Skip to main content

प्रतिभा

आजोबांची काठी

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 06/05/2011 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवतंय तेव्हापासून माझ्या आजोबांकडे एक सुंदर काठी होती. त्यांना ती कोणीतरी मोठ्या व्यक्तीने भेट दिली होती. नक्षीदार मुठीची, सुबक बाकदार आकाराची, किंमती लाकडाची आणि एकदम ऐटदार! आजोबा आणि त्यांची काठी ह्यांचे अगदी जुळ्याचे नाते होते. जिथे जिथे आजोबा जातील तिथे तिथे ती काठी त्यांच्याबरोबर प्रवास करत असे. मला आणि इतर सर्व भावंडांना त्या काठीचे विलक्षण आकर्षण होते. पण आजोबा तिला जीवापाड जपत. आम्ही खोडसाळ पोरांनी त्यांच्या काठीला हात लावलेला त्यांना बिलकुल खपत नसे. खरे तर ती काठी आजोबांची गरज होती.

कँडिडेट्स मॅचेस - २०११

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/05/2011 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीच्या सोविएत संघराज्याचा एक भाग असलेल्या परंतु आता स्वतंत्र अशा तातारस्तानची राजधानी कझान इथे दि.५ मे २०११ पासून, म्हणजे उद्यापासून, बुद्धीबळ जगताचे लक्ष लागून राहिलेल्या कँडिडेट्स मॅचेस सुरु होत आहेत. २०१२ सालच्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेसाठी सध्याचा जगज्जेता विश्वनाथन आनंदचा प्रतिस्पर्धी ठरवण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ह्या मॅचेसमधून साध्य होणार आहे. आठ खेळाडूंमधून एकाची निवड होईल. कोण असेल हा खेळाडू?

पिउनी अमृत घेउनी संचित...!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/04/2011 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्याकरता मिपाचे डॉ रमताराम यांचे मनापासून आभार.. पाखरा जा.. (येथे ऐका) पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु लं. चित्रपटकार, नाटककार, व्याख्याता, साहित्यिक, एकपात्री, दाता, इ इ इ असलेला एक अफाट खेळिया. परंतु या छोटेखानी लेखाचा संबंध संगीतकार आणि गायक पुलंशी आहे.. 'गमपसां धसां' असा आलाप असलेली गाण्याची सुरवात. 'जा' या अक्षरावरचा सुंदर निषाद. गमम, गमधप रेसा या स्वरावलींनी पूर्ण होणारे 'प्रेमळ, शीतल छाया..' हे शब्द. सारंच अतिसुंदर! नंद रागाचा भक्कम बेस असलेलं हे गाणं.

हे जग मी सुंदर करून जाईन....

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 21/04/2011 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... नाशिकला विध्यार्थी स्नेह-संमेलनात भाईकाकांनी केलेल्या भाषणाचा काही भाग नुकताच मी इथे वाचला. त्यांनी केलेल्या अनेक उत्तमोत्तम भाषणांपैकी एक!!! कधीकाळी नाशिकला पुलंनी केलेलं हे भाषण अजूनही खूप नाविन्यपूर्ण वाटते, त्यापेक्षा मी असं म्हणेन की, पुलंची कुठलीही भाषण असू द्यात ती कधीच जुनी होऊ शकत नाहीत.

सुंदर माझा गाव !!!

लेखक परदेश् वासी तरिहि घाटी यांनी गुरुवार, 21/04/2011 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपा कर, मी एक नवीन मिपा कर आहे. सध्या व्हर्जिनिया टेक या अमेरिकन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हे विद्यापीठ वॉशिंगटन डीसी पासून ३०० मैलावर ब्लॅकस्‍बर्ग या छोट्याश्या गावात आहे. विद्यापीठाचा परिसर खूपच सुंदर आहे. नुकतेच मी काही फोटो घेतलेत. ते इथे सादर करत आहे. आशा करतो कि मिपा कर चांगला प्रतिसाद देतील. फोटोंवर प्रतिक्रिया दिल्यास अति उत्तम.