प्रतीक्षा आणि आगमन
कुठल्याही विमानतळाचा आगमन कक्ष किंवा जवळपासचा परिसर. सगळेच आपापल्या धुंदीत आणि तरीही विमानाच्या वेळेकडे काटेकोर लक्ष. कुणी एकटेच, कुणी कुटुंबासोबत. कुणी अक्ख्या गावासोबत. कुणाच्या हातात स्वागताचे बोर्ड तर कुणाच्या हातात फुलं. सगळ्यांचे लक्ष फक्त आपली जवळची व्यक्ती कधी येतेय याकडे. कुणाच्या हातात नावांचे बोर्ड. एकदा या चार लोकांना यांच्या घरी यांना सोडले की माझे आजचे काम संपणार या विचारातले काही लोक. कुणाचा महिनाभराचा तर कुणाचा वर्षाचा विरह. पण सगळ्यात जास्त वाट बघायला लावणारी वेळ म्हणजे ही शेवटची काही मिनिटे. फोन, स्काइप, इमेल्स हे सगळे विमानात बसायच्या आधीपर्यंत चालूच असते.
मिसळपाव
गोष्ट तशी ८ वर्षापुर्वीची. मी B.E. II year मध्ये होतो. माझा मित्र विजय , शेंडी लावण्यात तरबेज. डोक्यानी थोडे मंद असे २-४ लोक शोधायचे आणि त्यांची मजा घ्यायची, त्याचा हा नेहमीचा टाईमपास.
डिसेंबर २००४ मध्ये आलेल्या सुनामीत अडकलेल्या एका जहाजेवर २००६ साली पोसायडन नावाचा सिनेमा आला होता. विजय आणि इतर काही मित्र सोबत रात्री ६-९ चा शो पाहून आलो. होस्टेल च्या खिडकीतून माझ्या रूम वरून मी बघितले तर विजय ४-५ मित्रांना सोबत घेऊन काही सांगत होता.