Skip to main content

प्रकटन

स्वसंरक्षणासाठी फुलपाखराची युक्ती

लेखक सुधांशुनूलकर यांनी शुक्रवार, 21/10/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गुरवे नम: || फुलपाखराचे कोष एकदा असेच निसर्गभ्रमंतीला गेलो होतो. सकाळची वेळ. वाटेत एका उपाहारगृहात चहा-न्याहारीसाठी थांबलो. निसर्गप्रेमी शोधक नजर सभोवती भिरभिरत होतीच. जवळच एक रुईचं झुडूप दिसलं. त्याची बरीचशी पानं कुरतडलेली होती. फुलपाखराने या झुडपावर नक्कीच अंडी घातली असणार. त्याच्या अळ्यांनी पानांचा फराळ केला असणार. झुडपाच्या अगदी जवळ गेल्यावर, एका पानाच्या आड लपलेला कोष दिसला.

फिशरमन्स व्हार्फ..

लेखक गवि यांनी गुरुवार, 20/10/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याला फेरी ही माझ्या जिवाभावाची गोष्ट आहे. यंदाच्या फेरीत मी माझ्या आवडत्या कोळवा बीचवरच मुक्काम ठोकला. कोळवा बीचवर केंच्युकी हे खाण्याचं जबरदस्त ठिकाण आहे. त्याहूनही भारी असलेलं "मार्टिन्स कॉर्नर" तिथून थोड्याश्याच अंतरावर आहे. या ठिकाणांविषयी परत कधीतरी लिहीन कदाचित. पण यंदा असंच फिरत फिरत सापडलेलं ठिकाण म्हणजे "फिशरमन्स व्हार्फ" सर्वांसमोर आणावं म्हणून लिहावंसं वाटलं.. खादाडी सफरीमधे.. अशा खात्रीने की मिपावर अनेक खाद्यसंप्रदायी आहेत, आणि वेगवेगळ्या टाईपची खादाडीची ठिकाणं माहीत झालेली त्यांना आवडतील यावेळी काहीतरी वेगळं हवं होतं.

माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११

लेखक कौन्तेय यांनी रविवार, 16/10/2011 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११ रामराम! सप्टेंबरात मिपा.करांकडून माझ्या माळशेज सहलीबाबत कौल मागितला होता ( http://www.misalpav.com/node/19017 ). त्यावेळी शैलेन्द्र, अजितजी, वल्ली, विक्षिप्त अदिती, योगप्रभू, परीकथेतील राजकुमार नि सुनील यांच्या उद्बोधक तर बाकी बऱ्याच जणांचा रंजक प्रतिक्रीया आल्या. त्यां सगळ्यांवर विसंबूनच आमची सहल सुरू केली आणि सुफ़ळ संपूर्णही झाली. सर्वांना धन्यवाद! मुंबई - नाणेघाट रस्त्यावरचा जलविहार - माळशेज - मुक्काम - शिवनेरी - माळशेज - विश्रांती - मुंबईप्रस्थान असा कार्यक्रम केला.

कावळा, कडी आणि कॅमेरा

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 14/10/2011 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईसारख्या महानगरात राहिल्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणजे इथे मानव प्राण्याखेरिज इतर प्राणी आणि पक्षी सृष्टी अगदीच मर्यादित प्रमाणात बघायला मिळते. शेवटी खरी प्राणी-पक्षी सृष्टी सिमेंटच्या जंगलात थोडीच पहायला मिळणार आहे? पण असं असलं तरी थोडासाच का होईना, इथे आपल्याही भोवताली, छोट्यासा निसर्गाचा एखादा तुकडा उपलब्ध असतोच. गरज असते फक्त तो शोधण्याची. काही वेळेला असंही होतं, हा निसर्ग, त्याच्या एखाद्या घटकाच्या माध्यमातून अगदी आपल्या घरापर्यंत येऊन बसतो आणि एक प्रकारे आपल्याला त्याची दखल घ्यायला भाग पाडतो. गेल्या रविवारी अशाच एका गोष्टीचा मी साक्षीदार झालो.

डेनिस रिचीला श्रध्द्दांजली

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 14/10/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
'C' programming चा जनक डेनिस रिची आज आपल्यातुन निघुन गेला. Unix operating system च्या निर्मीत्तीमध्येही याचा खुप मोठा वाटा होता. Assembly च्या जमान्यात 'C' खरच एक रिव्होल्युशन होते. त्याला श्रध्द्दांजली चेतन

वेळ आहे कुणाला?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 14/10/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेंढरं ? मेंढरं आणि आम्ही छे! छे! काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यामागे इतकी कामं पडलेली असतात की आम्हांला कुठे म्हणजे कुठेही लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि आपला नगरसेवक कोण आहे? हे सर्वांना माहीत झाले म्हणजे काय तो वार्डातली पेंडिंग कामे तातडीने मार्गी लावणार आहे का? देशाचं नेतृत्व काय करतंय? त्याने कसं काम करावं? हे सांगणारे आपण महाभाग कोण? आणि जरी ओरडून सांगितलं तरी ते ऐकलं जाईलच हे कशावरून? नळी फुंकिली सोनारे... असं नेहमी होतंच आलंय की नाही? आता ह्या जनलोकपालाचंच घ्या. ते विधेयक पारित झाल्यावर फार फार तर दोन चार वर्षे भ्रष्टाचार होणार नाही.

अंधेर नगरी चौपट राजा

लेखक जयनीत यांनी बुधवार, 12/10/2011 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
अंधेर नगरीत एका महान योगीराजांचे आगमन झाले . चौपट राजाने त्यांचे अगत्याने स्वागत केले . योगीराजांना भूत , वर्तमान , भविष्य त्रिकालात सर्वकाही बघू शकण्याची सिद्धी प्राप्त होती . राजाने त्यांना सन्मानपूर्वक दरबारात विराजित करून आपले भविष्य विचारले . योगीराज क्षणात समाधिस्थ झाले . जागृत होऊन त्यांनी राजाच्या कानात सांगितले " हे राजा लवकरच तुझा सर्वनाश अटळ आहे , प्रजा तुझ्या कुशासनाला कंटाळली आहे .

'नीम का पेड' आणि त्याचं शीर्षक गीत - मूँह की बात सुने हर कोई

लेखक प्रास यांनी मंगळवार, 11/10/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
९०च्या दशकाच्या मध्यात, बहुतेक ९४-९५ च्या सुमारास दूरदर्शनवर रात्री ९ वाजता एक सुंदर मालिका लागायची. तिचं नाव होतं 'नीम का पेड'. तेव्हाही ती मालिका बघत असताना सारखं वाटायचं की आपण काही क्लासिकल किंवा अभिजात बघतोय. कथा एका बुधाई राम नावाच्या गरीब माणसाची होती. हा बुधाई राम खरं तर एक हरकाम्या असतो, गावच्या मुसलमान जमीनदाराकडे. जमीनदाराचं काहीही काम असलं की त्याला याचीच आठवण होत असे.