बुवांचा जन्म
एका वाचनमात्र मिपासदस्याकडून इमेलवर मिळालेली कथा. त्यांच्या परवानगीने प्रसिद्ध करत आहे.
प्रेरणा/मूळ कथा: भुताचा जन्म. लेखक - द. मा. मिरासदार
-------------------------
गेले चार दिवस भिंतीला तुंबड्या लावत होतो. काय करणार? मी सतत मिपावर पडीक. कामाच्या नावाने बोंब. **वर एक सणसणीत लाथ मारून साहेबांनी हाकलला मला. तेवढीच एक बसली असती तर ठीक पण साहेब भारदस्त त्यांची लाथ
त्यांच्याहून भारदस्त. मी जो कोलमडलो तो थेट डोक्यावर जाऊन पडलो. तेव्हापासूनच थोडासा बदलत चाललो होतो हे लक्षात येत होते. त्यातच देशमुख्याचा फोन आला. देशमुख्या म्हणजे बापमाणूस. नै नै तसा बाप नाही.
मिसळपाव
