Skip to main content

कौतुक

लेखक Pearl यांनी मंगळवार, 15/05/2012 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक ... एकदम जादूई शब्द आहे ना. आणि त्याचा इफेक्ट पण जादूच्या कांडीसारखाच. सगळ्यांनाच आवडतं कौतुक. अगदी लहान मूलापासून ते आजी-आजोबांपर्यंत.. खरचं कोणी प्रशंसेचे दोन शब्द बोलले की कसं छान वाटतं ना, अंगावरून मोरपिस फिरल्यासारख. आणि कौतुक कशाचंही केलं जाऊ शकतं अगदी लहान सहान गोष्टींचंही. ते करण्यासाठीही फार काही मह्त्कष्ट पडतात असंही नाही. दोन चांगले शब्द बोलायला काहीच त्रास नसतो. मनुष्य स्वभावाचीही किती गंमत आहे ना.

बेस्ट फ्रॉम वेस्ट

लेखक jaypal यांनी बुधवार, 09/05/2012 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा parkar1 नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या. आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत. parkar2 हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

दादा, तुस्सी ग्रेट थे!

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 09/05/2012 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यातच दादा कोंडके यांचे 'एकटा जीव' हे आत्मचरित्र वाचले होते. धमाल आली होती वाचताना. त्यात 'शेणसार बोर्ड' नावाचे एक प्रकरण आहे. दादा कोंडक्यांनी त्यात त्यांचे सेन्सॉर बोर्डाबरोबर, विषेशतः बोर्डावरील स्त्रियांबरोबर, झालेले वादविवाद मजेशीर पद्धातीने कथन केलेत.

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 22/04/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

''मसाला'' म(स्ट)स्त आहे...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 21/04/2012 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मसाल्या'ची मी तर प्रोमोज पाहिल्या पासुन वाट बघत होतो. वासही चांगला खमंग येत होता.आणी कारखान्याचा अंदाज असल्यानी तो खमंग असणार इतकं मनाशी पक्कं झालेलं होतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिनुमा बघत असताना त्यात पुर्ण हरवायचा आनंद घेता आला. गिरिश कुलकर्णि. आणी अमृता सुभाष एक गरिब जोडपं अतिशय कष्टाळुपणा हा अंगिभूत गुण असलेलं,हे जोडपं हीच चित्रपटाची मध्यवर्ती भुमिका आहे.

डुप्लिकेट आयडी : एक मार्गदर्शन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 19/04/2012 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमर :- १) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही. २) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही. मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्‍याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले.

!!!! ....हे अस्स्सचं का होतं....!!!!

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 15/04/2012 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
!!!! ....हे अस्स्सचं का होतं....!!!! हे नेहमी अस्स्सचं का होतं जे ठरवलंय, नेमकं त्याच्या उलटं घडतं.. भूक लागते जोरदार, तेव्हा नसतो जेवायला वेळ परीक्षा असली की चालू होतो लोड -शेडिंग चा खेळ.. Important फोन करायचा असेल तर मिळत नाही Range 1000/- चे सुट्टे करायला गेलो तर कोणी देत नाही Change.... दोन मराठी माणसे भेटली तरी बोलतात मात्र 'हिंदी' Email Account काढायची Process का असते खूपच 'Lengthy'.... 5 रु .

(धप्पकन)

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 12/04/2012 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरुन जाताना चालू सिग्नलमधून धप्पकन आवाज कानात घुसला.. कोणाचा तरी फाटलेला स्पिकर असणार.. छातीत नुसतीच धडधड आणि मनात कचकचीत शिव्या आल्या.. संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा कानात खुपणारा तो भसाडा आवाज... कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा.. कुठच्याही वेळेला कारटेप लावून शायनिंग मारतात... काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची... मान वळवून मागे बघितलं तर तो '४१४१ घड्याळवाला' स्कॉर्पिओ होता... मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! -(मनातल्या मनात)

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/04/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.