माझी आवडती पुस्तके भाग: १
नमस्कार, परवा एका प्रश्न आणि उत्तर साईटवर तुमचे सर्वात आवडते पुस्तक कोणते? असा प्रश्न विचारला होता. त्यानिमित्ताने मी हा लेख लिहला होता. त्यामध्ये थोडेफार बदल करून तो मिपावर पोस्ट करतोय.
तशी मी भरपूर पुस्तकं वाचली नाहीयेत पण फारच कमी वाचलीयेत असं पण नाही (अजुन बरीच पुस्तके वाचायची आहेत त्यामुळे मला स्वतःला नेहमी वाटत असतं की माझं वाचन अजुन खूपच कमी आहे.) आता त्या सगळ्या पुस्तकांमधून माझं सर्वात आवडत एकच पुस्तक निवडणं खूपच अवघड काम आहे.. खेळण्याच्या दुकानात सगळी आवडती खेळणी समोर पाहिल्यावर एखाद्या लहान मुलाची जी मनःस्थिती होते अगदी तशीच मनःस्थिती सर्वात आवडतं पुस्तक निवडताना माझीही होते.
मिसळपाव