Skip to main content

लेख

कामकरत राहणं जीवनाला गोड-सुखद बनवतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 07/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
"मला ज्यावेळी विचारलं गेलं,की मी काय मानते?त्यावेळी उत्तर देण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की ह्याला उत्तर द्दायला आपण काय करतो त्याकडे नीट निरखून लक्ष दिलं पाहिजे.कारण आपण जे काय करतो त्याकडे सहजगत्या आणि इमानदारीने पाहिल्यास ज्याच्यावर आपला विश्वास आहे तेच आपण करीत असतो.आणि तेच आपण मानतो.

बीस्ट ऑफ बाकू!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 05/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
४ नोवेंबर २०००. पश्चिम लंडनमधल्या हॅमरस्मिथ उपनगरातला रिवरसाईड टेलीविजन स्टुडियो. आत बसलेले काही भाग्यवान लोक श्वास रोखून पडद्याकडे बघत होते. आजच्याच डावात सारं काही संपणार की आणखी शेवटचा एक डाव खेळाला जाणार ह्याबद्दल उत्सुकता शिगेला पोचली होती. पंधराव्या डावात काळी मोहोरी घेऊन खेळणार्‍या क्रामनिकनं अडतिसाव्या चालीला आपला हत्ती पाचव्या पट्टीत नेला.

नम्रतेचा अमुल्य धडा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 05/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
"शहरात येऊन मध्यमवर्गीयात राहून त्यांच जीवनचर्य अंगिकारून राहिल्याने माझे पूर्वीचे खेड्यातले दिवस विसरणं,मी कोण आहे हे विसरणं,मी कुठे होतो,आणि पुढे मला कुठे जायचंय ह्याचा विचार विसरून जाणं हे सर्व सहज सोपं होतं." माझा मित्र मोहन मोकाशी खूप दिवसानी मला भेटला.जुन्या गप्पा मारण्यात मजा येत होती.तो त्याच्या आठवणी मला सांगू लागला.शहरातली रहाणी आणि लोकांची एकमेकाशी वागणूक या विषयावर चर्चा होत असताना,रोजच्या घाईगर्दीच्या जीवनात बारीक बारीक कारणावरून बाचाबाचीचेच प्रकार जास्त होत असतात.असा त्याचा बोलण्याचा सूर होता. शक्यतो नम्रतेने राहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो असं म्हणाला.

भिंगरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 04/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझी भेट प्रो.देसायांशी तळ्यावर झाली तेव्हा भाऊसाहेब जरा मला "फारमात" दिसले,हे माझं भाकित खरं ठरलं जेव्हा ते मला म्हणाले, "मी आज तुम्हाला लेक्चर देणार आहे.आज मला माझ्या करीयरची आठवण येऊन एखादा विषय घेऊन त्यावर "चर्वीचरण" करायला हूक्की आली आहे" मी म्हणालो, "भाऊसाहेब तुमच्या चर्चेचा विषय तरी काय आहे.?

चौदशपुत्रा ...? ...? ...?...?

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 03/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
चौदा मुलांची आई कुमारिका तर खचित नसेल, पण आजकाल कांही सांगता येत नाही. अमेरिकेत अशी एक आई आहे, पण ती स्त्री सौभाग्यवती आहे, की अविवाहिता, की विधवा , की घटस्फोटिता याबद्दल गूढ आहे. पण तो मुद्दा या लेखाचा विषय नाही. एका विलक्षण घटनेबद्दल ज्या क्रमाने जशा प्रकारच्या बातम्या येत गेल्या त्या खूपच रोचक होत्या. त्याबद्दल या ठिकाणी मी लिहिणार आहे. "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव।" असा आशीर्वाद आपल्याकडे पूर्वीच्या काळी सगळ्या मुलींना देत असत. आजकालचे 'कुटुंबनियोजन' किंवा त्यापूर्वी होत असलेले 'संततीनियमन' सुरू होण्यापूर्वीच्या काळात एकदा घरातला पाळणा हलायला लागला की तो सारखा हलतच रहायचा.

माझा विज्ञानदिन

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 03/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस हापिसात 'विज्ञान दिना'ची तयारी केली पाहिजे असं वाक्य अनेकविध भाषा आणि हेलांमधून कानांवर येत होतं. पण इमेल किंवा नोटीस न आल्यामुळे डोळ्यात येत नव्हतं. अनेक वांझोट्या चर्चा सुरू असतात, त्यातली ही पण एक असा विचार केला आणि मी पण काही फार मनावर घेतलं नाही. आणि एक दिवस मी प्रपोजलच्या कामात पूर्ण बुडालेले असताना बॉस नं.

अक्षराची किमया.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 01/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं जेव्हा शब्दाबद्दलचं ज्ञान वाढत गेलं,तेव्हा माझा आत्मविश्वास आणि माझं धैर्य पण वाढत गेलं.त्यानंतर मी ठरवलं,की माझ्या बहिणी आणि माझे भाऊ ह्यांना पण सुशिक्षीत केलं पाहिजे.आणि ते सुद्धा त्यांना शिकायचं असेल तेव्हडं." आमच्या लहानपणी एक गोपिकाबाई नांवाची बाई घरकामाला यायची.आमच्या राहत्या घरापासून जवळ जवळ चार मैलावर ती राहायची.रोज सकाळी आठ वाजता यायची ती संध्याकाळी काळोख होता होता निघून जायची.तिला दोन तिन मुली होत्या.त्यातली धाकटी चमेली तिच्याबरोबर नेहमीच असायची.ती जशी शाळेत शिकायच्या वयाची झाली तेव्हा तिला मी नेहमीच म्हणायचो, " चमेली तू खूप शिक.शिकलीस का तुला जगायला मजा येणार.आणि तुझ्या आईसा

भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६

लेखक दशानन यांनी शनिवार, 28/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का? - मनिष ह्यांचा एक प्रतिसाद. हे वाचल्यावर मनात आलं की चला जरा मिपा करांना दिल्ली-६ ची सफर घडवू या.

मनाच्या कुपितले-आनंद

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 27/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा माझा नववा लेख स्पष्टीकरण-या सदरातला मुळ लेख कालच प्रसिद्ध झालेला होता ,मात्र आम्ही काही कारणामुळे हा लेख येथुन उडवत आहे. आपणास तो लेख वाचावयाचा असल्यास आपण तो इथे वाचु शकता. http://batmidar1.blogspot.com/2009/02/blog-post_25.html तर दोस्तानो हा माझा नवीन लेख. हा लेख लिहिण्यासाठी आम्ही जुना लेख उडवला अयचे कारण म्हणजे आम्ही स्वतवर घातलेले आठवड्याला एका लेखाचे बंधन बकी काहीही नाही. तर आवडले तर सांगा आणि नाही आवडले तर फाट्यावर मारण्यास विसरु नका

मालवणी गजाल.

लेखक प्रतिभा बिवलकर यांनी गुरुवार, 26/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कणकवलेक राणे नांवाचे डॉक्टर आसत.सगळे राणे आता रावराणे नाव लावतत.ह्यो रावराणे दाक्तर ,त्याका लहानपनापासून बगीतलेलो.त्याचो बापूस कणकवलेच्या सोमवारच्या बाजारात नारळ विकत होतो.ह्यो पोरगो चांगलो शिकलो.मुंबईक इलो. एमबीबीएस झालो. गांवात इलो.एक दवाखानो थाटल्यान.दोन वर्षात तीन मजली दवाखानो घातल्यान. झाला काय? मी आता सत्तर वर्षाचो..मे महिन्यातसगळ्या कुटुंबाक घेवन कणकवल्येक गेलय.आंबे खाल्लय.गरे खाल्लय,काजूगर,काजू खाल्लय.पोटात चावरी वाटाक लागली.सगळी म्हणाली.तुमी रावराणे डॉक्टराकडे जावा.मी गेलंय. डॉक्टरान पाच दिवसांचा औषध दिल्यानी.सगळा औषध घेतलंय पण चावरी कमी नाय.तीन इंजीक्शना झाली. तरी फरक नय.