Skip to main content

लेख

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ७

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 01/10/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक भाग १ https://www.misalpav.com/node/43088 भाग २ https://www.misalpav.com/node/43118 भाग ३ https://www.misalpav.com/node/43144 भाग ४ https://www.misalpav.com/node/43170 भाग ५ https://www.misalpav.com/node/43224 भाग ६ https://www.misalpav.com/node/43298 मागील प्रकरणात आपण म्हट

भुरळ

लेखक अनाहूत यांनी बुधवार, 26/09/2018 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने त्याचे फेसबुक अकाउंट open केलं . एक friend request होती त्याने ती check केली . sweet sneha या नावाने friend request होती . या fake accounts च काय करायचं आणि कशाला कोण उगाचच मुलीच account बनवून बसतात काय माहित आणि त्यातून वर आणखी friend request टाकत बसतात काय माहित . पण जाऊदे आपण तरी एव्हढा कशाला विचार करायचा . करूया आपणही accept . काय फरक पडतो . त्याने accept वर click केलं आणि तो स्वतःची timeline check करू लागला. तेच ते नेहमीच , बस दोघाचे नवीन pic आणि त्याच त्या नेहमीच्या शेकडॊवेळा repeat झालेल्या posts ....

रंग आयुष्याचे..

लेखक कलम यांनी मंगळवार, 25/09/2018 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
अरे किती प्रकारची माणसं असतात आपल्या भोवताली. फक्त रंग-रूप, जातपातच नाही तर हजारो स्वभावांच्या लाखो छटा असणारी. कधी राग, द्वेष तर कधी प्रेम आणि आदर यांचे बदलत जाणारे मुखवटे. कधी खरेपणात लकाकणारे तर कधी खोटेपणाच्या बुरख्यात काळवंडलेले. कधी कधी तर असं वाटत की आपलं आयुष्य म्हणजे मनाच्या कोऱ्या कागदावर विचारांच्या कुंचल्याने आणि भावनांच्या वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेली चित्रेच जणू. अरे पण ही चित्रे पण कशी, तर हर घडीला आपले रंग आणि आकार बदलणारी. आपण सगळेच चित्रकार अगदी जन्मल्यापासून सरणावर जाईपर्यंत.

श्रीगणेश लेखमाला २०१८ - समारोप

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 24/09/2018 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर जी एक हुरहुर असते, तशी काहीशी भावना श्रीगणेश लेखमालेचा समारोप करताना आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही मिपावर श्रीगणेश लेखमाला-२०१८ आयोजित केली होती. यंदा 'DIY - Do It Yourself - केल्याने होत आहे रे' अशी संकल्पना घेऊन लेख मागवले होते.

विसर्जन

लेखक मयुरी चवाथे-शिंदे यांनी सोमवार, 24/09/2018 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
विसर्जन अनंत चतुर्दशीची संध्याकाळ. बाप्पाला निरोप द्यायला बरेच जण त्या समुद्रकिनारी जमले होते. बाप्पाने जाऊच नये अस वाटत असताना आता गेला नाही तर पुढच्या वर्षीच्या पुनरागमनाची ओढ कशी लागेल? त्यामुळे जड अंतःकरणाने त्याच्या विसर्जनाप्रीत्यर्थ डोळ्यात अश्रू घेऊन सगळे त्याला पाहत होते. “ती" मात्र रडत होती अगदी हमसून हमसून. २४-२५ वर्षांची असावी बहुतेक. गळ्यात साधस मंगळसूत्र आणि बाकीही अलंकार खोटेच पण अगदी लहान मुलासारखी रडत होती. तिची समजूत काढायची ? अरे पण लहान बाळ थोडीच आहे ? तरीही सासू सासरे समजावत होते.

अशी ही बनवाबनवी

लेखक Prakashputra यांनी सोमवार, 24/09/2018 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज व्हाट्सअँप वरती एक मेसेज आला कि 'अशी ही बनवाबनवी' ला ३० वर्षे पूर्ण झाली. ते वाचून मला बनवाबनवीबद्दल काहीतरी लिहावे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. २३ सप्टेंबर १९८८ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या पिक्चरला लोकांनी अफाट प्रेम दिले. हा पिक्चर अफाट गाजला आणि अजूनही गाजतोच आहे. 'Cult Following' असं जे म्हणतात ते या पिक्चरला मिळाले. मी दादा कोंडक्यांच्या जमान्यातला नाही, त्यामुळे त्यांचे चित्रपट किती गाजायचे याचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही, पण त्याबद्दल ऐकून आहे. तेवढेच किंवा जास्तच प्रेम बनवाबनवीला मिळाले.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ९

लेखक रा.म.पाटील यांनी रविवार, 23/09/2018 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate Your Love) कथा - ९ गणेश चतुर्थी.. (प्रेमाची ओढ..) रेखीव डोळे, डोळ्यातील चमक, चेहऱ्यावरचे तेज, सुंदर गौरवर्ण, जणू सौन्दर्याची मूर्तीच होती ती.. खरंतर तो गणपतीची मूर्ती निवडत होता आणि तिथे त्याला ती दिसली.. आणि त्याला गणपतीची जी मूर्ती आवडली होती तीच मूर्ती तिलाही आवडली होती, पण दुकानात तशी एकच मूर्ती शिल्लक होती.. त्याने मात्र ती मूर्ती तिला देण्यास सांगितले.. कारण त्याने निवडली होती आता जिवंत सौन्दर्याची मूर्ती म्हणजेच ती.. जिच्यासाठी शहरातल्या साऱ्या गणपतीपुढे हात जोडून तो नवस बोलायला तयार होता..

आठवणीतील काश्मीर : लालेदी छोले -पुरी

लेखक Sanjay Uwach यांनी शुक्रवार, 21/09/2018 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतील काश्मीर : लालेदी छोले -पुरी आता तसे पहिले तर या घटनेला अनेक वर्षे होऊन गेली .मला अजून देखील तो दिवस चांगला आठवतो .मी जेव्हा कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होतो, त्या वेळी मला, माझे सिनियर्स या लालाच्या दुकानात छोले पुरी खाण्यासाठी घेऊन आले होते .लाल चौकात पॅलॅडियम टॉकीज जवळ, जी भाजी मंडई आहे ,त्या मंडईत आत शिरल्या वर डाव्या बाजूला हे दुकान होते. दहा बाय दहा फुटाच्या छोटयाशा दुकानात,बाजूच्या तिन्ही भितींना साधारण आठ इंचाची सभोवती एक लाकडी पट्टी लावण्यात आली होती . त्या पट्टीवर आपली प्लेट ठेवून,उभे राहूनच लोक मोठ्या मज्जेने छोले पुरी,टिक्कीया,सामोसे,चाट याचा आनंद घेत असायचे.

आशाताई आणि आपलं भावगीत विश्व 

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 20/09/2018 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आशाताई आणि आपलं भावगीत विश्व  आशाताईंच्या जन्मदिवसानिमित्त 'पिया तू अब तो आजा....' हा लेख लिहिला; त्याचवेळी मनात होतं की आशाताईंनी अजरामर केलेल्या मराठी भावगीत विश्वातल्या काही मोजक्या गाण्यांवर जर काही लिहिलं नाही तर आपल्यासारख्या रसिकांवर तो अन्याय असेल. म्हणून हा अगदी लहानसा प्रयत्न.... मानून घ्या! 'पिया तू......' या लेखात म्हंटल्या प्रमाणे हिंदी चित्रपटातील आशाताईंची गाणी ऐकताना आपल्या डोळ्यांसमोर ती अभिनेत्री उभी राहाते. मात्र मराठी भावगीतांच्या संदर्भात माझं मत थोडं वेगळं आहे. आशाताईंच्या गाण्यातून मला मीच त्या शब्दात विरघळताना दिसते....  'जिवलगा......

लेले आनंदले

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 16/09/2018 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन पिळगावकर आणि वसंत सबनीस जर लेले आजोबांना भेटले असते, तर 'अशी ही बनवाबनवी'च्या पूर्वार्धात दाखवलेल्या पुणेरी घरमालकाच्या पात्रात त्यांनी बदल केला असता. इतका प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदी पुणेकर माझ्या तरी पाहण्यात नाही. (ही कथा काल्पनिक आहे. घटना, स्थळं आणि पात्रं प्रत्यक्षात आढळली तर केवळ योगायोगच समजू नये, अयोग्यही समजावं ही विनंती.) खुलासा - इतर पुणेकर प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदीच असतात, लेले आजोबांइतके नसले तरी.