 16/02/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आजच बातमी ऐकली की उत्तर भारतामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि मला एका पाऊस-गाण्याची आठवण झाली. गाण्याबरोबर आठवला ते गाणं ज्या चित्रपटात आहे तो चित्रपट आणि त्याचे अप्रतिम, देखणं सादरीकरण. या माझ्या एका आवडत्या हॉलिवूडपटाची - म्युझिकलची मिपाकरांना ओळख करुन द्यायचा छोटासा प्रयत्न! १९५२ साली एका हॉलीवूड चित्रपटाचा मूकपट ते बोलपट प्रवास गमतीशीर पद्धतीने सांगणारा हा एक चित्रपट निघाला होता.