Skip to main content

प्रकटन

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....

लेखक रॉबिन्सन कृसो यांनी शुक्रवार, 15/01/2016 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो आणि मिपाकरणींनो, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मला माझा मिपा आय.डी. मिळाला. एका दर्जेदार संकेतस्थळावर, आमच्याकडून तरी वेडेवाकडे लिहिले जाणार नाही, ह्याची मी काळजी घेईनच पण काही चुकले-माकले तर, (हम आदमी है|भगवान नहीं|), कान उघाडणी जरूर करा. आपलाच, रॉ.कृ.

थँक यू मिस्टर ड्रॅगन –2

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 15/01/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो,

थँक यू मिस्टर ड्रॅगन –2

1 या मार्गाचा सुटसुटीत नकाशा डॉ. सुहास म्हात्रे यांनी भाग 1 मधे सादर केला असल्याने इथे परत देत नाही... ...मसूद अजहरला पकडल्यामुळे काही काळापासून मोदींच्या राजकारणातील चालींना काही प्रमाणात वलण लागल्याचे दिसत असताना चीनने काश्मिरचा प्रश्न मोडीत काढायचे ठरवले आहे. हे विधान वाचायला कसे वाटेल? ही लेखमाला वाचा. संजीव ओकांनी राजमत न्यूजमधे हे लिखाण केले आहे.

पूर्वेच्या समुद्रात -- १५

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 15/01/2016 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात -- १५ पूर्वेच्या समुद्रात -१४ दुसर्या दिवशी आम्ही विशाखापटणमसाठी कूच केले. विशाखापटणमला पोहोचल्यावर मी ताबडतोब एक हाताने अर्ज खरडला कि माझे पोस्टिंग तटरक्षक दलासाठी झाले असले तरीही मला कल्याणी या रुग्णालयात विशेषज्ञ म्हणून सेवा देण्यासाठी( SPECIALIST COVER) सांगितलेले आहे आणी तेथील तज्ञ सुटीवर गेल्यावर मी पूर्ण वेळ तेथे हजर असतो त्यामुळे मला नौदलाच्या गृह वसाहतीत घर मिळावे. या अर्जावर कमांडिंग अधिकार्याने सही केली आणी तो स्थानिक तटरक्षक दलाच्या आणी नौदलाच्या मुख्यालयाकडे रवाना केला.

हेलो हेलो

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 14/01/2016 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
‘हेलो हेलो’ ‘कोण ?’ ‘उपाध्ये बोलते.’ ‘बोला’ ‘अमिको ची नवीन औषधे आलीयेत. एक महिन्यात चार केजी वेटलॉस.’ ‘अहो मला वजन कमी नाही करायचं, वाढवायचं आहे.’ ‘मग वेटगेनचं औषध घेऊन संध्याकाळी येऊ ?’ ‘नको, माझी डायेटीशियन आहे, ती खंबीर आहे माझी काळजी घ्यायला.’ ‘ताई, प्रोटीन टी आहे बघा अमिकोचा. वजन हमखास वाढणार. एक महिन्याची पावडर बाराशे रुपये फक्त. आणू ?’ ‘अहो नको उपाध्येवहिनी. मी कॉफी घेते फक्त.’ ‘मुलांना द्या. चांगली आहे हो.’ ‘मुलगा कॉम्प्लान घेतो.’ ‘कसलं पांचट ते कॉम्प्लान ! अमिको जेकप्रोट एकदा देऊन बघा, परत दुसरं काही पिणार नाही.’ ‘सॉरी उपाध्येवहिनी.

पूर्वेच्या समुद्रात -१४

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 13/01/2016 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात- १३ पूर्वेच्या समुद्रात -१४ बायकोने चार दिवस पावसात, वीज नसताना, मुलं आजारी पडलेली घरात कामाला बाई नाही अशा परिस्थितीत कशी काढली याचा विचार करून मला फार वाईट वाटत होते. तेवढ्यात माझ्या मनात एक विचार चमकला कि मी मूळ नौदलाचा अधिकारी इथे तटरक्षक दलात काही स्वयंसेवक म्हणून अर्ज करून आलो नव्हतो त्यातून मी नौदलाच्या रुग्णालयात कामही करत होतो.असे असताना केवळ एका नियम दाखवून त्यांनी मला नौदलाच्या तळावर घर दिले नाही हा स्पष्ट अन्याय आहे. माझे डोकेच फिरले. तिरीमिरीत मी जहाजावर परत आलो आणि ExO कमांडंट विश्वकर्मा यांच्याशी बोललो.

बँकेचा असाही एक अनुभव...

लेखक पुणे मुंग्रापं यांनी मंगळवार, 12/01/2016 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
बँकेचे व्यवहार करणे ग्राहकांना सुलभ व्हावे या दृष्टीने अनेक सुविधा अलिकडच्या काळात उपलब्ध झाल्या आहेत. विशेषतः नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सारख्या सुविधांमुले पैशाची देवघेव, खरेदी – विक्री, नियमित सेवांची बिले भरणे इत्यादी व्यवहार अक्षरशः एका बोटावर होत आहेत. ए. टी. एम. च्या सुविधेमुळे तर क्षणार्धात पैसा ग्राहकासमोर हजर होतो. या सुविधांबरोबरच गैरव्यवहाराच्या, सदोष सेवेच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. ए. टी. एम.

मला गुरू भेटला!...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 08/01/2016 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुचे कोणत्याही रूपात दर्शन होते. म्हणजे, जटाभस्मांकित किंवा मस्तकामागे तेजोवलयांकित, गळाभर माळा, भाळी चंदनाचा टिळा, असेच गुरूचे रूप असले पाहिजे असे नाही... जगातली, आसपासची चल वा अचल, सजीव वा निर्जीव वस्तूदेखील आपल्याला गुरुमंत्र देऊन जाते. फक्त त्याच्या आकलनाची शक्ती हवी! ***-****-**** आज मी प्रयोगादाखल गुरुशोध सुरू केला, आणि माझ्याच मनातले हे माझे विचार मला तंतोतंत पटले. .... मी विचार करत बसलो होतो. नजर निरुद्देशपणे जमिनीवर स्थिर होती. तितक्यात एक मुंगी समोर आली. मला माझा विचार आठवला. मुंगीच्या रूपाने गुरूच तर समोर आला नसेल? मी मनाशी हसलो. विचार झटकून टाकला. ...

देहभार

लेखक विवेक ठाकूर यांनी शुक्रवार, 08/01/2016 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व प्रथम, मी वजनावरचे कुठलेही लेख अजून तरी वाचलेले नाहीत, तस्मात हा लेख कोणत्याही लेखाला प्रत्युत्तर नाही. दुसरी गोष्ट, माझा शरीरशास्त्राचा आभ्यास नाही. ‘मी शरीर नसून मला शरीराची जाणीव आहे’ या स्वानुभवातून आणि रोजच्या जगण्यातून केलेलं हे लेखन आहे. माझ्या मते, वजन घटवण्याचे इतर उपाय कष्टदायक वाटले तरी काहीशा निश्चयानं ते पार पाडता येतील. या लेखातले अनुभव वरकरणी सोपे वाटले तरी जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला तर त्यांची प्रचिती निश्चित येईल. ______________________________ पहिली गोष्ट, आपण शरीर नाही; आपल्याला शरीराची जाणीव आहे. तस्मात, वजन शरीराला आहे, आपल्याला नाही.

आक्षेपार्ह काय ?

लेखक शरद यांनी गुरुवार, 07/01/2016 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्यत: मी प्रतिसादांवर प्रत्युत्तरे देण्याचे टाळतो. त्याचा उपयोग किती ह्याबद्दल शंकाच असते. एक दोनवेळा मित्रांना व्य,नि.पाठवला होता.आज मात्र त्याची गरज दिसते. प्रथम सांगावयाची गोष्ट म्हणजे मी व प्रा.वालावलकर किमान गेली आठएक वर्षे आठवड्यातून सहावेळा संध्याकाळी भेटतो. समवयस्क, निनिराळ्या क्षेत्रातील सहा-सात ज्येष्ट नागरिकांची ही एक मैफलच असते. निरनिराळ्या क्षेत्रातील, निरनिराळ्या आवडीनिवडी, अनुभव यांची देवाणघेवाण यांमुळे हा आता दिवसाचा वाट पहावी असा घटक झाला आहे.

कल्लरी

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 07/01/2016 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
कल्लरी. अरे वा... छानच आहे नाव... आणि वेगळं सुद्धा. पण अर्थ काय नावाचा? हे नाव ठेवायचं ठरलं, तेव्हा मी सुद्धा अर्थ शोधू लागले. दोन अर्थ सापडले मला. कल्लरी हे शिवशंकराच्या एका नृत्यशैलीचे नाव आणि कल्लरी हे एका प्राचीन दाक्षिणात्य युद्धविद्येचं नाव. बरोबर. आणखी एक गंमत सांगतो. कल्ल म्हणजे दगड. अश्मयुगात दगडाची हत्यारं वापरली जात. दगडाच्या या शस्त्रांनी केलं जाणारं युद्ध म्हणजे कल्लरी. मग, तुमची कल्लरी कशी आहे... नावाला जागते सर... भूक लागली, लहर फिरली की तांडव करते आणि एरवी आम्हाला युद्धकलेची प्रात्यक्षिकं देते... माझं उत्तर ऐकून सर हसू लागले. सात महिन्यांची झाली ना.. निवळेल हळू-हळू... ....