Skip to main content

लेख

चप्पल पुराण

लेखक सुनिल पाटकर यांनी शुक्रवार, 17/09/2010 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
नदीचं मुळ आणि साधूच कुळ कुणी शोधू नये असं म्हणतात. मला वाटतं तसचं चपलांचा इतिहास कुणी शोधू नये. पादुका, खडावा, चप्पल,बूट असा हा चपलेचा अनंतकाळाचा प्रवास ...

एका तेलियाने (पुस्तक परिचय)

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 16/09/2010 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
ekaa teliyaane ’शेख अहमद झाकी यामानी !’ नाव ऐकलंय? किंवा ऐकल्यासारखं वाटतंय ? ’एका तेलियाने’ हे पुस्तक वाचण्याआधी ’शेख अहमद झाकी यामानी’ या नावाशी कधी थेट संबंध आला नव्हता. सौदी अरेबिया, तिथली राजेशाही, तेलामुळे मिळणारा आणि ऐषोआरामासाठी पाण्यासारखा वाहणारा त्यांच्याकडचा पैसा ह्याबद्दल इथून-तिथून किस्से / कहाण्या ऐकल्या / वाचल्या होत्या. लंडनच्या नाइटक्लब्जमधे एकेका रात्रीत लाखो डॉलर्स उधळणाऱ्या राजपुत्रांबद्दलही वाचलं होतं.

Paths of Glory

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 14/09/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही चित्रपट पाहुन झपाटल्यासारखे होते. मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. आपण नि:शब्द होतो. स्टेनली कुब्रिक दिग्दर्शित पाथ्स ऑफ ग्लोरी हा असाच एक चित्रपट. लोलिता, आइज वाइड शट, क्लोकवर्क ऑरेंज असे एकापेक्षा एक वादग्रस्त आणि भडक चित्रपट बनवणार्‍या कुब्रिकने पाथ्स ऑफ ग्लोरी सारखी दर्जेदार कलाकृती देखील सादर केली आहे. पाथ्स ऑफ ग्लोरी याच नावाच्या Humphrey Cobb लिखीत कादंबरी वर आधारीत आहे. चित्रपटाला पहिल्या महायुद्धातील जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामधल्या एका लढाईची पार्श्वभूमी आहे. पण हा युद्धपट मात्र नाही. लढाईमागचे राजकारण हाच या चित्रपटाचा विषय आहे.

हे बंध रेशमाचे.. (संपुर्ण)

लेखक निखिल देशपांडे यांनी गुरुवार, 09/09/2010 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेमदिनी पूर्वप्रकाशित) प्रिय सखे.... तू हे वाचे पर्यंत प्रेमदिन सुरु झालेला असेल... ह्या प्रेमदिनी मी आज हे प्रेमपत्र लिहित आहे. खरे तर ह्या नंतर तुझी रिऍक्शन काय असेल ह्या भीतीने लिहायला हात धजावत नाहीय पण आता याचीही सवय होत आहे असेच म्हणावेसे लागेल... गेल्या तीन वर्षा पासून आपण एकमेकांना ओळखतो... ओळखतो म्हणजे काय? मागचे तीन महिने सोडले तर आपले बोलणे फार कमीच व्हायचे. अर्थात त्याला कारण मीच आहे हे मला मान्य आहेच.. वागलोच होतो मी तसा... त्याची शिक्षा करतोय ना सहन गेले तीन वर्ष.. आता अजुन किती सहन करणार????

नव्या रुपयाच्या नाण्याचा घोळ : डॉक्टर संजय होनकलसे

लेखक dr sanjay honkalse यांनी सोमवार, 30/08/2010 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या रुपयाच्या नाण्याचा घोळ : डॉक्टर संजय होनकलसे drsanjayhonkalse@gmail.com http://drsanjayhonkalse.tripod.com आर्थिक प्रगती पासून वाढणाऱ्या उत्पादनाला बाजारात क्रियाशीलता मिळवून देण्यासाठी चलनाची आवशकता असते त्यासाठी चलन शास्त्राचा योग्य व आदर्श उपयोग करण्याचे काम हे देशाच्या वित्त धोरण व वित्त संस्थेचे असते.