Skip to main content

लेख

डाव

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 06/12/2011 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचं कोवळं सोनसरी ऊन चहूकडे पसरले होते. निंबाळकरांच्या वाड्यासमोरच्या हौदात त्या उन्हाचे कवडसे पडुन उन उन हिरे चमकत होते. कधी काळी ज्या वाड्यात हिर्‍यांचा लखलखाट असायचा तिथे आता या हिर्‍यातच समाधान मानून घ्यायला लागत होते. वाड्यासमोरच्या सैलसर मो़कळ्या पटांगणात निंबाळकरांचे दोन चार बैल चरत होते. पलीकडेच नुकतीच पाडसाला जन्म दिलेली गौरा गाय पाडसाला दूध पाजत होती. निंबाळकर तसे जुन्या वळणाचे त्यामुळे पाडसाचे दूध त्यांनी हिरावून घेतले नव्हते. बाकी पटांगणात गावातल्या कुठल्याही घरात असतो तसा आणि तितकाच पसारा पडला होता.

दिग्गजांची ओळख :- छत्रपती शिवाजी

लेखक मन यांनी रविवार, 04/12/2011 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या एका स्थळावर एका चर्चेत शिवाजी महाराजांबद्द्ल काही बोलणे सुरु असताना एका प्रतिसादात शिवाजी महाराजांचा एक प्रोफाइलच तयार झाला. त्यांच्या बद्दल लघुनिबंध म्हणता येइलसा किंवा संक्षिप्त परिचय म्हणता येइल असा तो आहे.

दिलीप प्रभावळकरांचा !

लेखक दिपोटी यांनी मंगळवार, 22/11/2011 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
गांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक आणि रंगभूमीला दिलेल्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार या दोन अत्यंत मानाच्या पुरस्कारांपाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते-लेखक श्री दिलीप प्रभावळकर यांना आता त्यांच्या 'बोक्या सातबंडे' या पुस्तक-मालिकेसाठी गेल्या सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या अभिनयकारकीर्दीचा घेतलेला हा धांडोळा ...

विष्णुगुप्त - ३

लेखक पुष्कर यांनी सोमवार, 21/11/2011 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमीकरिता पहा - विष्णुगुप्त २ (भाग २ मध्ये - "विष्णु... अरे विष्णुगुप्त...." ह्या हाकेने विष्णु एकदम भानावर आला. मागे वळून बघितलं तर एक विद्यार्थी त्याच्या दिशेने धावत येत होता. चेहराही ओळखीचा वाटत होता. तेवढ्यात नेत्रांना नेत्रांची ओळख पटली. भावनावेगात दोघेही एकमेकांवर कडकडून आदळले. त्या विद्यार्थ्याला मिठी मारत विष्णु म्हणाला"इंदुशर्मा, किती रे बदललास!!") पासून पुढे - "विष्णु... मला विश्वासच बसत नाहीये की आपली भेट इथे होते आहे.

आंब्याचे फळ

लेखक सदानंद ठाकूर यांनी रविवार, 20/11/2011 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच माझा एक म्युच्युअल फंडाचा ग्राहक ऑफिसमध्ये भेटयला आला होता, तुम्ही ती आंब्याची गोष्ट मागे सांगीतलीत म्हणून मी म्युच्युअल फंडात एसआपी सुरू केली व ती अजून चालू आहे व आता मला तिचा चांगलाच फायदा झाला आहे, धन्यवाद. मग मला ती मी त्याला सांगीतलेली गोष्ट आठवली. ७/८ वर्षापुर्वी तो ग्राहक माझ्याकडे गुंतवणूकीचा सल्ला मागायला आला होता, तेव्हा त्याने विचारले कि मला म्युच्युअल फंडात थोडी गुंतवणूक करावयाची आहे कसे काय करु ते सांगा तेव्हा मी त्याला प्रथमत: म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचे सगळे फायदे व तोटे सांगीतले व जर तुला यात गुंतवणूक करावयाची असेल तर मी तुला एक माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट सांगतो.