Skip to main content

माध्यमवेध

परा आणि धमु

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 08/01/2011 11:52 या दिवशी प्रकाशित केले.

'रामदासांचा अर्थबोध' या धाग्यात लिहिलं होतं - "पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत." अशी आणि ही या दोन शब्दांतील अंतर दूर झाले आहे. ;)
'सामना'च्या 'फुलोरा'मध्ये आज मिपाचे दोन वीर झळकले आहेत.
परिकथेतील राजकुमार - प्रसाद ताम्हणकर.
धमाल मुलगा - कैवल्य देशमुख.
पराने लिहिलंय ते दहावी-बारावीची तयारी या विषयावर वेबविश्वात काय चालतं याविषयी, तर धमुने लिहिलं आहे दुबईच्या 'गोल्ड सूक'विषयी.
फुलोरावर क्लिक करा. दोघांचेही लेख वाचा.

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 05/01/2011 23:47 या दिवशी प्रकाशित केले.

आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली.

जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला. ते जम्मूत पत्रकारांशी बोलत होते.

रामदासांचा अर्थबोध!

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 01/01/2011 12:30 या दिवशी प्रकाशित केले.

मिपाचे समर्थ लेखक रामदास यांची 'सामना' या वृत्तपत्रात आजपासून लेखमालिका सुरू झाली आहे. हे आहेत अर्थबोधाचे धडे. रामदासांचा हा अर्थबोध 'सामना'च्या वाचकांना श्रीमंत करेल, तसाच तो मिपाकरांनाही लाभदायी ठरावा.
'सामना'च्या फुलोरा या दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या पुरवणीत "पैसा कसा कमवाल" या नावाचे हे सदर आहे. वर दुवा दिला आहेच. तेथे हेडरमध्ये उजवीकडे 'फुलोरा' ही लिंक आहे. तेथे आज रामदासांचे दोन लेख मिळतील. एक प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. दुसरा थेट त्या विषयात वाचकाला नेणारा.

अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

लेखक चिंतातुर जंतू यांनी बुधवार, 22/12/2010 18:53 या दिवशी प्रकाशित केले.

भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे.

कहाणी बालपण हरवलेल्यांची ...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 15/12/2010 17:01 या दिवशी प्रकाशित केले.

समाजातील काही चित्रण अशीही आहेत .. तेच देतो आहे, कविता विभागात देत होतो पण ह्या कविता नाहितच कदाचीत हे आहे चित्र आपल्या आजुबाजुचे .. यातुन एका जरी मुलाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तरी छान वाटेल ..

कहाणी .. १.

म्या एक चौथीतली पोर
बा न शाळा बंद केलीया
आता उजवायच म्हन्तुया मला
कोपर्‍या वरचा हात भट्टीवाला बबन
मागणी घालतुया मला

मायेसSन पुसल म्या
लगीन म्हंन्जी ग काय ?
चींगीचा भाउला अन माझी बाहुली
तसच हे असतय काय ?

अल्लाह के बंदे

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 04/12/2010 13:28 या दिवशी प्रकाशित केले.

बरेच दिवस मित्रांकडून 'अल्लाह के बंदे' ह्या चित्रपटाविषयी ऐकत होतो. "नसिरुद्दिन शहा आणि अतुल कुलकर्णीनी काय बाप काम केलंय राव" पासून "भिकार पिक्चर आहे, नसिरुद्दिन शहाला वाया घालवलंय" पर्यंतच्या कॉमेंट्स अधे मध्ये कानावर येतच होत्या, पण 'स्वतः बघायचा आणि मगच मत ठरवायचे' हा आमचा दंडक असल्याने शेवटी काल अल्लाह च्या बंद्यांचे दर्शन घ्यायचे निश्चित केले.

झिंग थिंग..!!

लेखक गवि यांनी बुधवार, 24/11/2010 18:09 या दिवशी प्रकाशित केले.

ब्रँड नॉस्टाल्जिया ही एक मजेशीर चीज आहे..

आज अशाच काही ब्रँडमित्रांची आठवण झाली ..

पहिला गोल्ड स्पॉट ..झिंग थिंग..!!

संत्र्याची मिरमिरीत मस्त चव आत्ताही जिभेवर आली..

हाँ हुजूर.. वो मेरा दीवाना जरूर.. !!
मेरा उतना दीवाना जितने दोनों है दीवाने..
गोल्ड स्पॉट.. दीवानों का मज़ा..गोल्ड स्पॉट..!!

कोकाकोलानं थम्स अप् सोबत हाही विकत घेतला आणि ठार केला..

लिम्कासुद्धा फोटोत गेला होता.. पण त्याचं अवतारकार्य बाकी होतं..

त्याचा पुनर्जन्म झाला..

आय ड्रिंक लिम्का बिकॉज आय लाईक इट.. !!

छायाचित्रे अशीही

लेखक मस्तानी यांनी गुरुवार, 18/11/2010 08:30 या दिवशी प्रकाशित केले.

"डास, किडे, बुरशी अशा गोष्टींचे अतिसुंदर फोटो" असं म्हणून काही लिहायला सुरुवात केली तर पुढे वाचावं की नाही अशी शंकाच येईल नाही तुम्हाला. पण शंका न घेता खालील दुवा बघा. निसर्ग आपला चमत्कार कोणत्या स्वरुपात दाखवेल सांगता येत नाही. नायकोन कंपनीने आयोजित केलेल्या या छायाचित्र स्पर्धेतील विजेते आणि उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते सर्वच फोटो एका वेगळ्या सूक्ष्म दुनियेचे दर्शन घडवणारे आहेत. मिपा वर खूप चांगले छायाचित्रकार आणि दर्दी असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत म्हणून हा दुवा आपणा सर्वांना द्यावासा वाटला. आवडेल अशी अपेक्षा आहे :)