Skip to main content

लेख

अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय?

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 23/02/2011 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय? अलीकडील घटना पहाता अमेरिका भारताशी मैत्री करू इच्छिते आहे असे चित्र दिसत आहे. क्लिंटन यांच्या कारकीर्दीत याला सुरुवात झाली होती पण त्यांच्या कारकीर्दीत ’नारळ फोडण्या’पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती. धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत कांहींसा वेग आला व अणू ऊर्जा करार होण्यात त्याची परिणती झाली.

गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका - एक अभिजात मराठी पुस्तक

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 22/02/2011 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही दिवसांपूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता.

शिवजयंतीची 'वरात'

लेखक महेश_कुलकर्णी यांनी सोमवार, 21/02/2011 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : शनिवार १९ फेब्रुवारी २०११, संध्याकाळ ठिकाण : छोटेसे तरुण गणेशोत्सव मंडळ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सरकारी जयंती (अनेक तिथी असल्यामुळे नक्की कोणते ते नमूद केले). सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण.

कुर्‍हाडीचा दांडा

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 21/02/2011 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
कुर्‍हाडीचा दांडा काही दिवसापूर्वी मला माझ्या एका मित्राने एक बातमी सांगितली. "महाराष्ट्र शासनाने कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेला शेतकरी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झाला आहे." खरे तर ही दु:खद बातमी. ज्याच्या कुणाच्या नशिबात हा भोग आलाय, त्याच्याबद्दल हळहळ आणि मनात सहानुभूती निर्माण करणारी बातमी. पण ही बातमी ऐकताना मला मात्र अजिबात दु:ख झाले नाही किंवा ऐकल्यावर माझ्या मनाच्या कोणत्याच कोपर्‍यात तीळभरही सहानुभूती निर्माण झाली नाही, उलट ही बातमी मला आनंदच(असूरी?) देऊन गेली.

कोडी

लेखक तिमा यांनी रविवार, 20/02/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसांचे मेंदू हे धक्का स्टार्ट असतात. विशेषत: कमी वेळात एखादी गोष्ट करायला सांगितली तर मेंदू मूळ क्षमता सुध्दा गमावून बसतो. माझ्या बाबतीत तसेच आहे. त्यामुळे एका तासात १०० प्रश्न, असल्या परीक्षा देण्याचा मी विचार देखील करू शकत नाही. ह्याच कारणामुळे व शिवाय मुळातच बथ्थड मेंदू असल्यामुळे मी कोडी या प्रकारांना फार घाबरतो. लहानपणी तर हा माझा कमकुवतपणा जगजाहीर झाल्यामुळे मित्रांनी व शिक्षकांनी मला ‘नको जिणे’ करून सोडले होते. एकदा वर्गात मित्राने विचारले, ए बुधल्या, ‘रामाच्या दु कानांत उ, तम चिवडा’ म्हणजे काय ? मी उत्तरच दिले नाही. घरी येईपर्यंत विचार केला.

एक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा!

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 14/02/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
जून च्या शेवटच्या शनिवारच्या संध्याकाळी त्सेंटा आजीने ग्रीलचा बेत केला होता (होहो, म्हणजेच ते तुमचं बार्बेक्यू..) पण ती जरा सचिंत दिसत होती. कारण विचारले तर म्हणाली मागच्या आठवड्यात हॉल बुक केला पण हान्सीयुर्गान आता ट्रीपला जाणार आहे तो ३ आठवड्यांनी येणार, त्याच्यापुढे आमंत्रणपत्रं तयार करायची तर वेळ नाही.. म्हणून आम्ही ह्योक्स्ट मधल्या प्रिंटरांकडे जायचं म्हटलं तर ३०-३५ पत्रिका छापून द्यायला कोण तयार होणार?

शुभ्लग्न

लेखक साबुदाणा खिचडी यांनी रविवार, 13/02/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
शुभलग्न व्यक्तिगत जीवन व सामाजिक जीवन ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे कुटुंबव्यवस्था असे म्हणता येईल .दोन व्यक्ती कुटुम्ब व्यव स्थे मुळेएकत्र होतात .अशी अनेक कुटुंबे एकत्र होऊन समाज बनतो .

कामापुरता नर

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 11/02/2011 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं मधमाशांचं पोळं भरात आलं की त्या झाडाखाली जमिनीवर काही मधमाशा मृतावस्थेत आढळतात. त्या नर माशा असतात. नरांचं काम संपलं की राणीमाशी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. किंवा सरळ त्यांना रक्षक माशांकडून मारले जाते. ती मात्र आपली अंडी उबवण्यातच धन्यता मानते. किती हा विरोधाभास! म्हणजे ज्या नरांमुळे आपल्या उदरी नवी पिढी जन्म घेणार आहे, त्या पित्यांनाच यमसदनास पाठविण्याचा हेतू काय? कोळ्याच्या मादीने आपलं अंडं उराशी बाळगून कोळीष्टक विणलं की त्यात गुरफटला जातो तो अंडे फलित केलेला नरच. तिच्या लेखी त्याचं ‘काम’ संपलेलं असतं. तसा तो देहयष्टीनं तिच्यापुढे लिंबू टिंबूच असतो म्हणा.