Skip to main content

लेख

गीतेतील विशिष्ट ७ श्लोक आणि त्यांचे परस्परसंबंध

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 19/02/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
भगवदगीतेतील मोक्ष, देव देवता आणि परमेश्वर या संदर्भातील विविध अध्यायातील काही (एकमेकांशी परस्पर संबंध असणाऱ्या) श्लोकांचा एकत्रित सलग भावार्थ - गीतेवरील विविध पुस्तकांवर आधारित प्रथम सगळे श्लोक पाहूया: भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ४६ || यावानर्थ उदपाने सर्वत: संप्लुतोदके || || तावान्सर्वेषु वेदेषु ब्राम्हणस्य विजानात: || भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ५६ || दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः || || वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते || भगवद्गीता: अध्याय ७ श्लोक २१ || यो यो यां यां तनु भक्त: श्रद्धायार्चीतुमीछति || || तस्य तस्याचालाम श्रद्धां तामेव विदधम्यहम || भगवद्गीता: अध्याय ९ श्लोक २३

ग्रामीणांचा आहार

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/02/2018 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बाजरीची भाकरी आणि कोणतीही भाजी हा गावातल्या लोकांचा रोजचा मुख्य आहार असायचा. भाजीला पूर्वी या परिसरात अहिराणी भाषेत शाक म्हटलं जायचं. ऋतू कोणताही असो दररोज बाजरीची भाकर जेवणात असायची. भाकर गरम पडते वा डांजते असं कधी चुकूनही कोणाकडून ऐकायला मिळायचं नाही. आणि आजारी पडल्यावर असं निदान इथल्या डॉक्टरनेही कधी केलं नाही. या परिसरात त्यावेळी बाजरी मुबलक प्रमाणात पिकत असल्यामुळे इथल्या जेवणात बाजरीच्या भाकरी शिवाय अजून काही पर्याय असू शकतो अशी कल्पनाही कोणाला नव्हती. इथं गहूही पिकायचा.

व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी बुधवार, 14/02/2018 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा सध्या जगात सर्वत्र प्रेमाला उधाण आलेलं आहे. १४ फेब्रुवारी रोजी साज-या होणा-या 'व्हॅलेंटाईन डे' ची तयारी जोरात सुरू असून दररोज वेगवेगळे दिवस त्यानिमित्ताने साजरे केले जात आहेत. दुकानं, रेस्टॉरंट लाल रंगात न्हाऊन निघाली असून प्रियजनांना भेटवस्तू घेण्याची लगबग सुरू आहे. प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्‍यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी व्हॅलेन्टाईनडे च महत्व अनन्य साधारण आहे.. मनातील प्रेम व्यक्त करण्याचा किंवा प्रिय व्यक्तीला प्रेमाची नव्याने जाणीव करून देण्याचा हा दिवस.

शेजाऱ्याचा डामाडुमा- सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक - मालदीव भाग ८ (अंतिम)

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 13/02/2018 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीव मालिकेतील या आधीचे ७ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील. सातवा भाग इथे आहे :- https://www.misalpav.com/node/41903 आधीच्या भागांमधून आणि त्यावरील प्रतिसादांमधून मालदीवमधल्या सद्यस्थितीबद्दल बरेच सांगून झाले आहे. सध्या मालदीवमधल्या प्रचंड राजकीय उलाढालींमुळे दुसरे 'कॅक्टस' घडेल की काय अशी स्थिती आहे. त्याच्या बातम्या सर्वत्र आहेतच. याचवर्षी आपल्या अन्य काही शेजारी देशांप्रमाणे मालदीवमध्येही सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्याही प्रसारमाध्यमे कव्हर करतील, त्यात मी आणिक वेगळे काय सांगणार?

खेळ गाणी

लेखक प्रणित यांनी शनिवार, 10/02/2018 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी व्हाट्सएप वर खेळगाण्यांचा एक मेसेज वाचायला मिळाला आणि लहानपणी म्हटली जाणारी काही खेळगाणी मी माझ्या मुलीला शिकवली. १. 'आपडी-थापडी.... गुळाची पापडी धम्मक लाडू.... तेल पाडू तेलंगीच्या.... तीन पुऱ्या चाकवताचं.... एकच पान धर गं बेबी.... हाच कान' २.च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ च्याऊ ची कोंबडी आपण खाऊ, च्याऊ ला पैसे कुठून देऊ हंडी फोडून खापऱ्या देऊ ३. 'बदका बदका नाच रे, तुझी पिल्लं पाच रे, एक पिल्लू मेलं, गाडीत घालून नेलं, गाडी गेली डोंगराला, आपण जाऊ बाजाराला, बाजारातून आणल्या पाट्या, साऱ्या मुलांना वाटल्या, एक मूलगा चुकला, छडी खाली लपला, छडी त्याला चावली विद्या देवी पावली' ४.

माझा जॉली होतो तेंव्हा

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 09/02/2018 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
"यावेळेस दिवाळीला फराळाचा एक पदार्थ तू बनवायचा." रविवारी सकाळी मी अंथरुणात लोळत पडलो असताना आमच्या हीने बॉम्ब टाकला. उंच धिप्पाड जोएल गॉर्नरने पहीलाच चेंडू शिवसुंदर दासला बाउंसर टाकल्यावर त्याची जी अवस्था होइल तशी काहीशी माझी अवस्था झाली होती. शाळा कॉलेजातले सारे खडूस मास्तर बायकोचे रुप घेउन माझी सरप्राइज टेस्ट घ्यायला उभे आहे असे वाटत होते. हा सारा त्या जॉली एलएलबी सिनेमाचा परिणाम होता. कुठुन दुर्बुद्धी झाली आणि तो सिनेमा बघायला गेलो असे झाले होते.

काहूर !!!

लेखक Sanjay Uwach यांनी गुरुवार, 08/02/2018 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
काहूर !!! प्रत्येक माणसाचा एक मूळस्वभाव हा ठरलेला असतो .या स्वभावाला अनुसरून तो आपल्या आयुष्यातील अनेक निर्णय घेत असतो .कधी कधी मात्र छोट्याशा स्वार्था साठी तो कांहीतरी विसंगत असे निर्णय घेतो .या विसंगत निर्णयाची प्रेरणा देखील, त्याला त्याच्याच अंतर मनातून मिळाली असते . दिनूची गोष्ट हे याचे एक छोटेसे उदाहरण असू शकेल . दिनू तसा प्रामाणिक माणूस .त्याच्या आयुष्या बद्दल अधिक काय सांगणारा .लहानपणीच त्याच्या आईवडिलांचे छत्र हरपले . एकट्या म्हाताऱ्या आजीने, लोकांच्या घरी मोल मजुरी करून दिनूचा कसाबसा सांभाळ केला.

संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा….

लेखक हेमंत ववले यांनी बुधवार, 07/02/2018 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
हा चंद्र ना स्वयंभू,रवितेज वाहतो हा |ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा || जे न पाहे रवी ते पाहे कवी असे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. इथे कवी ने नुसती कविकल्पनाच केली नाहीये तर, या कविकल्पनेतुन एक खगोलीय सिध्दांत देखील व्यवस्थित मांडला आहे.

नुकते ३१ जानेवारीला संध्याकाळी , झालेल्या चंद्रग्रहणाने आबालवृध्दांना उत्साहीत केले होते. जगभरातुन अब्जावधी लोकांनी हा स्वर्गीय नजारा पाहीला, अनुभवला. सोशल मीडीया च्या वापरामुळे सध्या या व अशा अनेक घटनांविषयी जागरुकता आजकाल वाढताना दिसते आहे. यातुन आपल्या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुनः प्रवेश होताना दिसतो आहे.

वी आर नॉट मेड फॉर ईच आदर

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 07/02/2018 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता आला आहेस? कुठे होतास इतके दिवस, इतके महिने , इतके पावसाळे? आला आहेस इथपर्यन्त ठीक आहे पण सांग का आला आहेस? मला न्यायला की असाच? मी प्रश्न विचारतेय खरी पण आहेत त्याची उत्तरे तुझ्याकडे? नसतीलच. कारण हे प्रश्न तू स्वतःला कधी विचारलेच नसतील. हे प्रश्न तुला पडलेही नसतील. तुझ्याकडे वेळ कुठे आहे त्यासाठी? मला आठवतोय तो दिवस जेंव्हा तुला पहिल्यांदा पाहिले होते तो. विश्वामित्र ऋषींच्या सोबत त राजवाड्यात आला होतास. तुला पाहिले आणि पटकन मोहीत झाले असं काही नाही झालं पण इतर सर्व राजे राजकुमारांमधे तू वेगळा वाटत होतास. त्यांच्या भरजरी थाटामाटासमोर तू अगदी साधा वाटत होतास.

कालवं

लेखक जागु यांनी सोमवार, 05/02/2018 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राला ओहोटी लागली की समुद्रातील खडकाळ भाग दिसू लागतो. लांबून हे नुसते खडक दिसतात. जवळ जाऊन पाहिला की खडक नक्षीदार, काही उघड्या तर काही बंद कवचांनी भरलेले दिसतात. ह्या बंद कवचांमध्ये तयार होत असतात कालवं नावाचे पांढरे मांसल जीव. मांसाहारी लोकांसाठी कालव हा खाद्याचा प्रकार आहे.