गीतेतील विशिष्ट ७ श्लोक आणि त्यांचे परस्परसंबंध
निष्काम कर्मयोग म्हणजे सध्याच्या मानव जन्मातील प्रत्येक चांगले कर्म फळाची अपेक्षा न करता (आणि फळ मिळाल्यास ते न स्वीकारता) परमेश्वराला अर्पण करत राहणे
हे म्हणजे भारतीय वा हिंदु मानस फार सहजतेने जणु हे शक्य सत्यच आहे अशा अर्थाने या मुद्द्याला प्रतिसाद देते असे दिसुन येते.
म्हणजे प्रत्येक कृती मागे एक हेतु एक मोटीव्हेशन हे अंगभुत असतेच असते. त्या हेतु शिवाय माणुस कृतीप्रवृत्त होऊ शकत नाही. तुम्ही निष्काम विदाउट डिझायर कृतीप्रवण कसे होणार ? (चांगले कर्म कोणते ? हा पुन्हा वेगळा मुद्दा पण तो बाजुला ठेवला तरी नुसतं कुठलीही कृती कुठलाही माणुस करण्याची बाब ही मोठी विचारणीय आहे .
" ह्युमियन अकाऊंट ऑफ मोटीव्हेशन " मध्ये याच धर्तीवर मुलगामी विचार मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. यात सर्वसाधारणपणे बिलीफ्स (श्रद्धा या अर्थानेअपेक्षीत नसुन डिस्क्रीप्शन ऑफ वर्ल्ड या अर्थाने घेतले जाते. तर बिलीफ्स स्वतः जग बदलत नाहीत. म्हणजे बिलीफ्स असणे व बदलणे याने इटसेल्फ जग बदलत नाही. उदा. एक असे उदाहरण दिले जाते की माझ्या मोटारसायकलचे दोन्ही चाक हवेने भरुन फुगलेले आहेत हा माझा बिलीफ आहे व मी जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा चाक तपासुन बघतो व एकच चाक हवेने भरलेले आढळते तेव्हा बिलिफ मध्ये बदल होतो इतकेच. मात्र कृती चा उगम सुरुवात होण्यासाठी इच्छे ची डिझायरची जरुरी असते. जेव्हा इच्छा निर्माण होणार तेव्हाच " बिलीफ वुइल मुव्ह अस " म्हणजे उदा. जेव्हा मला मोटारसायकल चालवण्याची " इच्छा" निर्माण होणार त्तेव्हाच मी चाकात हवा भरण्यास "उद्युक्त" होणार. अर्थात माझ्या इच्छा माझ्या बिलीफ वर ( एक चाकात हवा नाही या बिलीफ वर ) अवलंबुन असणार. म्हणजे मुलभुत डिस्क्रीप्शन ऑफ रीअॅलीटी हे माझ बिलीफ ठरवणार पण माझी इच्छाच त्याला त्या रीअॅलीटीला बदल करण्याची कृती करण्यास प्रवृत्त करणार अशा दिशेने ह्युम आपली मांडणी करतो.
पण गीतेत जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती अशी की विदाउट डिझायर तुम्ही कृती करा. जी कसे शक्य आहे?In reply to हा निष्काम कर्मयोगाचा मुद्दा मला महत्वाचा वाटतो. by मारवा
In reply to मारवाजी, इथे भगवंतांना फळाची by क्रिप्ट
In reply to मारवाजी, इथे भगवंतांना फळाची by क्रिप्ट
In reply to छान by manguu@mail.com
In reply to हा निष्काम कर्मयोगाचा मुद्दा मला महत्वाचा वाटतो. by मारवा
दुसऱ्या बाबतीत म्हणजेच नवीन कर्मबंधन निर्माण होऊ नये म्हणून केलेल्या कर्माच्या मोबदल्यात स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता ते कर्म ईश्वराला अर्पण करणे होय.
हे नक्की कसे करता येते यावर कृपया खुलासा करावा उदाहरणार्थ
१- स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता हे पुर्ण निरपेक्ष होणे कसे असते याचे उदाहरण कसे असेल ? जसे समजा एक व्यक्ती असे म्हणाला मी स्वतःसाठी काहीही नको केवळ कुटुंबासाठी वा समाजासाठी अमुक एक काम करतो. त्याचे फलस्वरुप मला पैसा मिळतो. आता हा पैसा एक महीना काम करुन मिळालेला २०००० रुपये. हे जे फल आहे एक महीन्याच्या कर्माने निर्माण झालेले. हे मी स्वतःसाठी केलेले नाही.
२-आता हे एक महीन्याचे कर्म मला ईश्वराला अर्पण करायचे आहे तर ते नेमके कसे " अर्पण " करणार म्हणजे प्रोसीजर काय असेल नियम काय आहेत अर्पण करण्याचे
वा किमान हे अर्पण झाले की अनर्पित आहे हे नेमके कसे ठरते ? म्हणजे मनातल्या मनात विचार करावा की झाले ? म्हणजे असे दोन जण आहेत सुरेश व रमेश दोघांनी वरील प्रमाणे १ महीना कर्म केले तर एकाचे अर्पण झाले एकाचे नाही असे कसे ठरविता/बघता/समजता येते नेमके ?
३- सर्वात महत्वाचा भाग असा की २०००० चे जे फल आहे त्याची प्राप्ती चे मुळ मोटीव्हेशन समजा स्वतःसाठी नाही इतकेच पुरेसे आहे का ? म्हणजे मोठ्या फलाच्या साठी लहान मायनर फलांचा त्याग यात अपेक्शीत आहे का ? म्हणजे स्वार्थत्यागातुन "अधिक श्रेष्ठ " क्वालिटी च्या फलाचा हेतु मनात ठेऊन जर काम होत असेल तर पुन्हा फलहेतु आलाच ना ? जरी ईश्वरप्राप्ती श्रेयसप्राप्ती इ.इ. अध्यात्मिक उच्चत्त्म फले "त्या जगातील " असली तरी फलहेतु अपरीहार्यपणे येत नाही का ? ईश्वराला अर्पण करण्याचा हेतु ?
In reply to एक एक मुद्दा घेऊ या by मारवा
In reply to "१- स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा by क्रिप्ट
In reply to निष्काम कर्मयोगामुळे सगळेच by क्रिप्ट
In reply to निष्काम कर्मयोगामुळे सगळेच by क्रिप्ट
In reply to पण आयुष्यात मिळणार्या अन्न by क्रिप्ट
In reply to ... by manguu@mail.com
In reply to १ झाली गरजेपुरती आणि ५०० चंगळ by क्रिप्ट
In reply to नाही पटले. by manguu@mail.com
In reply to अगदी प्रत्येकालाच मोक्ष नको असतो...कारण.. by निमिष सोनार
In reply to ही चार युगे म्हणजे नेमके काय? by प्रचेतस
In reply to येथे समजावणे थोडे मला कठीण वाटते.. by निमिष सोनार
In reply to चार युगे संपली कि ब्रम्हांड reset होते ... by निमिष सोनार
In reply to पण मुळात युग म्हणजे जाय हेच by प्रचेतस
छान.