Skip to main content

प्रतिभा

''मसाला'' म(स्ट)स्त आहे...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 21/04/2012 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मसाल्या'ची मी तर प्रोमोज पाहिल्या पासुन वाट बघत होतो. वासही चांगला खमंग येत होता.आणी कारखान्याचा अंदाज असल्यानी तो खमंग असणार इतकं मनाशी पक्कं झालेलं होतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिनुमा बघत असताना त्यात पुर्ण हरवायचा आनंद घेता आला. गिरिश कुलकर्णि. आणी अमृता सुभाष एक गरिब जोडपं अतिशय कष्टाळुपणा हा अंगिभूत गुण असलेलं,हे जोडपं हीच चित्रपटाची मध्यवर्ती भुमिका आहे.

डुप्लिकेट आयडी : एक मार्गदर्शन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 19/04/2012 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमर :- १) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही. २) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही. मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्‍याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले.

सावज !

लेखक चाफा यांनी रविवार, 15/04/2012 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
`स्नायपर शिंदे शुद्धीवर आलाय ताबडतोब हेड ऑफिसला पोहोचणे' हातातल्या त्या तारेचा आशय नक्की मला कळतोय तोच असल्याची मी चार-चारदा खात्री करून घेतली. अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसणं सोपं वाटत नव्हतं. गेल्या दशकातलीच गोष्ट आहे ही, आसामच्या जंगलात नाईलाजास्तव सैन्य तैनात करावं लागलं होतं, एकमेव कारण बोडो अतिरेकी. सुरुवातीला वाटलं त्यापेक्षा जास्त उपद्रव द्यायला त्यांनी एव्हाना सुरुवात केली होती, भले भले ऑफिसर्स त्यांच्या घातपाती कारवायांना बळी पडत होते. आसामच जंगल म्हणजे काळ बनलं होतं आणि अश्यावेळेस मी माझ्या साथीदारांसह तिथे तैनात केल्या गेलो होतो.

मिथक

लेखक पेशवा यांनी शुक्रवार, 13/04/2012 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
१. अजयने खिडकीचे दार उघडले. समोरच्या पदपथावर शेजारच्या सोनावण्यांची मुग्धा शाळेच्या बसची वाट पाहत उभी होती. पाठीवर दप्तर, हातात पाण्याची बाटली, पायात लाल बूट, चेहर्‍यावर बस कधी येते याची आतुरता. अजय निर्विकारपणे हे पाहत होता. सोनावणे आजी, म्हणजे मुग्धाची आजी, मुग्धाला हे करू नको, ते करू नको, असे वाग, तसे वागू नको हे सांगण्यात गुंग होत्या. अजयने हातातल्या चहाचा घोट घेतला. सकाळच्या आठाचे ठोके पडायला सुरुवात झाली. एक दीर्घ श्वास घेत त्याने सुस्कारा सोडला. डोळे मिटून अवघडलेली मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे फिरवली. पुन्हा एक दीर्घ श्वास घेत तो वळला. पलंगावर त्याचा इस्त्री केलेला ड्रेस पडला होता. चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला. टाय बांधता बांधता नेहमीच्या सवयीने त्याने स्नेहाला हाक मारली, "स्नेहा, माझं वॉलेट कुठे आहे?" आणि दुसर्‍या क्षणी त्याच्या काळजाचा ठोका चुकला. डोळे पाण्याने भरून आले. हाताला घाम फुटला. तसाच आवेगाने मागे होत तो पलंगावर दोन हात बाजूला ठेवून मान खाली घालून बसला. येणार्‍या उमाळ्याला आवरायचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. ओंजळीत चेहरा लपवत तो तसाच पलंगावर लवंडला. मुसमुसत रडत राहिला.

आम्ही आणि स्वाईन फ्लु

लेखक चाफा यांनी गुरुवार, 12/04/2012 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख फार पुर्वी म्हणजे जेंव्हा स्वाईन फ्ल्यु ने भारतभर हाहाकार माजवला होता तेंव्हा लिहीलेला आहे पण आता पुन्हा एकदा पुण्यात स्वाईनफ्ल्यु चे दुष्टचक्र सुरु झाल्याचं कळल्यावर इथे टाकतोय ********** " येतो गं अशु...." बाहेर पाडण्यापूर्वी मी सौ. ला हाक मारली. " अरे, पण मास्क घातलायस का?" सौ. ने आठवण करून दिली. हो ! आजकाल कुठे बाहेर पडायचं झालं तर डोक्यात हेल्मेट घातलेय की नाही यापेक्षा तिची मी मास्क घातलाय की नाही यावर जास्त नजर असते. कारण सगळ्यांनाच माहिताय. आजकाल जगभर धुडगूस घालणारा ‘स्वाईन फ्लू’. या रोगाने माझ्या जीवनशैलीत मरणाचा फरक करून ठेवलाय.

तो आणि ती

लेखक चाफा यांनी मंगळवार, 10/04/2012 04:36 या दिवशी प्रकाशित केले.
तो आला, नेहमी प्रमाणेच धाड धाड करून शूज रॅकमध्ये ठेवले आणि घरात आला. धडामकन सोफ्यावर पडला, त्याच्या गाडीच्या आवाजानं मी बाहेर आले, पण नेहमीसारखी नव्हे. माझ्याकडे पाहताच त्याचा भडका उडाला, तो उडणारच होता हे मला माहीत होतं. "आशु, अजून सकाळचाच ड्रेस अंगावर ? " " हो ! काय वाईट आहे त्यात ? " " तुला माहीताय मला आवडत नाही " " नसू दे आवडत, मी काही बाउंड्रीवर फिल्डिंग करत नसते की डाइव्ह मारून चेंडू अडवताना कपडे खराब होतील " " तू रैनासारखी फिल्डिंग कर, किंवा द्रवीडसारखी बॅटींग कर पण जरा टापटीप राहायला काही प्रॉब्लेम आहे का तुला ? " " हे 'तू' मला सांगतोयस ?

टायटॅनिक 4D

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/04/2012 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी कुठेतरी वाचले होते किंवा ऐकले होते, असे म्हणतात की कुठल्याही चित्रपटाला यशस्वी तेव्हाच म्हणायला हवे जेव्हा प्रेक्षक त्या चित्रपटाचे एक डायमेन्शन बनून जाईल. 3D मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला टायटॅनिक ह्यात अगदी तंतोतंत पास झालेला आहे.

हे बंध रेशमाचे

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 09/04/2012 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी चिवचिवत येणार्‍या चिमण्या हा माझ्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. सकाळी बाहेरच्या खोलीचे काचेचे दरवाजे सरकावायला जरा उशीर झाला तर बाहेर आवाज सुरू झालेला असतो. दारं उघडायची खोटी. चिवचिवाटाने जणु ’सुप्रभात’ करत चिमण्या आंत शिरतात. छज्जावर तांदुळ टाकले की प्रथम आपल्या थव्यातील इतर चिमण्यांना साद घालणार आणि मग एकेक दाणा टिपायला सुरुवात. एकिकडे चिवचिवाट सुरुच असतो. अनेक वर्षे हे नियमितपणे होत असल्याने आता सरावाने मला साधारण तीन प्रकारचे बोल लक्षात येउ लागले आहेत.

सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 08/04/2012 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही.

ब्लड मनी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 05/04/2012 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
लिखाणाला सुरुवात करण्याआधी मला दोन अपराधांची क्षमा मागायची आहे. ते कन्फेशन का काय म्हणतात ना ते. १) मी ब्लडमनी हा चित्रपट पैसे खर्च करून थेटरात जाऊन बघितला. २) आणि वर मी आता त्याचे परीक्षण देखील लिहीत आहे. ब्लड मनी हा महेश भट्ट साहेबांचा चित्रपट, अर्थात तो कुठूनतरी ढापलेल्या प्लॉटवरून तयार केलेला असणार हे उघड होतेच. त्यातून त्याला अभिनयसम्राट कुणाल खेमू आणि जगप्रसिद्ध अभिनेत्री अम्रिता पुरी असल्याचे कळले आणि आम्ही ब्लड मनी विषयी वाचायचे देखील बंद केले.