Skip to main content

लेख

शिंदळ

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 11/09/2015 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
यल्लमाच्या पायऱ्यावर सुनी संध्याकाळपर्यंत बसुन होती. दिवसभर देवळात भक्तांची रेलचेल होती. त्यांनी देवीपुढं ठेवलेले पुरणपोळी, शिकरण, नैवैद्य तिनं एका आडबाजुला साठवले होते. आज दिवसभरं ती तेच खात होती. अंधारायला आल्यावर सगळा प्रसाद फडक्यात बांधुन घराकडे चालु लागली. यलम्माच देऊळ अगदीच लहान, एकाच खोलीचं. पण इथे गुरव नव्हता म्हणुन सुनीनं बस्तानं बसवलेलं. गुरवं सगळी तिकडे मोठ्या देवळाकडं, तिकडं ती कधीच जायची नाही. नैवैद्य चोरणाऱ्या गावातल्या पोराठोरांना गुरवं हुसकावुन लावायची. पण या 'मोठया' देवळाकडं जाणारा प्रत्येक भक्त यल्लम्माकडं यायचाच, एखादातरी नैवैद्य आणि थोडीफार चिल्लर देवीला ओवाळायचा. देवीची ह

हैलो, ह्यलो.....

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 10/09/2015 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
१. "हैलो, रामराम ,काय चाललय?" "रामराम, काय नाय बरायं की" "जेवन झालं का?" "न्हाय अजुन, सैपाक हुतुय" "कदी आला कामावरनं?" "हि काय आत्ताच यीवुन बसलुयं" "काय म्हणतयं पौसपाणी" "चिरचिर हाय चालु, तिकडं कसायं?" "न्हाय काय, पाऊस न्हाय, कीळीचं अवघडायं, बोरचं* पण पानी आटलयं" "व्हय, यील की कुठं जातुयं?, आजुन दोन म्हैन हाईत." "कसला यीतुयन काय....

सारेगमप मपधनिसा- एक आठवण

लेखक कहर यांनी गुरुवार, 10/09/2015 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सवात हल्ली गणपतीची सिनेमाच्या तालावरची फुटकळ गाणी ऐकली कि मला अजूनही तिच्या त्या गाण्याची आठवण येते. २५ वर्षे झाली तरी अज्जिबात पुसट न झालेल्या त्या सुरात काय जादू होती काय माहित. प्राथमिक शाळेचा वर्ग भरलेला असायचा. १० ते ५ ची शाळेची वेळ असायची. अभ्यासाचे विषय ४ पर्यंत संपवून एक तासात बाई अभ्यासेतर गोष्टी करून घ्यायच्या. (त्यावेळी madam म्हणायची पद्धत निदान मराठी शाळांमध्ये तरी चालू व्हायची होती.) त्यात प्रामुख्याने अथर्वशीर्ष , रामरक्षा, मनाचे श्लोक असायचे. उरलेल्या वेळात गोष्टी, विनोद, कोडी, सामुहिक कविता, वक्तृत्व किंवा गाणी असायची.

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 09/09/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख.

--------अन----लग्न----------

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 08/09/2015 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
भावाचं लग्न झालेलं आहे. -त्याला एक मुलगी आहे. माझं लग्न झालेलं नाही. गावाकडे आमची अडाणी काकू राहते. ती म्हणते. तुझ्या (म्हणजे माझ्या) आयुष्याला काहीही अर्थ नाही. (मी म्हणतो कोणाच्याही आयुष्याला काय अर्थ असतो?) म्हणजे मी शिकलो, engg झालो. परदेशात वगैरे तरी जाऊन आलो. अन आता चांगला (म्हणजे अजिबात काम नसलेल्या आरामदायी कंपनीत) जॉब करतो- तरी माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं तिचं ठाम मत. कारण असं की- माझं लग्न होत नाहीये. म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीये.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

बाळूकाकांचं गाई-वासरातलं वास्तव्य.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 08/09/2015 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
“पहाटे खळ्यात पडलेला पौर्णिमेच्या मावळत्या चंद्राचा लख्ख प्रकाश पाहून माझा थकवा पार निघून गेला.” आज बर्‍याच दिवसानी मी माझ्या आजोळी गेलो होतो.आता आमच्या वयाचे लोक बरेच कमी झालेले दिसत होते.सहजच हिंडत मी आमच्या शेजार्‍यांकडे गेलो होतो.त्यांच्या कडून कळलं की,बाळूकाका,आमचे दुसरे शेजारी, अजून हयात आहेत.ते हल्ली जास्त हिंडत फिरत नाहीत.त्यांच्या घरी गेल्यावर ते मला खचित भेटतील असं समजून मी त्यांच्या घरी गेलो होतो.कुतूहल म्हणून मी बाळूकाकाना भेटायला गेलो.

सकाळ - त्यांच्या नजरेतुन

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 07/09/2015 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
(थोडा वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न करतोय, गोड मानुन घ्या. चु.भु.द्या.घ्या) ललित- सकाळची कोवळी किरणे हळुचकन अंगाला चिटकली. नयनरम्य स्वप्नांचे बाण इंद्रधनुष्य ऊधळत गेले. किलकिल्या डोळ्यांना खिडकीबाहेरची हिरवाई खुणावत होती. ऊफाळत्या चहाचा कप घेऊन सौभाग्यवती बाजुलाच ऊभी होती. टक्क जागा झालो. ग्राम्य- रामाधरमाच्या पाऱ्याला आंग घाम्याजलं हुतं. उनाचं कवुडसं डोळ्यावर आलं. मक्याची कणसं छटायला खळ्यावर जावं लागणार.

कण्याचा धड़ा

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 07/09/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
-----------------कण्याचा धड़ा--------------- "26 वर्षाचा अनुभव आहे. तू पास झालास तर राजीनामा देईन. सायन्स हे तुमच्यासारख्यांचं काम नाही. कुठं आर्ट-बीट ला जाऊन BA करून शेवटी गावातच पडून रहायचं तर डॉक्टर-इंजीनिअरची स्वप्ने बघत हिथं सायन्सच्या वर्गात बसायला, दुसरयांची जागा आडवायला आलायत. 'थोड़ी शिल्लक असेलच' तर आई बापाला फसवायचं बंद करा अन आर्ट ला एडमिशन घेऊन तिकडं बसा." सर वर्गात असं 'इन जनरल' म्हणायचे. नाव न घेता. कित्येक वेळा. पण मुलांना, मला व सरांना- तिघांनाही माहीत असायचं की हा बाण नेमका कोणाच्या दिशेने सुटलेला आहे. 12वीत गॅप घेतलेला.