Skip to main content

अशा सांजवेळी...

लेखक श्रीगणेशा यांनी गुरुवार, 22/07/2021 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक नवीन मराठी गाणं ऐकण्यात आलं... "अशा सांजवेळी" सुंदर शब्दरचना, सुमधुर संगीत आणि तितकाच सुरेल आवाज. सर्व अगदी जुळून आलं आहे. (संगीतकारांच्याच शब्दात) बासरी आणि मोहनवीणा या वाद्यांच्या मधुर आवाजाने गाण्याची सुंदरता अजूनच बहरली आहे. गाण्याची YouTube लिंक: https://www.youtube.com/watch?v=Stcrt7_mPKY मिपाकरांनो.. एखादं भावलेलं नवीन गाणं ऐकलं असेल तर इथे नक्की सांगा.

डोक्याला शॉट [सप्तमी]

लेखक गड्डा झब्बू यांनी बुधवार, 21/07/2021 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

नकोसा पांढरा हत्ती (कथा परिचय : ५)

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 16/07/2021 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख : १. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! २. एका आईचा सूडाग्नी ३. कुणास सांगू ? ४. ‘भेट’ तिची त्याची .................. विदेशी कथा परिचयमालेच्या पाचव्या भागात सर्व वाचकांचे स्वागत ! या भागासाठी जे अमेरिकी लेखक निवडले आहेत ते जागतिक कीर्तीचे आहेत.

चविष्ट - यू ट्युब चॅनेल

लेखक जागु यांनी शुक्रवार, 09/07/2021 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर. आज एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत. तुमच्या कडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असेल.

चविष्ट - यू ट्युब चॅनेल

लेखक जागु यांनी शुक्रवार, 09/07/2021 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मायबोलीकर. आज एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत. तुमच्या कडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असेल.

‘भेट’ तिची त्याची (कथा परिचय: ४ )

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 06/07/2021 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख : १. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! (https://www.misalpav.com/node/48861) २. एका आईचा सूडाग्नी (https://www.misalpav.com/node/48900) ३. कुणास सांगू ? (https://www.misalpav.com/node/48952) .......... या लेखमालेत आतापर्यंत आपण इंग्लीश, फ्रेंच आणि रशियन अशा प्रसिद्ध लेखकांच्या गाजलेल्या प्रत्येकी एक कथांचा परिचय वाचला आहे.

अपघात - एका नव्या ट्रकचा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 04/07/2021 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सुरेवारसिंग ट्रकलोड घेवून मध्यप्रदेशातल्या सतना या गावी जायचे होते. नवी मुंबई ते सतना या प्रवासासाठी त्याने मनाची तयारी काल दुपारीच केली होती. साधारण चार दिवसाचा एकूण प्रवास होणार होता. इकडून काहीतरी केमीकल फिल्टर प्लांटचे मशिनरी घेवून तिकडे एका फॅक्टरीत अनलोड करायचे अन तिकडून इंदूरपर्यंत अनलोड येवून इंदूर जवळच्या पिथमपूरहून बजाज टेंम्पोमधून सामान घेवून ते चाकणला उतरवून परत नवी मुंबई. त्याच्या अनुभवाने एखादा दिवस जास्तच लागणार होता हे त्याला जाणवले होते. घरी किरकोळ किराणा सामान अन मुलीसाठी खाऊ घेवून तो काल दुपारीच लवकर घरी आला होता. रात्री आराम करून तो सकाळी उठला.

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

लेखक अनुस्वार यांनी बुधवार, 30/06/2021 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.

कुणास सांगू ? (कथा परिचय : ३)

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 23/06/2021 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख : १. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! २. एका आईचा सूडाग्नी …………………………………………………. वरील संदर्भ क्र. २ च्या प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे युरोपीय बिगर इंग्लिश कथाकारांमध्ये फ्रान्सचे मोपासां आणि रशियाचे चेकॉव्ह (Anton Chekhov) हे महान कथाकार होते. त्यांनी एकोणिसाव्या शतकात अनेक उत्तमोत्तम कथा लिहिल्या. त्यांच्यानंतरच्या पिढ्यांमध्ये कथाविश्वात त्यांच्या नावे कथाकारांची ही दोन घराणी निर्माण झाल्याचे मानले जाते.

हळदीघाटातील रण संग्राम ई-पुस्तक विमोचन

लेखक योगविवेक यांनी बुधवार, 16/06/2021 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच काळानंतर घागा लिहित आहे. त्याला कारण ही मजबूत आहे. विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले "हळदी घाटातील युद्ध" ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे. इंग्रजी पुस्तकाचे लोकार्पण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते दि १८ जून (कारण याच तारखेला ते युद्ध घडले होते) रोजी सकाळी ११ वाजता होईल. हिंदी मधील ईपुस्तक लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंह यांच्या हस्ते १८ जून रोजी सायंकाळी ६.३० ला होणार आहे. तर मराठीतील पुस्तकाचे लोकार्पण मा. पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते १८ जून रोजी रात्री ९ वाजता होणार आहे.