द्वंद्व.....
द्वंद्व
स्वर्गात शंकर-पार्वती आपल्या आसनावर विराजमान असताना खाली पृथ्वीवर पहात होते आणि पार्वतीच्या नजरेस एखाद गरीब ब्राह्मण पडतो आणि मग पुढे ती गोष्ट चालू होते.... अशा अनेक गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतील. वरून बघतांना त्यांना आता ही शहरे कशी दिसत असतील आणि त्यात त्यांना माणसे दिसत असतील का ? असा प्रश्न माझ्या मनात नेहमीच उभा रहातो. मला तर वाटते त्यांना ही शहरे एखाद्या मुंग्यांच्या वारूळासारख्या दिसत असतील. सध्या जसा मुंग्यांच्या वारूळाचा अभ्यास करण्यासाठी काचेच्या पेट्या असतात त्याप्रमाणे तेही खाली असलेल्या या मुग्यांच्या वारूळाचा अभ्यास करत असतील का ?
मिसळपाव
आज, ३० ऑक्टोंबर रोजी, होर्मसजी जहांगीर भाभा यांचा जन्मदिवस आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर यांसारख्या भारतातील अग्रगण्य संशोधन संस्थांचे ते संस्थापक होते. त्या संस्थांमध्ये आजही हा दिवस ’फाऊंडर्स डे’ म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. भाभांना भारतीय अणुऊर्जेचे जनक मानले जाते.